Agriculture Processing

महाराष्ट्रामध्ये टरबूज लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.एकंदरीत भारताचा विचार केला तर उत्तर भारतातील मैदानी भागात टरबुजाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते व ती फेब्रुवारी महिन्यात केली जाते.

Updated on 25 May, 2022 12:45 PM IST

महाराष्ट्रामध्ये टरबूज लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.एकंदरीत भारताचा विचार केला तर उत्तर भारतातील मैदानी भागात टरबुजाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते व ती फेब्रुवारी महिन्यात केली जाते.

काही नद्यांच्या काठावर देखील लागवड करतात व ती लागवड नोव्हेंबर ते मार्च पर्यंत करतात.तर आपण टरबुजाच्या मार्केट दराचा विचार केलातर महिन्यामध्ये टरबुजाला चांगला भाव होता परंतु आताभाव मिळत नसल्याने काही शेतकऱ्यांनी जनावरांपुढे टरबूज टाकून देणे याला पसंती दिली आहे.कारण वाहतूक खर्चसुद्धा निघत नसल्याने शेतकऱ्यांनी हा पर्याय स्वीकारला आहे.

शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. आपल्याला माहित आहे कि टरबूज बाजारांमध्ये विकूनपैसा मिळतो परंतुटरबूज पासून इतर प्रक्रियायुक्त पदार्थ बनवता येतात व त्या विकून बंपर  नफा मिळवता येणे शक्य आहे. या लेखात आपण टरबूज पासून कुठले पदार्थ तयार करता येतात ते पाहू.

 टरबूज पासून बनतात विविध प्रक्रियायुक्त पदार्थ

1- टरबूज आईसक्रीम- सध्या उन्हाळा चालू असल्यामुळे आणि टरबूज जास्त करून उन्हाळ्यात बाजारपेठेत दाखल होते. आपल्याला माहित आहेच कि उन्हाळ्यामध्ये कुल्फी किंवा आईस्क्रीम खायला सर्वांनाच आवडते. आपण त्याचा विचार करतो का की ते आरोग्यासाठी चांगले आहे की हानिकारक.

अश्या परिस्थितीत जर तुम्ही टरबूज पासून आइस्क्रीम आणि कुल्फीबनवणे शिकलात तर तुम्हाला चांगला नफा मिळवता येऊ शकते.या टरबूज  पासून बनवलेले आईस्क्रीमला वेगवेगळ्या प्रकारच्या आईस्क्रीम कंपन्या खरेदी करतातत्या व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळवता येऊ शकतो.

2- टरबूजच्या सालीपासून बनते टूटीफ्रूटी -प्रत्येक जण टरबूज खाऊन झाले की त्याचे साल फेकून देतात. तुम्हाला माहित आहे का की या टरबुजाच्या सालीपासून टुटी फुटी बनवता येते.ही टरबूज पासून बनवलेली टूटीफ्रूटी बाजारात दुकानदारांना विकून चांगला नफा कमवू शकता.टरबुजाची चटणी देखील करता येते या चटणीला बाजारात नेहमी चांगली मागणी असते.

3 सौंदर्य उत्पादनांमध्ये टरबुजाचा उपयोग- प्रत्येक जण त्वचेची निगा राखण्यासाठी जागरूक आजीवनसत्वेहेत. त्वचेची निगा राखण्यासाठी टरबूज मध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्वे आणि अँटिऑक्सिडंट असतात. त्यामाध्यमातून तुमची त्वचा सूर्याच्या  अतिनील किरणांपासून वाचवून निरोगी ठेवतात. टरबुजाचा वापर करून तुम्ही फेस पॅक देखील बनवू शकता.

लॅक्मे सारख्या मोठ्या कंपन्या देखील टरबूज वापरून सौंदर्य उत्पादनं बनवत आहेत. टरबुजाचा वापर करून सौंदर्य उत्पादन तयार करून या कंपन्यांना विकू शकता व चांगला नफा मिळवू शकतात.

 महत्वाचे बातम्या

नक्की वाचा:वजन कमी करताना चुकूनही करू नका 'या' फळांचे सेवन; तज्ञांनी सांगितले नुकसान

नक्की वाचा:Cotton Seeds : राज्य सरकारच्या आडमुठेपणामुळे बियाणे खरेदीसाठी शेतकरी परराज्यात

नक्की वाचा:Seed News:सोयाबीनचे 'हे' वाण आहेत रोग आणि किडी साठी प्रतिरोधक, सोयाबीनच्या या नव्या वाणांचे संशोधन

English Summary: water melon processing is useful than selling water melon in market
Published on: 25 May 2022, 12:45 IST