Agripedia

देशातील कृषी विद्यापीठे तसेच विविध संशोधन संस्था यांनी २००७ ते २०१९ या कालावधीत प्रसारित केलेल्या

Updated on 19 April, 2022 12:41 PM IST

परभणी: देशातील कृषी विद्यापीठे तसेच विविध संशोधन संस्था यांनी २००७ ते २०१९ या कालावधीत प्रसारित केलेल्या सोयाबीनच्या २१ वाणांची राज्यात लागवडीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे. खरिपातील ज्वारी, बाजरी, मूग, उडीद या पिकांच्या तुलनेत सोयाबीनची उत्पादकता जास्त आहे. तसेच कमी कालावधीचे असल्याने रब्बी हंगामात राज्यातील सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. खरिपाच्या एकूण क्षेत्राच्या ३० टक्के क्षेत्र या पिकाचे आहे. २०१५-१६ ते २०१९-२० या सहा वर्षांच्या कालावधीत सोयाबीनचे क्षेत्र ३८ लाख ८७ हेक्टर एवढे राहिले. या कालावधीत उत्पादकता प्रतिहेक्टरी १०.१० क्विंटल एवढी राहिली. राज्यातील एकूण क्षेत्रापैकी ५० टक्केपेक्षा जास्त प्राबल्य असलेले तसेच शेतकऱ्यांचा प्रतिसाद असलेले सोयाबीनचे जे.एस.३३५ आणि जे.एस.९३०५ हे वाण आहेत. परंतु या वाणांसाखे गुणधर्म असलेल्या नवीन वाणांची कमतरता आहे. 

यंदा उत्पादकता वाढली : कृषी विभागाच्या दुसऱ्या अंदाजानुसार २०२०-२१ मध्ये राज्यात ४३ लाख ५७ हजार हेक्टर क्षेत्र होते. राज्याची सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी १४.२४ क्विंटल आली. लातूर विभागातील उत्पादकता प्रतिहेक्टरी १४.८६ क्विंटल तर अमरावती विभागातील उत्पादकता १२.६९ क्विंटल आली. लातूर, नांदेड, उस्मानाबाद, बुलडाणा जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र जास्त आहे. उस्मानाबाद, बीड, सोलापूर तसेच पूर्व विदर्भातील जिल्ह्याची सरासरी उत्पादकता कमी आहे. सांगली, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांची उत्पादकता जास्त असली तरी क्षेत्र कमी आहे.

संस्था निहाय शिफारशीत वाण, प्रसारणाचे वर्ष महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी : एएमएस -१००१, केडीएस-७२६ (फुले संगम) (सन २०१९), केडीएस-३४४ (फुले अग्रणी) (२०१५). वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी : एमएयुएस -६१२ (सन २०१८), एमएयुएस -१६२ ( २०१४). एमएयुएस-१५८ (२०१०). जेएनकेव्हिव्हि जबलपूर : जे.एस.-२०-९८ (२०१८). जेएस-२०-६९ (२०१६), जेएस-२०-२९, जेएएस -२०-३४ (२०१४). जेएस ९७-५२ (२००८). 

जेएएस ९५-६० (२००७). अ.भा. सोयाबीन संशोधन प्रकल्प, युएएस, धारवाड : डिएसबी-२३ (२०१८). डिएसबी-२१ (२०१५). डिएसबी-१ (२००९). डिएस -२२८ (२००७). कृषी महाविद्यालय, कोल्हापूर : केएस १०३, राज सोया (आरव्हिएस -२००२-४) (२०१८). आघारकर संशोधन संस्था, पुणे : एमएसीएस १२८१ (२०१६), एमएसीएस ११८८ (२०१३).एनआरसी, इंदौर : एनआरसी-८६ (अहिल्या-६) (२०१५)

English Summary: 21 varieties of soybean recommended for the state
Published on: 19 April 2022, 12:39 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)