फॉस्फेट रॉक या खतामध्ये ८ ते १२ टक्के स्फुरद असून, ते तुलनेने स्वस्त आहे. ते आम्लधर्मी जमिनीमध्ये वापरण्यास योग्य आहे. त्याबद्दल माहिती देताना मार्गेनॉट यांनी सांगितले, की रॉक फॉस्फेट हे आपल्या दातांमध्ये किंवा हाडामध्ये आढळणाऱ्या कॅल्शिअम फॉस्फेटप्रमाणे आहे. ते कमी पीएच असलेल्या मातीमध्ये उपयुक्त ठरू शकते.मका आणि वाटाणा या पिकांमध्ये रॉक फॉस्फेट, ट्रिपल सुपर फॉस्फेट आणि खतांचा अजिबात न वापरता प्रयोग करण्यात आले. तेरा हंगामाइतक्या दीर्घकाळ केलेल्या या अभ्यासामध्ये माती आणि पिकामध्ये उपलब्ध स्फुरदाचे प्रमाण मोजण्यात आले. लोहामुळे बंधनात अडकलेल्या स्फुरदाचे प्रमाण मोजण्यात आले. तसेच उपयुक्त सूक्ष्मजीवांवरील परीणामांचाही विचार करण्यात आला.
टीएसपी आणि रॉक फॉस्फेट या दोन्हीची पिकातील उपलब्धता सारखीच आहे. मात्र, टीएसपी खतांच्या शेतामध्ये लोहामुळे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक स्फुरद बांधले गेल्याने पिकांना उपलब्ध होत नसल्याचे आढळले.रॉक फॉस्फेटच्या शेतामध्ये २९९ टक्के अधिक स्फुरद हा सूक्ष्मजीवांच्या कार्यामुळे अधिक उपलब्ध होत असल्याचे आढळले.रॉक फॉस्फेट हे सावकाश उपलब्ध होणारे खत असून, टीएसपी वेगाने मिळते. एकाच वेळी अधिक वापर केल्यास सूक्ष्मजीव आणि पिकांना उचलता येत नाही. पर्यायाने ते मातीमध्ये बद्ध होते.मात्र, रॉक फॉस्फेटमुळे काही प्रमाणात आम्लता कमी होऊन मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअमसारखे अन्य पोषक घटक उपलब्ध होण्यास मदत होते. त्याचा पिकांना फायदा होतो.
- अन्ड्र्यू मार्गेनॉट, संशोधक
Published on: 18 May 2022, 11:51 IST