महाराष्ट्रामध्ये केळीची लागवड बऱ्याच भागात मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याला तर केळीचे आगार म्हणूनच ओळखले जाते. आपल्याला माहित आहेच की केळीचे घड काढल्यानंतर केळीचे खोड निरुपयोगी म्हणून फेकून दिले जाते किंवा जाळले जाते.
परंतु या केळीच्या खोडापासून धागा निर्मिती करता येते. या लेखातआपण केळीच्या खोडापासून धागा निर्मिती कशी करतात? व त्याचे फायदे जाणून घेणार आहोत.
केळीच्या खोडापासून धागा निर्मिती
केळीच्या खोडापासून जर उत्कृष्ट प्रतीचा धागा काढायचा असेल तर त्यासाठी लाल केळी, नेंद्रण आणि रस्थालीया जातींचा वापर केला जातो. तसेच महाराष्ट्रात लागवड करण्यात येत असलेल्या श्रीमती, महालक्ष्मी, अर्धापूर तसेच ग्रँड नैन या जातीपासून देखील उत्तम प्रतींचा धागा काढता येतो. धागा काढण्यासाठी फक्त खोडाचा उपयोग करतात असे नसून तर घडाच्या दांड्याचा तसेच पानांच्याशिरेचाहिवापर करता येतो. परंतु आर्थिक दृष्ट्या फायद्याचा आणि किफायतशीर धागा हा खोडापासून बनवू शकतो. खोडाचा वापर जर धागा काढण्यासाठी करायचा असेल तर झाड कापल्या पासून 24 तासांच्या आत करावा.
धागा काढण्यासाठी तीन माणसांची आवश्यकता असते. यामध्ये एक माणूस खोड उभे चिरून त्याचे चार तुकडे करतो. यासाठी केळीचे खोड कापणी यंत्र तयार केले आहे. यामध्ये दोन फूट लांब व तीन इंच रुंदीच्या दोन धारदार पट्ट्या क्रॉसमध्ये जोडून त्यावर चारही बाजूस हँडल लावून खोडावर ठेवून दाबल्याने खोडा चे चार भागात सहज रीतीने ते कापले जाते. नंतर खोडाच्या एक मीटर पट्टी असून त्या कराव्यात. दुसरी व्यक्ती प्रत्यक्ष यंत्रावर धागा करण्याचे काम करते.
अशी असते या यंत्राची रचना
या यंत्रामध्ये 2 रिजिड पाईप बसवलेले असतात व गायडींगरोलर असतात. या रोलर मुळे केळीचे खोड आत सरकते. खोडाच्या आकारमानानुसार 2 रिजिडपाईप मधील अंतर कमी जास्त करता येते. रोलर फिरवण्यासाठी बेल्ट पुली यंत्रणा बसवलेली असते. यासाठी एक एचपी क्षमतेची सिंगल फेज मोटर पुरे होते. यंत्राच्या दुसऱ्या बाजूने निघालेले धागे पळवून त्यातील पाणी बाहेर काढले जाते.
धागेतारांवर एक दिवस वाळवतात. कोरड्या धाग्यांमध्ये विशिष्ट प्रकारची फनी फिरवून ते एकमेकांपासून वेगळे करतात.सुकवलेला धागा मोठ्या दाताच्या फणीने विंचरून घेतल्यास धाग्याची प्रत चांगली मिळते. कुशल कारागीर द्वारे आठ तासांमध्ये 20 ते 25 किलो धागा बनूशकतो. केळीच्या खोडापासून धागा काढण्याची मशीन ही सिंगल फेज आणि एक ते दीड हॉर्स पावर मोटर वर चालणारी आहे. ही मशीन हाताळायला देखील सोपी असते. या मशिनच्या साह्याने सुरुवातीस दिवसाला आठ ते दहा किलो धागा निघतो. परंतु नंतर सवय झाल्याने 15 ते 20 किलो धागा प्रति दिन निघतो. यंत्राची किंमत अश्वशक्ती नुसार 70 हजार ते एक लाख 75 हजार रुपये अशी असते.
या धाग्याची किंमत किती असते?
- पांढरा शुभ्रधागा 100 ते 120 रुपये प्रतिकिलो
- सिल्वर शाईन धागा 80 ते 100 रुपये प्रति किलो
- पिगमेंट युक्तधागा 80 ते 85 रुपये प्रति किलो
या धाग्याचे फायदे
- या झाडापासून बारीकदोरी,दोरखंड, पिशव्या, पायपुसणी, चटई, आकर्षक टोप्या, कापड, साड्या, शोभेच्या वस्तू, क्राफ्ट पेपर, टिशू पेपर, फिल्टर पेपर, फाईल साठी जाड कागद, सुटकेस,डिनर सेट,बुटांचे सोल तसेच चप्पल इत्यादी वस्तू बनवता येतात.
- या धाग्यांमध्ये दीर्घकाळ टिकाऊ शमता असल्याने त्यापासून उत्तम दर्जाचे कापड, दोरी तसेच दोरखंड, शोभेच्या वस्तू आणि पिशव्या तसेच हात कागद इत्यादी निर्मिती शक्य होते.(सौजन्य-स्मार्ट उद्योजक)
Published on: 25 January 2022, 05:36 IST