Agripedia

मका हे नगदी पीक आहे ज्याची लागवड रब्बी आणि खरीप हंगामातही केली जाते. बरेच शेतकरी मका पिकाची लागवड करून चांगले उत्पादन घेत असतात. आज आपण मक्याच्या काही संकरीत जातीविषयी माहिती घेणार आहोत.

Updated on 09 September, 2022 1:44 PM IST

मका हे नगदी पीक आहे ज्याची लागवड (cultivation) रब्बी आणि खरीप हंगामातही केली जाते. बरेच शेतकरी मका पिकाची लागवड करून चांगले उत्पादन घेत असतात. आज आपण मक्याच्या काही संकरीत जातीविषयी माहिती घेणार आहोत.

महत्वाचे म्हणजे मक्याची लागवड (Cultivation of maize) दुप्पट नफ्याचे पीक म्हणून देखील ओळखले जाते. अनेक वेळा दिसून आले आहे की शेतकरी मका पिकामध्ये जास्त उत्पादन घेऊ शकत नाहीत, ज्यामुळे त्यांना बाजारात चांगला नफा देखील मिळत नाही.

शेतकऱ्यांच्या या समस्येसाठी अनेक कृषी विभाग आपापल्या स्तरावर प्रयत्न करत असतात. या क्रमाने, ICAR-IIMR ने शेतकर्‍यांसाठी मक्याच्या 4 नवीन संकरित जाती लाँच केल्या आहेत, जेणेकरून शेतकर्‍यांना मका लागवडीतून चांगला फायदा होईल.

'या' शेतीची लागवड शेतकऱ्यांसाठी ठरतेय फायदेशीर; 25 लाखांपर्यंत होतोय नफा

मका पिकासाठी नवीन संकरित वाण

ICAR-IIMR संस्थेने शेतकऱ्यांसाठी मक्याच्या 4 नवीन संकरित वाण (Hybrid varieties) विकसित केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार आहे. महत्वाचे म्हणजे PMH-1 LP बाबत तज्ञांच्या मतानुसार या जातीमध्ये सुमारे 36 टक्के फायटिक ऍसिड आणि 140 टक्के अजैविक फॉस्फेट आढळतात. या जातीचा वापर करून शेतकरी 95 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन घेऊ शकतात.

१) मका PMH-1 LP

२)IMH-222(IMH-222)

३)IMH-223 (IMH-223)

४)IMH-224 (IMH-224)

फक्त एकदाच गुंतवणूक करा आणि मिळवा 15 हजार रुपयांपर्यंत महिना पेन्शन

या जातींचे फायदे

या जातींच्या पिकावर कीड-रोग येण्याची शक्यता फारच कमी असते. या जाती पिकातील मायडीस लीफ ब्लाइट, टर्सिकम लीफ ब्लाइट, कोळसा कुजणे (Coal decay) यासारख्या धोकादायक रोगांपासून संरक्षणात्मक आहे. याशिवाय या जातीवर मक्याच्या खोडया व फॉल आर्मीवॉर्म किडीचा प्रभाव कमी असल्याचेही दिसून आले आहे.

महत्वाच्या बातम्या 
जनावरांच्या आहारात करा 'या' खाद्याचा वापर; दुग्ध उत्पादनात होईल वाढ
सावधान! शरीरात वारंवार वेदना होत असतील तर आजारांची लक्षणे असू शकतात
शेतकऱ्यांनो मोत्यांची शेती करून मिळवा लाखों रुपये; जाणून घ्या संपूर्ण माहिती

English Summary: 4 new maize hybrids launched beneficial farmers
Published on: 09 September 2022, 01:38 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)