Agripedia

सेंद्रिय शेती ही आता पर्याय न राहता काळाची गरज बनली आहे. रासायनिक शेतीमुळे जमिनीत जीवसृष्टी नष्ट होत आहे, सुपीकता कमी होत आहे आणि उत्पादनाचा खर्च वाढत आहे. अशा परिस्थितीत सेंद्रिय शेतीकडे वळणारे शेतकरी वाढत आहेत. मात्र, सेंद्रिय शेतीत आवश्यक असणाऱ्या जीवामृताची वेळेत आणि योग्य प्रमाणात निर्मिती ही मोठी अडचण ठरते.

Updated on 23 July, 2025 5:03 PM IST

प्रस्तावना-

सेंद्रिय शेती ही आता पर्याय न राहता काळाची गरज बनली आहे. रासायनिक शेतीमुळे जमिनीत जीवसृष्टी नष्ट होत आहे, सुपीकता कमी होत आहे आणि उत्पादनाचा खर्च वाढत आहे. अशा परिस्थितीत सेंद्रिय शेतीकडे वळणारे शेतकरी वाढत आहेत. मात्र, सेंद्रिय शेतीत आवश्यक असणाऱ्या जीवामृताची वेळेत आणि योग्य प्रमाणात निर्मिती ही मोठी अडचण ठरते.

हीच समस्या ओळखून विकसित करण्यात आले आहे Progressive जीवामृत ट्यूब. हे एक अभिनव तंत्रज्ञान आहे, ज्याच्या मदतीने शेतकरी कमी वेळात, कमी मेहनतीत आणि कमी खर्चात अधिक गुणवत्तापूर्ण जीवामृत तयार करू शकतात.

जीवामृत का आवश्यक आहे-

- जीवामृत हे नैसर्गिक खत जमिनीत सूक्ष्मजीवांची संख्या वाढवते.

-हे सूक्ष्मजीव मातीतील पोषकतत्त्वांचा विघटन वेग वाढवतात,

- ज्यामुळे पिकांना सहज उपलब्ध होतात.

- याचा थेट परिणाम म्हणजे पिकांची मुळे अधिक बळकट होतात.

- पाने गडद हिरवी राहतात.

- रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

- उत्पादनाचा दर्जा सुधारतो.

तथापि, पारंपरिक पद्धतीने जीवामृत तयार करताना वेळ, जागा, सतत देखरेख आणि योग्य प्रमाण राखणे यासारख्या समस्या येतात. Progressive जीवामृत ट्यूब या समस्यांवर अत्यंत प्रभावी उपाय ठरते.

Progressive जीवामृत ट्यूब कशी काम करते

ही ट्यूब सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक अशा जीवनसत्त्वांनी आणि सूक्ष्मजीवांनी समृद्ध असलेले जीवामृत तयार करण्याची प्रक्रिया अधिक सोपी करते. फक्त 10 ते 12 दिवसांत दर्जेदार जीवामृत तयार होते, जे ड्रीप सिंचन, फवारणी किंवा पाट पाण्यातून सहज वापरता येते.

Progressive जीवामृत ट्यूबच्या वापराचे फायदे

- कमी वेळेत अधिक प्रमाणात व दर्जेदार जीवामृत तयार होणे

- कमी खर्चामुळे रासायनिक खतांवरील अवलंबन कमी होणे.

- जमिनीचा पोत सुधारून भुसभुशीतता वाढणे.

- पीक मुळे अधिक बळकट होणे आणि पोषणतत्त्वांचे शोषण सुधारणे.

- पिकांची प्रतिकारशक्ती वाढून रोग व कीटकांपासून नैसर्गिक संरक्षण मिळणे.

Progressive जीवामृत ट्यूब वापरल्याने शेतात झालेले बदल.

ट्यूब वापरल्यावर अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लक्षणीय बदल अनुभवले आहेत. काही प्रमुख बदल पुढीलप्रमाणे आहेत:

- पिकांच्या उत्पादनात सरासरी 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

- रासायनिक खतांवरील खर्च 40 ते 60 टक्क्यांनी कमी झाला आहे.

- मातीची सुपीकता आणि पाणी धारण करण्याची क्षमता वाढली आहे.

- पिकांचा दर्जा सुधारला असून फळांचा आकार, चव आणि रंग अधिक आकर्षक झाला आहे.

- रासायनिक फवारणींची गरज कमी झाल्याने पर्यावरणीय तणावही कमी झाला आहे.

ट्यूबची वैशिष्ट्ये-

- विविध आकार व मॉडेल्स उपलब्ध.

- 900 GSM प्लास्टिक पासून तयार केली जाते.

- ऊन, पाऊस, वारा आणि बुरशी यांचा कोणताही परिणाम होत नाही.

- डास, माश्या किंवा दुर्गंधीचा त्रास होत नाही.

- 100 टक्के वॉटरप्रूफ आणि तीन वर्षांची वॉरंटी सुविधा.

- बाजारात जीवामृत बनवणाऱ्या खूप साऱ्या कंपन्या उपलब्ध आहेत परंतु, ISO सर्टिफाईड असणारी उष्णतेपासून बॅक्टरियाचा बचाव करणारी वारंवार ब्लॉकेज न होणारी ही एकमेव progressive जीवामृत ट्यूब आहे.

सेंद्रिय शेतीसाठी योग्य पर्याय-

-Progressive जीवामृत ट्यूब केवळ एक साधन नसून शेतकऱ्यांसाठी शाश्वत शेतीकडे नेणारा विश्वासाचा दुवा आहे. या ट्यूबच्या मदतीने शेतकरी कमी खर्चात आणि कमी मेहनतीत अधिक उत्पादन घेऊन नफा वाढवू शकतात. तसेच, रासायनिक खतांवरील अवलंबन कमी करून पर्यावरणासही अनुकूल योगदान देऊ शकतात.

-शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीत करण्यास प्रवृत्त करण्यासाठी तसेच त्यांना समृद्ध करण्यासाठी तिचे नाव ही progressive जीवामृत ट्यूब ठेवले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क- 9657523355, 9689523355*

सेंद्रिय शेतीतील नवनवीन उपाय जाणून घेण्यासाठी Progressive Farming World चे फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब चॅनेल फॉलो करा.

सेंद्रिय शेतीसाठी दर्जेदार जीवामृत तयार करण्याचा सुलभ मार्ग- Progressive जीवामृत ट्यूब

लेखक-नितीन रा. पिसाळ

पशुसंवर्धन सल्लागार व कृषी अभ्यासक

फार्मर द जर्नलिस्ट- कृषी जागरण

English Summary: A revolutionary solution in organic farming - Progressive Jeevamrut Tube.
Published on: 23 July 2025, 05:03 IST