Agripedia

भारतात गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. इतर धान्यांप्रमाणे गहू पिकालाही मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जाते. बरेच शेतकरी गहू लागवडीतून चांगले उत्पादन घेत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादन होणाऱ्या गहू जातीविषयी माहिती असणे गरजेचे आहे.

Updated on 23 September, 2022 10:29 AM IST

भारतात गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. इतर धान्यांप्रमाणे गहू पिकालाही मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जाते. बरेच शेतकरी गहू लागवडीतून (Cultivation of wheat) चांगले उत्पादन घेत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादन होणाऱ्या गहू जातीविषयी माहिती असणे गरजेचे आहे.

विशेष म्हणजे रब्बी हंगामातील मुख्य पिकं म्हणून बहुतांश शेतकरी गव्हाला पहिली पसंती देतात. रब्बी हंगामात गव्हाची लागवड ऑक्टोंबर ते नोव्हेंबर महिन्यात केली जाते. सध्या याची तयारी सुरू असताना पाहायला मिळत आहे.

या पार्श्‍वभूमीवर आज आपण भारतीय कृषी संशोधन (Indian Agricultural Research) परिषद आणि भारतीय गहू आणि बार्ली संशोधन संस्थांचा विश्‍वास असलेल्या गव्हाच्या महत्वाच्या तीन सुधारित वाणांबद्दल माहिती जाणून घेऊया.

पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग योजनेला केंद्र सरकारकडून 10 लाख रुपयांचे अनुदान जाहीर

करण नरेंद्र

आपण या वाणाविषयी पाहिले तर २०१९ मध्ये गव्हाची ही जात बाजारात आली आहे. या गव्हाच्या वाणाची २५ ऑक्टोंबर ते २५ नोव्हेंबर दरम्यान पेरणी करता येते.

या गव्हाच्या वाणाला (A variety of wheat) ब्रेडचा दर्जा चांगला मानला जातो. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे इतर जातींना ५ ते ६ सिंचनाची आवश्यकता असली तरी यामध्ये फक्त ४ सिंचनाची गरज असते. विशेष म्हणजे या जातीचे पीक १४३ दिवसांत तयार होते, जे ७५.१ ते ९० क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन देते.

शेत जमीन खरेदी-विक्रीमध्ये केला मोठा बदल; सरकारच्या निर्णयाने शेतकरी चिंतामुक्त

करण वंदना

आपण करण वंदना (karan vandna) या वाणाविषयी पाहिले तर या जातीच्या गव्हावर पिवळा गंज आणि ब्लास्ट यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी असतो. ही जात गंगा किनारी भागासाठी चांगली मानली जाते. या जातीसह, पीक सुमारे १२० दिवसात परिपक्वतेसाठी तयार होते, जे प्रति हेक्टरी ७५ ते ९० क्विंटल गव्हाचे उत्पादन सहज देते.

करण श्रिया

करण मिश्रा या वाणाविषयी पाहिले तर गव्हाची ही जात जून २०२१ मध्ये आलेल्या नवीन जातींपैकी एक आहे. या जातीची पेरणी उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल सारख्या राज्यांमध्ये जास्त होते, जी सुमारे १२७ दिवसात परिपक्व होते आणि फक्त एक सिंचन आवश्यक असते. ही जात प्रति हेक्टरी ५५ क्विंटल उत्पादन देते.

महत्वाच्या बातम्या 
'या' बाजारसमितीत सोयाबीनला मिळाला सर्वाधिक बाजारभाव; जाणून घ्या
25 सप्टेंबरपासून 'या' राशींच्या लोकांचे सोनेरी दिवस सुरु होणार; वाचा तुमचे राशीभविष्य
'या' औधषी वनस्पतीची एकदाच लागवड करा आणि तीन वेळा कापणी करत कमवा लाखों रुपये

English Summary: 3 varieties wheat benefit farmers 90 quintals production 120 days
Published on: 23 September 2022, 10:27 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)