मिळेल का इथून होते आणि शेवट हातात आलेलं उत्पादनाला बाजारभाव मिळेल का? ह्या काळजीने होतो.नफा झाला किंवा तोटा झाला तरीही शेतकरी
जमीन कसायच सोडत नाही. कर्ज काढून पिकवेल पण शेती सोडत नाही. बरेच प्रयोग करतो. एखादे पीक बदलून बघतो ,एखादा चांगला मार्गदर्शक हुडकतो,शेती कसायची पध्दत बदलतो किंवा एखादे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करतो.काही वर्षांपासून आमचा हाती जिवाणू खत व जैविक बुरशीनाशकांची तंत्रज्ञान हाती आले.
२०१६ साली आम्ही आमचा दीड एकर क्षेत्रावर केळी पिकाची लागवड केली. झाडांची वाढ चांगली झाली होती.घड चांगले वजन देईल ह्याची खात्री वाटत होती. त्याच वेळी वळीव पावसाबरोबर जोराचे वारे वाहू लागले. दुसर्या दिवशी निसर्गाचा कोप पाहून डोळ्यात अश्रु आले. एकूण दोन हजार झाडं भुईसपाट झाली होती.
केळीची लागण वाया गेली होती. लागणीतून हाती काही आलं नाही आता खोडव्यातून खर्च भरून काढू असा विचार केला आणि कामाला लागलो. पुढचा वर्षी चांगली घडं पडली. आता आपला मागचा ही हिशोब भरून निघेल अस वाटू लागलं. पण निसर्गाला आमची परीक्षा घ्यायचीच होती. ह्यावेळी आकाशात ढग नाही पाऊस नाही वळीवचे काही संकेत नसताना एक छोटंसं वावटळ तयार झाले आणि आमची तीनशे झाडं घेऊन गेले. दोन वर्षे केले कष्ट गुंतवलेले पैसा सगळा वाया गेला. शेती सोडून दुसरा धंदा पकडावा अस वाटत होतं. रोज शिव्या खाऊन नोकरी केलेली बरी वाटत होती. महिन्याचा शेवटी चार पैसे तर हाती लागतील अशी भावना मना मध्ये होती.त्या क्षेत्रावर जे काही थोडं उत्पादन हाती आलं त्यात समाधान मानून एक नवीन अध्याय सुरू करायचे ठरवले. आता केळी ऐवजी तिथे ऊस लावायचं ठरवलं. कारण शेजारी एक मोठा ऊस होता.जरी वादळ किंवा वावटळ आले तरीही आमचे पीक शाबूत राहील. त्यामुळे आपला ऊस वाचेल असं वाटलं.
२१ मार्च,२०१८ला आम्ही ८६०३२ ह्या वाणाची लागवड केली. ह्यावेळी कारखान्यातून हुडकून फौंडेशनचे बेणे लावले. ४.५×१.५ फुटावर एक डोळा लागण केली. लागणीवेळेस बेसल डोस घातला नाही. पाहिेले दीड महिने त्यावर कोणताही उपचार केला नाही. नंतर आम्ही त्यावर जिवाणू खतांचा वापर करायला सुरुवात केली. महिन्यातून एकदा जिवाणू खत व जीवामृतचा वापर त्या जमिनी मध्ये करू लागलो.काही दिवसांनी पीक बोलू लागले. पानावरची काळोखी,गादी सारखी मऊ माती आम्हाला आमचा प्रयोगाचा सफलतेची साक्ष देत होते. बघताबघता ऊस ३.५ महिन्याचा झाला. पाच ते सहा कांडी ऊस तयार होता. आम्ही बाळभरणी करायचा निर्णय घेतला. बाळभरणी झाली आणि पुढील एक महिन्यात ऊस एवढा झपाट्याने वाढला की पक्की भरणी चुकली.वळीव पाऊस पडला वादळ आलं पण ऊस लहान असल्यामुळे शाबूत राहिला. पावसाळा सुरू झाला.आम्ही जीवणुखत व जीवामृतचा वापर दर महिन्याला न चुकता करू लागलो. दिवसेंदिवस परिस्थिती सुधारत होती. शेजारी विचारत होते कोणते औषध सोडलं आहे?बघताबघता पावसाळा संपला आणि ऑक्टोबर हिटचीसुरुवात झाली.आता आमचा ऊस शेजारचा उसाचा तुलनेने खूप उंच गेला होता. आता वादळ आले तर वारं थेट आमचा उसा वर आदळणार हे निश्चित. एक दिवस काहीही संकेत न देता एखाद्या आमंत्रित न केलेल्या पाहुण्यासारखं वरूनराजाने वायू देवाचा मदतीने आमचा शेतावर अवतरले. फक्त दहा मिनिटांचा तांडवाने ऊस भुईसपाट झाला. उसाची झालेली अवस्था पाहून हे निश्चित झाले की हा ऊस आता ठेवला तर रानात उंदीर वाढतील. आम्ही ह्या उसाचा चा बेनेमळा केला.एक एकर मधून सात महिन्यात ४७ टन उत्पादन हाती आले.पूर्वी आम्ही सोळा महिने ठेवला तरीही एवढे उत्पादन हाती लागत नव्हते. ह्यावेळी सात महिन्यातच आम्ही ४७ टनाचे उत्पादन घेतले.७ महिन्यात १८ कांडी ऊस तयार होता.
