Agripedia

जर तुम्ही शेती करता आणि शेतीला तुम्ही व्यावसायिक दृष्टिकोनातून बघत असाल तर मिरची लागवड हा एक फार उपयुक्त अशी व्यावसायिक कल्पना ठरू शकते.या माध्यमातून चांगली कमाई होऊ शकते. मिरची हे जरी स्वादाच्या बाबतीत तिखट असली परंतु यापासून मिळणारे कमाई मुळे आयुष्यात एक गोडवा उत्पन्न करण्याचे काम मिरचीमुळे होऊ शकते.

Updated on 14 November, 2021 1:33 PM IST

जर तुम्ही शेती करता आणि शेतीला तुम्ही व्यावसायिक दृष्टिकोनातून बघत असाल तर मिरची लागवड हा एक फार उपयुक्त अशी व्यावसायिक कल्पना ठरू शकते.या माध्यमातून चांगली कमाई होऊ शकते. मिरची हे जरी स्वादाच्या बाबतीत तिखट असली परंतु यापासून मिळणारे कमाई मुळे  आयुष्यात एक गोडवा उत्पन्न करण्याचे काम मिरचीमुळे होऊ शकते.

या लेखात आपण माहिती घेऊ की,मिरची लागवडीसाठी दोन ते तीन लाख रुपये गुंतवणूक करून नऊ ते दहा महिन्यांमध्ये बारा लाख रुपयांपर्यंत नफा कमवला जाऊ शकतो.

 अशा पद्धतीने करावी मिरचीची शेती

 आपल्याला माहिती आहेच की कुठल्याही पिकासाठीवेळेवर खतांची मात्रा,पाणी अशा बऱ्याच घटकांची गरज असते तसेचमिरची साठी सुद्धा वेळेत खतांचा पुरवठा,सिंचनाची पुरेशी व्यवस्था, कीटकनाशक,  हार्वेस्टिंग आणि मार्केटिंग या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे आणि नियोजन पद्धतीने करावे लागतात.ढोबळ मानाने विचार केला तर यामध्ये सात ते आठ किलो मिरचीचे बियाणे ची गरज असते.

यासाठी 20 ते 25 हजार रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.यामधील हायब्रीड मगधीरा बियाण्याचा विचार केला तर याची किंमत 40 हजार रुपये आहे. एका हेक्टर मध्ये मिरची लागवडीचा विचार केला तर बियाण्यापासून तर इतर खर्च हा कमीत कमी अडीच ते तीन लाख रुपयांपर्यंत येतो.

 दोन ते तीन लाख रुपयात सुरू करा मिरचीची शेती

 जर तुम्हाला मिरचीची लागवड करायचे असेल तर एक हेक्टर जमीन असेल तर उत्तमच आहे. मिरचीची लागवड ही बेड बनवून केली जाते. मिरची लागवडीसाठी उत्तम प्रकारचे हायब्रीड बियाणे निवडणे महत्वाचे आहे. मिरचीच्या रोपांची लागवड ही दोन फुटांवर करणे योग्य असते.तसेच दोन वाफे म्हणजेच बेडमध्ये कमीत कमी दोन ते तीन फुटांची अंतर असणे महत्त्वाचे आहे.

जर तुम्ही मगधीरा या हायब्रीड मिरचीची लागवड करायचे ठरवले तर या जातीच्या मिरचीपासून एका हेक्‍टरमध्ये जवळजवळ 250 ते 300 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते. उदाहरणार्थ जर आपण विचार केला तर समजा मिरची 50 रुपये प्रति किलो या भावाने विकली जात असेल तर 300 क्विंटल मिरची पासून जवळचा 15 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.  म्हणजे खर्च वजा जाता एका एकर मध्ये कमीत कमी बारा लाख रुपये निव्वळ नफा मिळू शकतो. जरी तीस रुपये प्रतिकिलो घेतली गेली तरीसुद्धा 300 क्विंटल मिरची पासून नऊ लाख रुपये उत्पन्न मिळू शकते.

English Summary: 2 lakh invest in chiily cultivation and earn 12 lakh in 10 month
Published on: 14 November 2021, 01:33 IST