Agriculture Processing

गांडूळ खत उपलब्ध सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत मानले जाते. गांडूळखत निर्मितीचे तंत्र सोपे असून महिला सहजरित्या हे तंत्रज्ञान आत्मसात करून शेतावर गांडूळ खताची निर्मिती करू शकतात.

Updated on 19 February, 2022 11:49 AM IST

 गांडूळ खत उपलब्ध सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत मानले जाते. गांडूळखत निर्मितीचे तंत्र सोपे असून महिला सहजरित्या हे तंत्रज्ञान आत्मसात करून शेतावर गांडूळ खताची निर्मिती करू शकतात.

  • गांडूळ खत तयार करण्याच्या पद्धती:-
  • ढीग/बिछाना पद्धत
  • खड्डा पद्धत
  • टाकी पद्धत
  • खड्डा भरण्याची पद्धत :-
  • गांडूळ खत तयार करण्यासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी.
  • गांडूळाचे कडक उन्हापासून संरक्षण होण्यासाठी बिछान्यावर छप्पर घालावे. छप्पर सिमेंटच्या पत्र्याचे किंवा शेतीमध्ये उपलब्ध असलेल्या तुराट्या, ज्वारीचे ताठे, गवत, पाचट इत्यादी किंवा बांबू वापरून करता येईल.
  • छप्पर दोन्ही बाजूंना उताराची असावे. जेणेकरून पावसाचे पाणी सहज निघून जाईल. व दोन्ही बाजूंनी होऊन येणार नाही.यासाठी छपरा तील मधील उंची 2.5 मीटर व बाजूची उंची 1.5 मीटर असावी. रुंदी 5 मीटर व लांबी 3 मीटर किंवा आवश्यकतेनुसार आणि सेंद्रिय पदार्थाच्या उपलब्धतेप्रमाणे असावे.
  • जमिनीवर सर्वात खाली तळाला 15 सेमी जाडीचा सेंद्रिय पदार्थाचा (उदा. गव्हाचे काड, उसाचे पाचट, सोयाबीन- तूर, पालापाचोळा व शेतातील इतर  वाया जाणारे सेंद्रिय पदार्थ इ.) थर द्यावा.
  • त्यावर अर्धवट कुजलेले शेणखत व माती 3:1 प्रमाणात मिसळून त्यांचा 15 सेमी जाडीचा थर द्यावा.( या थरामुळे उष्णता थांबविण्याचे काम करील.)
  • पाण्यामध्ये शेन कालवून त्याचा 10 सेमी जाडीचा तिसरा थर द्यावा.शेणामध्ये सेंद्रिय पदार्थ कुजण्याची प्रक्रिया चालू होईल. व गांडूळास खाद्य म्हणून उपयोगात आणता येईल.
  • शेवटी बिछान्यावर सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन घालावेहे आच्छादन 15 सेमी पेक्षा जास्त000 जाडीचे नसावे.
  • बिछाना पाण्याने ओला करावा.( आवश्यकतेनुसार दररोज किंवा दिवसाआड बिछान्यावर पाणी शिंपडावे)
  • बिछान्यातील  उष्णता कमी झाल्यावर एक दोन आठवड्यांनी वरील सेंद्रिय पदार्थांचा थर बाजूला करून कमीत कमी1000 प्रौढ गांडुळे सोडावी.
  • गांडूळ बिछान्यात सोडल्यावर परत सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे व बिछान्यासनियमित पाणी द्यावे.
  • गांडूळांच्या संख्येनुसार गांडूळ खत निर्मिती दीड ते दोन महिने लागतात.
  • गांडुळखत तयार करताना घ्यावयाची काळजी :-
  • बिछान्यावर पाणी टाकताना जास्त पाणी साचणार नाही व ओलावा 40 ते 50 टक्के राहील याची काळजी घ्यावी.
  • बिछान्यात तील तापमान 20 अंश ते 30 अंश सेल्सियस दरम्यान ठेवावे.व त्यावर सूर्यप्रकाश येणार नाही याची काळजी घ्यावी.
  • गांडूळ खताचा बेड जवळ वाळवी, बेडूक, साप, मुंग्या, गोम, उंदीर व कोंबड्या येणार नाहीत याची काळजी घ्यावी.
  • गांडूळ खत काढण्याची पद्धत:-

 खताचा रंग काळसर तपकिरी झाल्यावर खत तयार झाले असे समजावे खत तयार झाल्यावर पाणी देणे बंद करावे.वरचा थर  थोडा कोरडा झाला की बिछान्यावर पूर्ण गांडूळ खत गांडुळांसकट बाहेर काढावे व त्यांचा बाहेर ताडपत्रीवर किंवा गोणपाटावर शंकूच्या कृती ढीग करावा. 

म्हणजे उन्हामुळे गांडुळे तळाला जातील. दिघा च्या वरचे गांडूळ खत काढून घ्यावे.3-4 तासात सर्व गांडूळे खत तयार करण्यासाठी बिछान्यात / खड्ड्यात सोडावे. अशाच पद्धतीने खड्डा, कुंडी किंवा टाकी पद्धतीने गांडूळ खत तयार करता येते.(स्रोत-अग्रोवन)

English Summary: vermi compost making bussiness taht can give financial progress to farmer
Published on: 19 February 2022, 11:43 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)