आम्ही त्यावेळी बऱ्याच शेतकऱ्यांना ऊस दाखवला. नंतर आलेला अनुभव शेतकऱ्यांना सांगायचं हेतूने एक पोस्ट तयार केली. त्यावर रिप्लाय असा यायचा की हे शक्यच नाही. कांडी धरायला तीन महिने घेतंय आणि तुमचा ऊस सात महिन्यात अठरा कांडी कसा जाऊ शकतो. पुरावा म्हणून माझा कडे असलेल्या फोटो शिवाय काहीच नव्हते.
फेब्रुवारी,२०१९ मध्ये आम्ही आमचा अर्धा एकर क्षेत्रावर उसाची रोप लागण केली. ह्यावेळीही पूर्वी सारखाच ऊस आणायचा आम्ही ठरवल. पण दुर्दैवाने रोपांचा दर्जा समाधानकारक नव्हता आम्ही एक महिना रोप बसवण्यासाठी प्रयत्न करू लागलो. मी एक जिवाणूंची शेड्युल तयार केले. आणि जोपर्यंत हे शेड्युल पूर्ण होत नाही तोपर्यंत पिकाकडे न बघण्याचा संकल्प केला,जेणेकरून आमचे लक्ष फक्त शेड्युल वर केंद्रित राहील.जे आहे त्या शेड्युलचे पालन करायचं ठरवलं.दर तीन दिवसाला आम्ही जिवाणू व जीवामृताचा वापर करायचो. आम्हाला एक महिन्यानंतर त्याचा परिणाम दिसून आला. जिवाणूंचे शेड्युल सुरू केला त्यावेळी ऊस हा आमचा गुढघ्याला लागत होता. शेड्युल संपल्यावर ऊस आमचा डोक्यावर गेला होता. शेड्युल एक महिन्याचा होता. ऐका महिन्यात चार फुटाची वाढ नोंदवली. ह्याही उसाला वाऱ्याने भुईसपाट केले. ह्यावेळी दर तीन दिवसांनी जिवाणू खतांचा वापर करण्याचे सातत्य ठेवल्यामुळे जमिनीत वाफसा स्थिती निर्माण झाली. त्यामुळे मुळीची लांबी वाढत होती. पांढऱ्या मुळ्यांची संख्या ही भरपूर होती.
