द्राक्षाच्या अधिक उत्पादन व दर्जा यांमध्ये सुधारणा होत आहे.अशा चांगल्या प्रतीच्या द्राक्षांपासून उत्कृष्ट बेदाणे बनवून मार्केटला पाठवल्यास आपल्याला अधिकचा आर्थिक फायदा होत असतो. ही गोष्ट लक्षात घेतली असता द्राक्ष विक्रीपेक्षा बेदाण्यास साठीच द्राक्ष उत्पादित करुन असा बेदाणा विकल्यास दुप्पट-तिप्पट फायदेशीर ठरेल. प्रामुख्याने बेदाण्यासाठी थॉम्प्सन सीडलेस या जातीचा वापर करण्यात येतो.
दर्जेदार बेदाणा कोणत्या प्रकारचा असावा
- बेदाण्याच्या उपयुक्त अशा जातीपासून योग्यप्रकारे तयार केलेल्या बेदाणा मध्ये खालील वैशिष्ट्य असायला हवीत.
- बेदाण्याच्या तेजस्वी नैसर्गिक रंग शक्य तेवढा टिकणे चांगल्या प्रतीच्या बियाण्यांच्या बाबतीत अपेक्षित असते. हिरव्या द्राक्षापासून बनवलेल्या पिवळसर रंगाचा बेदाण्यास जास्त मागणी असल्याने आढळते. एकंदरीतच चांगल्या प्रतीच्या बेदाण्यास साठी रंगातील एकसारखेपणा महत्त्वाचा घटक आहे.
- बेदाण्याच्या आकारातील एकसारखेपणास प्रतीच्या दृष्टीने महत्त्व असते. याशिवाय बेदाण्यातील मांसल गर हादेखील प्रत वाढवण्यास कारणीभूत ठरतो.
- बेदाण्याचा पोत, चमकदारपणा, लवचिकता म्हणजेच बोटांमध्ये दाबल्यानंतर पुन्हा पूर्ववत आकार देण्याची क्षमता. चांगल्या प्रतीच्या बेदाण्याच्या बाहेरील घराचा पोत चांगला असणे, म्हणजे त्या बेदाण्यास असंख्य सूक्षमऊ सुरकुत्या असणे होय. लांबलचक मोठ्या कोनात्मक सुरकुत्या कमी प्रतीचा बेदाणा दर्शवतात.
- बेदाणातील यातील ओलावा हा एक सारखा असावा आणि वजनाच्या मानाने त्याचे प्रमाण १३ ते १४ टक्के असावे. यामुळे बेदाण्याचे साठवणुकीतील आयुर्मान वाढते व बेदाण्याचा पोत चांगला राहतो.
- एंझ्यामिक व नॉन एन्झयेमिक ब्राऊनिंग पेशी भीती केतील कर्बोदके, पॅक्टिक पदार्थ अशा बेताने यातील महत्त्वाच्या घटकांचा ऱ्हास या बाबींचा परिणाम बेदाण्याचे साठवणुकीतील आयुर्मानवर पडतो. ताज्या द्राक्षांच्य तुलनेने बेदाण्यातील साखर, आम्ल गुणोत्तरात अर्थपूर्ण असा बदल होणार नाही, याची काळजी घ्यावी. ताजे बेदाणे गरम पाण्यात १० अंश सेल्सिअस २० मिनिटे ठेवल्यास त्याच्यापासून द्राक्षाचा नैसर्गिक आकार मिळावयास हवा.
आवश्यक बाबी
हवामान-
सुकविण्यासाठी द्राक्षशेती केल्या जाणाऱ्या भागांमध्ये ठराविक दिवसांसाठी रोजचे सरासरी तापमान १० डिग्री सेल्सिअसच्या वर असल्यास सुकविण्यासाठी आवश्यक जास्त कार्यक्षम उष्णता लाभते. २२ डिग्री सेलच्या वाढीच्या हंगामात शीतलाट किंवा पावसाच्या अतिशय कमी शक्यता आणि उष्ण, पाऊस विरहित उन्हाळा अशी परिस्थिती उत्कृष्ट बेदाणा निर्मितीसाठी उत्तम ठरते.
