कपाशी हे भारतातील महत्त्वपूर्ण नगदी पीक आहे.कापसाचा उपयोग प्रामुख्याने कापडनिर्मिती उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो.कापूस सोडला तर कापसापासून शिल्लक राहणारे सरकी आणि पऱ्हाट्या या टाकाऊ असल्याचे समजले जाते.जर प्रति वर्ष विचार केला तर सुमारे 30 दशलक्ष टन कापसाच्या पऱ्हाट्या मिळतात
जास्त करून या परट्याचा उपयोग हा घरगुती जळणासाठी केला जातो. आणि उरलेल्या जाळल्या जातात. परंतु मुंबई येथील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेने कपाशीच्या काढणीपश्चात उरलेला अवशेषांपासून या मूल्यवर्धित उत्पादन निर्मितीचे तंत्र विकसित केले आहे. या लेखात आपण कपाशीच्या उरलेल्या अवशेषांपासून कोणते मूल्यवर्धित उत्पादने तयार करता येतात हे पाहू.
कपाशीच्या अवशेषांपासून तयार करता येणारे मूल्यवर्धित उत्पादने
- कंपोस्ट खत- कपाशीच्या पराट्यान वर जैविक घटक आणि एनपीके ची मात्रा देऊन कुजवण्याची सुधारित व जलद प्रक्रिया विकसित करण्यात आले आहे. जर आपण पारंपरिक पद्धतीने कपाशीच्या पराठ्या कूजवण्याचे ठरवले तर त्यासाठी पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागतो. परंतु ही सुधारित पद्धत वापरली तर कंपोस्ट खत तयार होण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी लागतो. या पराठ्या पासून बनवलेले कंपोस्ट खत एक उत्तम सेंद्रिय खताचा पर्याय ठरू शकतो.
- पार्टिकल बोर्ड- कपाशीच्या पराट्या पासून पार्टिकल बोर्ड आणि ऍक्टिव्हेटेडकार्बन तयार केले आहेत. या पार्टिकल बोर्ड चा वापर हा भिंतींचे पॅनलिंगफॉल्स सिलिंग,टेबल टॉप तसेच गृह अंतर्गत सजावटीसाठी देखील याचा वापर होतो.तसेच ॲक्टिव पॅड कार्बनचा वापर हा हवा आणि पाण्याच्या शुद्धीकरणासाठी तसेच विविध वैद्यकीय कारणांसाठी होतो.
- आळंबी उत्पादनात तणस म्हणून उपयोगी- कपाशीच्या पऱ्याठ्यांचाबारीक भुसा धिंगरी अळिंबी उत्पादन साठी वापरला जातो. एका एकर मधून उपलब्ध होणाऱ्या पराट्यावर आळंदीचे लागवड केल्यास शेतकऱ्यांना प्रति एकर सहा हजार रुपयांचे उत्पन्न मिळते.
- कोंबडी खाद्य- कापूस पिंजून वेगळा केल्यानंतर शिल्लक राहणारी सरकी ही प्रथिनांचा उत्तम स्त्रोत आहे. सरकी पासून तयार केलेली सरकी पेंड रवंथ करणाऱ्या गुरांसाठी उपयुक्त असते.तसेच दुखता जनावरांना खायला दिल्यास दुधाचे प्रमाण वाढते.
- परंतु सरकी पेंड मध्ये असलेल्या गॉसिपोल या विषारी द्रव्यामुळे रवंथ न करणाऱ्या पशु पक्षासाठी घातक ठरू शकते.या संस्थेने सरकी पेंड मधील गॉसिपोल काढून टाकण्यासाठी डिगॉसीपोलाइझशनतंत्र विकसित केले आहे अशा सरकीच्या पेंडीचा वापर कुकूटपालन व मत्स्यपालनात पौष्टिक खाद्य म्हणून करता येतो.
- विटा आणि कांडी( पॅलेट्स)- टाकाऊ असलेल्या कपाशीच्या अवशेष या पासून विटा म्हणजेच ब्रिकेट्स आणि कांड्या बनवण्यात आल्या. या पॅलेट्स एलपीजी गॅस ला पर्यायी इंधन म्हणून वापरणे शक्य होते.या विटांचा वापर साखर,कागद,रबर, रासायनिक आणि अन्नप्रक्रिया उद्योगातील बॉयलर मध्ये केला जातो. रेस्टॉरंट,ढाबेइत्यादी मधील भट्ट्या मध्ये इंधनासाठी कांड यांचा वापर होतो. एलपीजी गॅस च्या तुलनेत कांडी च्या वापरामुळे इंधन खर्चात 50 टक्क्यांहून अधिक बचत होत असल्याचे निरीक्षण आहे.
Published on: 08 November 2021, 09:18 IST