मातीचे एका जागेवरून दुसर्या जागेवर स्थलांतर होणे म्हणजे जमिनीची धूप होय. प्राणी व वनस्पती यांची हालचाल तसेच पाऊस यांच्या परिणामामुळे भूपृष्ठावरील मातीचे कण एकमेकांपासून विलग होऊन ते वारा व पाणी यांच्यासोबत वाहून जातात त्यामुळे जमिनीची धूप होते.
खडकांपासून ऊन, वारा, पाऊस, थंडी इत्यादींच्या परिणामामुळे विदारण प्रक्रिया न माती तयार होत असतो. तसेच दाट झुडपे यांच्यापासून पडणारा पालापाचोळा साठवून त्याच्या पासून माती तयार होते चुकीच्या मशागतीच्या पद्धती, प्राणी व मनुष्य यांच्या जमिनीवर सततचा असणारा वावर इत्यादी कारणांमुळे जमिनीची धूप होते. या लेखात आपण जमिनीच्या धुपीचे प्रकार जाणून घेऊ.
जमिनीच्या धुपीचे प्रकार
- ओघळी धूप- पावसाचे थेंब जमिनीवर पडल्यानंतर ते उताराच्या दिशेने वाहू लागतात. त्याच बरोबर ते त्याच्या आघाताने विलग झालेले मातीचे कण वाहून नेतात.वाहत असताना अनेक थेंब एकत्र येऊन त्यांचा एकत्र प्रवाह तयार होतो. जमिनीच्या उतारा मुळे या प्रवाहास गती मिळून ते सतत वाढत जाते व त्यामुळे भूपृष्ठाची आणखी झीज होऊन या लहान प्रवाहाच्या जागी लहान ओघळ तयार होतो.
- चादरीधूप- लहान लहान ऊधळी एकत्र येऊन त्यांचा मोठा पाणलोट तयार होतो. यास अपधाव असे म्हणतात. हे अपधाव पाणी भूपृष्ठावरून चादरी प्रमाणे वाढत जाते व पुन्हा त्यास उतारामुळे गती प्राप्त होऊन ती माती पाणलोटा बरोबर वाहून जाते.
- घळी धुप- भूपृष्ठावरून वाहणाऱ्या पाणलोट प्रवाहात परिवर्तित होण्यासाठी मार्ग शोधू लागतो व खोलगट भागाततोकेंद्रित होऊ लागतो.अशाप्रकारे घळीचे शीर्ष तयार होते. नंतर हे पाणी खोलगट भागाकडे भाव लागते व प्रवाह तयार होतो. त्यात आजूबाजूच्या उंच भागावरील पाणलोट येऊन मिळत असतात व प्रवाह विस्तारत जातो.
- वाढत्या पाणलोट यामुळे व प्रवाहाची गती वाढल्याने घळ तयार होऊन जमिनीची धूप होते.
- प्रवाहातील धूप- वाहत असलेल्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर पाणलोट क्षेत्रात सतत वाढ होत जाते व त्याच्या तळाच्या उतारामुळे त्याची गती वाढत जाते. या वाढत्या गतीमुळे प्रवाहाच्या तळाची तसेच त्याच्या दोन्ही काठाची झीजहोत जाऊन प्रवाहाची खोली व विस्तार दोन्ही वाढत जातात.
- उसळी धूप- पावसाचे पाणी जेव्हा जमिनीवर पडते तेव्हा पावसाच्या प्रत्येक थेंबात एक विशिष्ट स्थळ ऊर्जा असते. हे थेंब फार उंचीवरून जमिनीवर पडत असताना ते मातीच्या कणांचे सोबत आघात करतात त्यामुळे गती वृधितधूपेला प्रारंभ होतो.
Published on: 26 December 2021, 06:22 IST