Agriculture Processing

सणांच्या काळात गहू, गहू पीठ (wheat Flour), रवा आणि मैद्याचे भाव गगणाला भिडण्याची शक्यता आहे. या काळात शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या धान्याला चांगला दर मिळू शकतो.

Updated on 23 August, 2022 3:32 PM IST

सणांच्या काळात गहू, गहू पीठ (wheat Flour), रवा आणि मैद्याचे भाव गगणाला भिडण्याची शक्यता आहे. या काळात शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या धान्याला चांगला दर मिळू शकतो.

परंतु यामुळे महागाईच्या (Inflation) झळा सोसणाऱ्या ग्राहकांसाठी सणांचा आनंद साजरा करणे महाग होणार आहे. गहू हे देशाचं मुख्य धान्य. जगात गहू उत्पादनात भारत पहिल्या पाचमध्ये आहे.

सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये सण आहेत. सणांच्या काळात गहू पीठ, रवा आणि मैद्याला जास्त मागणी असते. मागणी असल्यानं पीठ गिरण्या महाग गहू खरेदी करून प्रक्रिया करतील. पण याचा बोजा मात्र ग्राहकांवरच पडणार आहे.

Green Manure: पिकांना युरिया खताची गरज भासणार नाही; आता घरीच शेतात बनवा हिरवळीचे खत

सध्या आपण पाहिले तर ग्राहकांना किरकोळ बाजारात गव्हाची ३००० रुपये ते ३६०० रुपये प्रतिक्विंटलनं गव्हाची खरेदी करावी लागत आहे. पुढील काळात आणखी गहू दर वाढल्यास ग्राहकांसाठी सण साजरं करणे महागडं ठरणार आहे.

देशातील सर्वच बाजारांमध्ये गव्हाचे दर वाढतच आहेत. गेल्या आठवडाभरात गहू दर क्विंटलमागे सरासरी १०० रुपयाने वाढले. गव्हाचा दरासरी भाव सध्या २५५० रुपये ते २६०० रुपयांवर पोचला आहे. आज मध्य प्रदेशात गव्हाला प्रतिक्विंटल २५५० रुपये दर मिळाला, तर आज राजस्थानमध्ये २६०० रुपयाने गव्हाचे व्यवहार झाले.

काय सांगता! आता हवेतही घेता येणार बटाट्याचे उत्पादन; एरोपोनिक तंत्रज्ञानाची कमाल

गव्हाचे वाढते दर पाहून सरकार आयातीला परवानगी देईल असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र देशात गव्हाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे म्हणत गहू आयात करण्याची गरज नाही, असे सरकारनं नुकतंच स्पष्ट केले आहे. मात्र सरकाच्या निर्णयाने गव्हाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या 
गॅस सिलिंडर धारकांसाठी महत्वाची बातमी; एलपीजीवर सबसिडी सुरू, मिळतेय 'इतकी' रक्कम
Gold Bond Scheme: सरकारच्या गोल्ड बाँड योजनेत गुंतवणूक करून मिळवा मोठा फायदा; वाचा सविस्तर
Agriculture Without Soil: मातीविना शेती करता येणार 'या' तंत्राने; शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार

English Summary: Wheat Rate farmers Comforter middle night
Published on: 23 August 2022, 03:23 IST