योग्य वाण /जाती
बेदाणा निर्मितीसाठी वाढविलेल्या जाणाऱ्या प्रमुख जाती म्हणजे थॉम्प्सन सीडलेस व त्यांचे म्युटंटस माणिक चमन व तास ए गणेश. अभ्यासातून असे निष्कर्ष मिळाले आहेत की, अर्कावती,ई12/7.ई 12/3., एच 5 क्लोन, पुसा सीडलेस आणि किष्मिष बेरी या पांढऱ्या सिडलेस जात व ब्लॅक मनुका ही रंगीत सिडलेस जात याशिवाय मस्कत ऑफ अलेक्झांड्रिया, अर्का कांचन ही बियांची द्राक्षे मनुका बनवण्यासाठी उपयुक्त आहेत. या वानांना लागणारे द्राक्षमणी हे ताजे असताना घट्ट चिकटलेले असतात. परंतु अर्धी सुकल्यानंतर देठापासून डिले होणारे व पूर्ण सुटल्यानंतर देठापासून सहजरित्या विलग होणारे असे असावेत. देठापासून घे द्राक्षमणी पूर्णतः व सहजरीत्या विलग होणे महत्त्वाचे आहे व त्याच ओळी मन्यातून रस श्रवणयाचे क्रिया न होणे गरजेचे आहे.
मण्यांचा दर्जा
मण्यांचा आकार व पक्वता ही एक सारखी असावी. साल पातळ असावी व गर घट्ट असावा. मण्यातील साखरेचे प्रमाण हे २२ ते २४ ब्रिक्स असावे. मनी अपरिपक्व किंवा अतिपक्व देखील नसावेत. मण्यांवर कुठल्याही प्रकारची इजा नसावी व सर्व मण्यांना एकसारखा आकर्षक रंग असावा.
द्राक्ष सुकविण्यासाठी आवश्यक जागेची योग्य निवड
द्राक्ष सुकवण्यासाठी वापरले जाणाऱ्या रेक्सच्या खाली जमिनीवर आच्छादन वापरणे गरजेचे आहे. रॅक असलेल्या ठिकाणी सतत परंतु संत कोरडी हवा रॅकच्या टप्प्यांमधून वहात ठेवण्याची व्यवस्था असावी. मोकळ्या व कोरड्या जागेत ठेवावयाची असेल तरी त्यातील कप्प्यांमध्ये ठराविक अंतर ठेवणे. रॅक अशाप्रकारे लावणे जेणेकरून कप यांमधील द्राक्षांपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचणार नाही. यासाठी शेडनेट सूर्याच्या दिशेने रेकवर लावणे गरजेचे आहे. सौर उर्जेवर किंवा विजेवर आधारित द्राक्ष सुकविण्यासाठी यंत्रणा वापरून द्राक्ष सुकविण्यासाठी कालावधी कमी करता येतो. अशा यंत्रणेमध्ये हवा खेळती राहण्याची व्यवस्था असावी. त्यातील आद्र हवा सतत बाहेर पडण्याच्या दृष्टीने व्यवस्था असावी. अशा यंत्रणेत ५५ ते ५८ हाऊस सेल्सिअसपर्यंत तापमान नियंत्रित केलेले असावे. अशी यंत्रणा वापरल्यास अधिक चांगल्या परिस्थितीत बेदाणा निर्मिती व त्याची साठवण करता येते.
सुकविणे पूर्वीची द्राक्षांवर केली जाणारी प्रक्रिया नैसर्गिकरित्या द्राक्षमणी हा बाष्पीभवनात प्रतिकार आहे. त्याचे कारण म्हणजे द्राक्ष मण्यावर भरपूर प्रमाणात असणारी पाण्याला न चिकटणारी तशी पांढऱ्या रंगाची ही लव मेणाच्या पातळ थरांनी बनलेले असते. ही लव घालवण्यासाठी व द्राक्ष लवकरात लवकर सुकविण्यासाठी या द्राक्ष मण्यांवर काढणीनंतर रासायनिक प्रक्रिया करणे महत्त्वाचे ठरते. सल्फर डायऑक्साईड वायूचे धुरी देणे किंवा सोडियम कार्बोनेट ऑलिव्ह ऑइल बरोबर वापरून घड कुज घडविणाऱ्या सूक्ष्म जीवांवर नियंत्रण आणता येते. बेदाण्याचे ऑक्सडेंटिव्ह ब्राऊनिंग यावर देखील नियंत्रण ठेवता येते. अशा इतर प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्तम प्रकारची बेदाणा निर्मिती करता येते.
Published on: 18 September 2020, 03:59 IST