Agripedia

मुंबई, दि. 22 : शंखी गोगलगायी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देऊ.

Updated on 24 August, 2022 12:09 PM IST

मुंबई, दि. 22 : शंखी गोगलगायी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देऊ. शेतीच्या नुकसानीबाबत विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल,असे मदत आणि पुनर्वसन मंत्री 

अब्दुल सत्तार यांनी आज विधानसभेत सांगितले.Abdul Sattar said in the Legislative Assembly today.महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, लातूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत शंखी गोगलगायीमुळे

खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. लातूर आणि इतर काही जिल्ह्यांमध्येही शंखी गोगलगायमुळे शेतीचे नुकसान झाले आहे.हे नुकसान नेमके किती झाले आहे. नुकसान भरपाई किती द्यावी लागेल यासाठी

समिती स्थापन केली जाईल.समितीच्या अहवालानंतर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल.याबाबतच्या चर्चेत सदस्य सर्वश्री धनंजय मुंडे, अभिमन्यू पवार, नमिता मुंदडा आदी सहभागी झाले.

English Summary: A committee will be set up for the compensation of the loss due to conch snail
Published on: 24 August 2022, 12:09 IST