Agripedia

सध्या भारतामध्ये तसेच महाराष्ट्रात रेशीम शेती मोठ्या प्रमाणात केली जात आहे. आपल्याला माहीत आहेत की रेशीम शेती साठी तुती ची आवश्यकता असते. आपल्या महाराष्ट्रात रेशीम उद्योगाची प्रगती झालेली असली तरी त्या मानाने ही उत्पादकता फारच कमी आहे.

Updated on 26 December, 2021 6:27 PM IST

सध्या भारतामध्ये तसेच महाराष्ट्रात रेशीम शेती मोठ्या प्रमाणात केली जात आहे. आपल्याला माहीत आहेत की रेशीम शेती साठी तुती ची आवश्यकता असते. आपल्या महाराष्ट्रात रेशीम उद्योगाची प्रगती झालेली असली तरी त्या मानाने ही उत्पादकता फारच कमी आहे.

यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्याकडील शेतकरी तुती आणि रेशीम यांच्या सुधारित जातींचा लागवडीसाठी वापर करत नसल्यामुळे त्याचा थेट परिणाम उत्पादकतेवर दिसून येतो. जर रेशीम शेतीत दर्जेदार व किफायतशीर उत्पादन घ्यायचे असेल तर त्यासाठी रेशीम व तुटीच्या संकरित व सुधारित वाणांची निवड करणे फार महत्वाचे आहे. या लेखात आपण तुतीच्या काही सुधारित जातींची माहिती घेऊ.

 तूतिच्या काही सुधारित जाती

  • कनव्हा-2- तूतिची ही जात निवड पद्धतीने 1950 मध्ये कर्नाटक राज्यातील शासकीय कनव्हागावातील रेशीम केंद्रामध्ये विकसित करण्यात आली आहे.या जातीची निर्मिती खुल्या परागसिंचन या पद्धतीने स्थानिक मैसूर या जातीपासून झाली आहे. तू तिच्या या जातीची वाढ जलद होते आणि आंतर मशागत,हवामान आणि जमीन यांना चांगला प्रतिसाद देते. या जातीचे उत्पादन श्रीलंका, बांगलादेश,फिलिपाइन्स व थायलंड या देशांत प्रचलित आहे. या जातीमध्ये पानातील पाण्याचे प्रमाण 70 टक्के तसेच प्रथिनांचे प्रमाण 21 टक्के त्यासोबतच शर्करेचे प्रमाण हे 11.5टक्के व मुळे फुटण्याचे प्रमाण 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे. या जातीच्या फांद्या सरळ व हिरवट करड्या रंगाचे, पाने साधी असून एकमेकांसमोर रचना असलेली आहेत.

उत्पादन-आठ हजार किलोग्रॅम प्रति एकर प्रति वर्ष तुटी पानाचे उत्पादन मिळते.तर बागायती क्षेत्रावर पंधरा हजार किलोग्रॅम प्रति एकर प्रति वर्ष पानाचे उत्पादन मिळते.

  • एस-30 -या जातीची झाडे साधे वळणदार, खडबडीत, करड्या फांद्या असणारे असतात.पाने सरळ एकमेकांसमोर पानांची रचना नरम व बोटाच्या आकाराप्रमाणे असते. या जातीचे उत्पादन बागायती शेतीमध्ये एमपाच या जातीप्रमाणे योग्य ती जमीन व रासायनिक मात्रा दिल्या नंतर उत्पादन अधिक वाढते.

उत्पादन- 10000 किलोग्रॅम प्रति एकर प्रति वर्ष तुती पानाचे उत्पादन मिळते.

  • आर.सी.1/2-या तुतीच्या जातीला गरिबांची तुतीअसे म्हटले जाते.. कारण या जातीच्या तुतीचे उत्पादन घेण्यासाठी उत्पादन खर्च अतिशय कमी होतो. त्यामुळे गरीब शेतकरीरेशीम शेती उत्पादनात जाणीवपूर्वक या जातीची लागवड करतात. या जातीमध्ये 90% पेक्षा जास्त मुळे फुटण्याची शक्यता आहे.तसेच या जातीचे उत्पादन घेण्यासाठी अत्यंत कमी खतांची मात्रा सुद्धा चालते. उत्पादनावर कुठल्याही प्रकारचा अनिष्ट परिणाम होत नाही.या जातीपासून उत्पादन हे दहा हजार किलो प्रती एकर प्रतिवर्षी तुती पानाचे उत्पादन मिळते.
  • सहना-ही जात केंद्रीय रेशीम संशोधन व प्रशिक्षण संस्था, मैसूर यांनी विकसित केली आहे. ही जात सावलीमध्ये वाढणारी उत्तम जात आहे. या जातीचा दक्षिण भारतात प्रामुख्याने नारळ बागेमध्ये आंतरपीक म्हणून लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. महाराष्ट्रातही शासनामार्फत मोठ्या प्रमाणावर फळबाग विकास कार्यक्रम राबविला जातो.
  • फळबागेत प्रारंभिक काळात मुख्य पिकापासून साधारणतः चार ते पाच वर्षे उत्पादन मिळू शकत नाही. अशावेळी इतर पिकांचे आंतरपीक म्हणून लागवड करणे शेतकऱ्यांना फायद्याचे ठरते.कोकण पट्ट्यात इतर फळबागांमध्ये किंवा नारळ बागेत लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त अशी जात आहे. या जातीपासून दहा हजार किलोग्रॅम प्रति एकर प्रति वर्षी तुती पानाचे उत्पादन मिळते.
  • एस- 34 ही जात पावसाळी हंगामात चांगले वाढते. या जातीची निर्मिती एस30 आणि सी 76 या जातीच्या नियंत्रित पद्धतीने परागसिंचन करून केलेली आहे. झाडांच्या फांद्या वळणदार आणि हिरवट करड्या पाणी बोटाच्या आकाराच्या असून गडद हिरव्या रंगाच्या असतात.या जातीपासून पाच ते सहा हजार किलोग्रॅम प्रति एकर प्रति वर्षी तुती पानाचे उत्पादन मिळते. ( संदर्भ-मॉडर्न ॲग्रोटेक )
English Summary: a benificial veriety of mulberry those give most advantage to farmer
Published on: 26 December 2021, 06:27 IST