जगभरात 'कृषि प्रधान देश' अशी ओळख असलेल्या भारतातील शेतकर्यांची जगातील कृषीशी निगडीत असलेल्या क्षेत्रात प्रगति की अधोगती सुरू आहे? शेती उद्योगाला गती देण्यासाठी शेतकर्यासाठी कृषि व्याख्याने, या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींचा सत्कार, कृषि प्रदर्शन, मेळावे आदि उपक्रम राबवणे गरजेचे आहे.देश स्वतंत्र झाला तेव्हा भारताचा राष्ट्राच्या उत्पन्नात शेतीचा वाटा हा पन्नास टक्यांच्या आसपास होता, तो आज २२ ते २५ टक्याच्या आसपास आला आहे.
आज समाजातील विविध घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करते. मात्र देशाचा व जगाचा पोशिंदा अशी मोठी बिरुदावली असलेल्या शेतकरी व शेतीच्या प्रगतीसाठी, शेतीमालच्या दरवाढीसाठी, शेतकर्याची आर्थिक, सामाजिक स्थिति सुधारण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होतात का हाही संशोधनाचा विषय आहे.Whether sincere efforts are made to improve social conditions is also a subject of research.आज देशात 'राष्ट्रीय शेतकरी दिन' साजरा होत असताना देशभरातील शेतकरी राजाची सध्याची
स्थिति, त्यांचा आर्थिक स्तर, सामाजिक पत, त्यांना समाजाकडून मिळणारी वागणूक आदि बाबीचा विचार करणे यानिमित्ताने गरजेचे आहे. सरकारे आली पुन्हा बदलली मात्र शेतकरी राजाची परस्थिती मात्र 'जैसे थे' अश्याच स्वरूपाची असते.राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या निमिताने शेतकर्याची आर्थिक ऊंची वाढवण्यासाठी शेतीच्या पारंपारिक पद्धतीत बदल सुचवणे, ते अमलात आणण्यासाठी त्यांना तयार करणे व विशेष म्हणजे शेतकरी सद्य स्थितीत भेदरलेल्या व कर्जबाजारी अवस्थेत
असल्यामुळे त्याला उभे करण्यासाठी अर्थ पुरवठा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. शेतकरी उभा राहिला तरच देश प्रगतीची शिखरे पार करू शकेल. शेतीच्या क्षेत्रात ‘मेक इन इंडिया’ला मोठी संधी आहे. त्याकरिता तंत्रज्ञानाचा विकास व गुंतवणुकीची गरज आहे. आज जो शेतीचा थोडा फार विकास झाला आहे. त्याला मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण कारणीभूत आहे. १९६५-६६ सालापर्यंत शेतीतील यांत्रिकीकरणाने गती घेतलेली नव्हती. शेती ही पारंपरिक पद्धतीने माणसाची मेहनत व कष्ट तसेच
बलांच्या साहाय्याने केली जात होती. नांगर, वखर, पाभर, नांगरी ही बल मशागतीची साधने, तर पाणी उपसण्यासाठी मोटांचा वापर होत होता. त्यामुळे त्या वेळी शेतीत उत्पादकताही कमी होती.भविष्यात जागतिक तापमानवाढ, पाणीटंचाई, हवामानबदल या पार्श्वभूमीवर कृषी अभियांत्रिकीचा वाटा अधिक असणार आहे; पण त्याकडे संशोधन संस्थाच दुर्लक्ष करीत आहे. आर्थिक गुंतवणूक न येण्याचे ते कारण आहे. हे दुर्लक्ष करून चालणार नाही. अशा परिस्थितीत कृषी क्षेत्रात ‘मेक इन इंडिया’ हे केवळ स्वप्न ठरू नये म्हणून प्रयत्न होणे गरजेचे आहे.
संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ : अशोक तुपे
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
Published on: 23 December 2022, 08:53 IST