ह्या वर्षी २१ फेब्रुवारी,२०२० ला आणखी ऐका दीड एकर क्षेत्रावर उसाची लागण केली आहे. ह्या क्षेत्रावर पूर्वी हळदीचे पीक घेतलं होतं. त्याचा बेवडचा फायदा होईल अशी आशा होती. मागचे दोन प्रयोग सातत्याने करायचे ठरवले. शक्यतो शेतकरी ऊस लागणी पासून पक्की भरणी होऊ पर्यंत पाटाने पाणी देतात. आम्ही सुरुवाती पासून ठिबक सिंचनाचा वापर करतो. त्यामुळे पिकाकडे बघून पुढील नियोजन करणे सोपे जाते.त्या क्षेत्रावर आम्ही रासायनिक खते दर आठवड्याला ३किलो युरिया आणि ३किलो पोटॅश एकरी प्रमाणे वापरत होतो. सगळे खत एकदम टाकण्या पेक्षा दर आठवड्याला थोडे थोडे वापरल्यास त्यांची कार्यक्षमता वाढते. खत वरचेवर अन्नद्रव्ये शोषण करणाऱ्या मुळ्या द्वारे शोषण केले जाते आणि झाडाची वाढ नियमित होत राहते. त्या ठिकाणी जर एकाच वेळेस खत दिले तर नत्र जमिनीतून निचऱ्या वाटे बाहेर जातो,स्फुरद व पालाश जमिनीत स्थिर होतो.असे थोड्या थोड्या प्रमाणात दिल्यामुळे खत वरचेवर मुळी द्वारे शोषण केले जाते व त्यांची कार्यक्षमता वाढते. आणखी एका प्रयोगामध्ये आम्ही सातत्य ठेवले होते. आम्ही दर तीन दिवसातून एकदा ह्या क्षेत्रावर जिवाणू खत आणि जीवामृतचा वापर सातत्याने करत होतो. एकही वेळेस त्या कृती मध्ये खंड पडणार नाही ह्याची काळजी घेतली जात होती. त्यामध्ये आम्ही वेगवेगळी जिवाणू जसे स्फुरद उपलब्ध करणारे जिवाणू,पालाश उपलब्ध करणारे जिवाणू, नत्र उपलब्ध करणारे जिवाणू,सिलिकॉन उपलब्ध करणारे जिवाणू,सुष्मन्नद्रव्य उपलब्ध करणारे जिवाणू ह्यांचा वापर सातत्याने पिकाची गरज ओळखून केला जात होता. कीड व्यवस्थापन करण्यासाठी बिवेरीया मेंटरहीझम चा वापर केला जात असे.
त्यामुळे हुमणी किड व त्याचा अत्याचारा पासून आम्ही मुक्त झालो. मुळ कुज किंवा तांबीरा रोगा पासून बचाव करण्यासाठी आम्ही पूर्वी पासून ट्रायकोडर्मा ,सुडोमोनास व बेसिलस सबटीलिस ह्या जिवाणूंची वापर सातत्याने करत होतो.आम्हाला खोड किडीचाही त्रास झाला नाही. कीड आणि रोग व्यवस्थापनासाठी आम्ही त्याचा प्रादुर्भाव होण्या आधी काम केले त्यामुळे एकाही रोगाला आमचे पीक बळी पडले नाही. दर तीन दिवसाला जैविक निविष्ठांचा वापर केल्यामुळे जमीन भुसभुशीत राहत असे. माती बहुतांश वेळा वाफसा स्थिती मध्ये असायची. त्यामुळे मुळ्यांची वाढ ही सातत्याने एक सारखी होत असे.ह्या उसासाठी मी वातावरणाचीही मदद घेतली आहे. ह्या उसाची लागण उन्हाळ्यात झाली असल्या कारणाने उन्हाळ्यात दर चार दिवसात जिवाणूंची किणवन प्रक्रिया पूर्ण होत होती. मला एक गोष्ट माहिती होती की जो काही ऊस आहे तो आत्ताच झपाट्याने वाढणार आहे. त्यासाठी दर चार दिवसांत एकदा जैविक निविष्ठांचा वापर होत असे.पुढे पावसाळ्यात वातावरण जिवाणूंची किनवन प्रक्रियेसाठी अतिशय पोषक होतो. तापमान २२℃ ते
२८℃चा आसपास असतो व हवेतील आद्रता ही ६०%-८०% चा जवळपास असते जी जिवाणूंची वृद्धीसाठी अतिशय पोषक असते.पावसाळ्यात दर तीन दिवसाला जिवाणूंची किणवन प्रक्रिया पूर्ण होत असे. त्यामुळे ह्या वातावरणाचा भरपूर फायदा आम्ही ह्या वर्षी करून घेतला. वरील नमूद केलेल्या सर्व प्रयोगांचे फल प्राप्ती म्हणजे आमचा ७ महिन्यात १७ कांडी धरलेला ऊस.
खाली ह्या प्लॉटचा विडिओ आहे. हा व्हिडिओ २८ सप्टेंबर रोजी घेतला आहे. उसाचे वय सात महिने सात दिवस आहे. एकूण १७ कांडी ऊस तयार आहे. मी माझा पूर्वीचा रेकॉर्ड सात महिन्यात अठरा कांडी ऊस पिकवायचे तोडण्यास कमी पडलो पण सध्याचा प्लॉटने खुप काही शिकवले.
विवेक पाटील,सांगली
९३२५८९३३१९
प्रतिनिधी - गोपाल उगले
Published on: 08 October 2021, 10:02 IST