Agriculture Processing

सध्या आपण वेगवेगळ्या व्यवसायाची माहिती व लागणारे नियोजन यासंबंधीचे लेख प्रसिद्ध करीत आहोत. जेणेकरून या माहितीचा उपयोग हा बऱ्याच सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी साहाय्यभूत ठरेल.

Updated on 12 March, 2022 9:53 AM IST

सध्या आपण वेगवेगळ्या व्यवसायाची माहिती व लागणारे नियोजन यासंबंधीचे लेख प्रसिद्ध करीत आहोत. जेणेकरून या माहितीचा उपयोग हा बऱ्याच सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी साहाय्यभूत ठरेल.

त्या दृष्टिकोनातून आमचा हा छोटासा प्रयत्न आहे.आजच्या या लेखामध्ये भाजीपाला सप्लाय  व्यवसायाविषयी आपण माहिती घेणार आहोत.त्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी लागतील त्याचे नियोजन कसे करावे या बद्दल आपण माहिती घेणार आहोत.

  • भाज्यांची निवड :

भाजीपाला सप्लायव्यवसाय करताना आपल्याला सर्वप्रथम मार्केट मिळवावे लागेल म्हणजे त्या ठिकाणाहून तुम्ही भाज्या खरेदी करून ज्या ठिकाणी विकणार आहात येथील अंतर व इतर गोष्टीच्या किमती यावरून तुम्हाला परवडेल अशी किंमत ठेवावी लागेल त्याचबरोबर भाज्या ताज्या ठेवणे हे खूप मोठे काम असत त्यामुळे शहरापासून जवळ असणारे ठिकाण बघणे हे खूप महत्त्वाचे असते. त्याचबरोबर कुठल्या भाज्यांनाजास्त मागणी आहे तसेच कुठली भाजी किती काळ टिकते हे पण माहिती असायला हवे त्यामुळे त्याबाबत तुम्हाला अभ्यास करून भाज्यांची निवड करावी लागते

  • भाजीपाला सप्लाय व्यवसाय मार्केटिंग आणि इतर गोष्टी :

हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला दोन पद्धतीने करता येईल एक म्हणजे डिजिटल मार्केटिंग द्वारे किंवा डायरेक्ट मार्केटिंग म्हणजेच वेगळ्या सोसायटीनंभेट देऊन त्यांच्या चेअरमन सोबत बोलून तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकता सर्वप्रथम तुम्हाला शेतकऱ्यांसोबत तसेच व कुठल्या फळभाज्यांचे विक्री करायची आहे हेच बोलून ठरवावे लागेल त्याच प्रमाणे तुम्हाला नियोजन करावे लागेल तुम्हाला जो माललागणार आहे त्याची आदल्यादिवशी लिस्ट बनवून शेतकऱ्यांनाचअशी ऑर्डर दिली पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही त्या शेतकऱ्यापासून खरेदी करून तुमच्या भावानुसार तुमच्या ठरलेल्या ठिकाणी भाज्या विकू शकता त्यासाठी तुम्हाला तुमचं स्वतःचं एक दुकान हवय त्याचबरोबर भाज्या ने-आण करण्यासाठी छोटास वाहन लागेल.

  • गुंतवणूक व इतर गोष्टी :

या व्यवसायासाठी तुम्हाला जवळपास एक लाखापर्यंत गुंतवणूक करावी लागेल या कामासाठी एक ते दोन लोक लागतात. जे शेतकऱ्यांपासूनभाजीपाला

 आणतील व एक जण विकण्यासाठी नेईल यामध्ये तुम्ही आधुनिक पद्धतीने पॅकिंग करून स्वतःचा ब्रँड करून विकला तर तुमच्या भाज्यांना चांगला भाव मिळू शकतो. तसेच बऱ्याच ठिकाणी सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवला जातो असे बरेच ग्राहक असतात जे सेंद्रिय खाण्यावर भर देतात. त्याचबरोबर जर तुम्ही डिजिटल ॲप द्वारे भाज्यांचे बुकिंग वगैरे असे काही ठरवू शकलात तर हे तुमच्यासाठी खूप चांगले होईल त्याद्वारे ग्राहक तुम्हाला ऑर्डर देतील त्याचबरोबर तुम्ही वेगवेगळ्या हॉटेल्स ला सुद्धा भाज्या पुरवू शकता चांगले रेस्टॉरंट थ्री स्टार हॉटेल्स यांचीसुद्धा कॉन्टॅक्ट मिळवू शकता जर तुम्ही अशा प्रकारची भाजीपुरवू शकलात कॉलिटी चांगली असली तर नक्कीच तुमच्या भाज्यांना चांगला दर मिळू शकतो.

  • भाजीपाला सप्लाय व्यवसाय थोडक्यात माहिती :
    • एकूण भांडवल -1 ते 2 लाख
    • लागणारा कच्चामाल (इतर गोष्टी)– भाजीपाला
    • मिळण्याचे ठिकाण लोकल शेतकर्‍यांकडून, भाजी मंडई
    • मशिनरी फ्रिझर पॅकेजिंग मशिन
    • मशिनरी किंमत – 10 ते 50000
    • मनुष्यबळ 2 ते 3
    • विक्री कशी कराल (ग्राहक कसे मिळवाल) – सोसायटी, रेस्टोरंट,गाठी भेटीसाठी (स्त्रोत-उद्योग आयडिया )
English Summary: vegetable supplyrs bussiness is very profitable and give financial stablity
Published on: 12 March 2022, 09:53 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)