देशातील खरीप हंगाम (Kharip season) सध्या संपण्याच्या मार्गावर आहे. तसेच या हंगामातील पिकांच्या काढणीला वेग आला आहे. तसेच काही भागात पिकांची काढणी झाली असून रब्बी हंगामातील (Rabi season) पिके घेण्यासाठी शेतीची मशागत (Cultivation of agriculture) सुरु झाली आहे. रब्बी हंगामामध्ये गव्हाचे मोठ्या प्रमाणात उतपादन घेतले जाते.
गव्हाच्या अनेक जाती विकसित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना निवडीनुसार गहू (wheat) पेरण्याची संधी निर्माण झाली आहे. आज शेतकऱ्यांना सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या गव्हाच्या वाणाबद्दल माहिती देणार आहोत.
गव्हाची अनेक वाण बाजारात आली आहेत. मात्र HI-8663 वाणाची (HI-8663 variety) चर्चा बाजारात होत आहे. कारण या गव्हाच्या वाणापासून हेक्टरी 95.32 क्विंटल उत्पादन मिळत आहे. HI-8663 हे जीनोटाइप वैशिष्ट्यपूर्ण हे वाण आहे.
राज्यात पावसाची दमदार बॅटिंग! काही तासांत धो धो मुसळधार कोसळणार; IMD चा इशारा
HI-8663 मध्ये ही आहे खास गोष्ट
HI-8663 मध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात, त्यामुळे बाजारात याला खूप मागणी आहे. या गव्हापासून ब्रेड व्यतिरिक्त रवा आणि पास्ता देखील बनवला जातो आणि त्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण आढळते. बाजारात या गव्हाला जास्त मागणी असल्यामुळे भावही चांगला मिळतो.
राज्यातील शेतकरी मेटाकुटीला, कांद्याला भाव मिळेना आणि सडलेल्या कांद्याचे करायचे काय?
रब्बी हंगामात गव्हाची पेरणी केली जाते. साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात गव्हाच्या पेरणीसाठी पोषक वातावरण निर्माण होते. तसेच डिसेंबर महिन्यातही गव्हाची या नवीन जातीची पेरणी केली जाऊ शकते. तसेच या जातीचे वैशिष्ट्ये असे आहे की ते लवकर परिपक्व होते आणि काढणीही लवकर केली जाते.
महत्वाच्या बातम्या:
सोने खरेदीदारांचे नशीब चमकले! सोने 6000 रुपयांनी तर चांदी 23600 स्वस्त...
नोकरदारांना नवरात्रीमध्ये मिळणार मोठी बातमी! PF खात्यात जमा होणार इतके पैसे
Published on: 21 September 2022, 01:07 IST