जर आपण कृषी क्षेत्राचा विचार केला तर हे क्षेत्र खूप व्यापक असून कृषी क्षेत्रामध्ये बर्याच प्रकारच्या संधी दडून बसले आहेत. शेतकरी बंधू शेती करत असताना शेतीशी संबंधित बरेच व्यवसायाच्या माध्यमातून चांगला नफा कमावू शकता. कारण आपल्याला आता माहित आहेस कि बरेच सुशिक्षित तरुण आता शेतीकडे एक पारंपारिक व्यवसाय म्हणून न पाहता एक व्यावसायिक दृष्टी कोनातून बघत असून शेतीकडे मोठ्या प्रमाणात वळू लागले आहेत.
या लेखात आपण असेच शेतीशी संबंधित काही व्यावसायिक संधी जाणून घेऊ जेणेकरून शेती करत असताना या संस्थेच्या माध्यमातून पैसे कमवण्याची संधी देखील उपलब्ध होईल.
कृषी क्षेत्राशी संबंधित व्यवसाय
1-शेत मालाचे मार्केटिंग व निर्यात- शेतात पिकलेला माल जेव्हा आपण बाजारपेठेत नेतो त्यावेळी शेतकरी आणि ग्राहक यांच्या दरम्यान असलेले जे काही मध्यस्थ व्यक्ती असतात त्या व्यक्तीला दूर करून मालाचा पुरवठा केला तर नफ्यात 10 ते 15 टक्क्यांपर्यंत फायदा होतो.
हा व्यवसाय एकट्या शेतकऱ्यांनी करण्यापेक्षा गावातील अजून काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन केला तर खूप फायदा मिळवणे शक्य आहे. तसेच शेतमालाची विक्री पद्धत व त्याची पॅकिंग या गोष्टींवर व्यवस्थित लक्ष दिले तर ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या बहुराष्ट्रीय ऑनलाइन पोर्टल करून देखील आपल्या शेतमालाची विक्री शक्य आहे.
2- काही संलग्न व्यवसाय- कृषी क्षेत्राशी संलग्न व्यवसायांची यादी तसे पाहायला गेले तर फार मोठी आहे. परंतु त्यातील महत्त्वाचे म्हणजे सेंद्रिय कंपोस्ट तयार करणे, जैविक खते तसेच रोपवाटिका, शेतमाल पॅकिंग सामग्री, ठिबक सिंचनाची सुविधा, शेतीसाठी आवश्यक यंत्रे व त्यांची दुरुस्ती संबंधीचे सेवा,
शेडनेट, ग्रीन हाऊस, मल्चिंगपेपर,कोल्ड स्टोरेज, पॅकिंग व ग्रेडिंग युनिट, पेस्ट कंट्रोल, सौर यंत्रणा, साठवण गृहे, प्राथमिक प्रक्रिया केंद्रे, निर्यात सुविधा केंद्र, शेती संबंधित विविध प्रकारच्या प्रकल्पांचे अहवाल, कृषी सल्ला सेवा, माती तसेच पाणी तपासणी प्रयोगशाळा इत्यादी व्यवसायांचा समावेश यामध्ये करता येईल.
3- शेतमाल प्रक्रिया उद्योग- कुठल्याही वस्तू वर प्रक्रिया करून त्याची विक्री केली तर उत्पन्नात वाढ होतेच हे एक सत्य आहे. अनेक सुशिक्षित उच्चशिक्षित तरुण आणि तरुणी मका, ज्वारी, सेंद्रिय डाळी अशा वेगळ्या प्रकारचे उद्योग उभारून अगदी यशस्वीपणे वाटचाल करत आहेत.
त्यामुळे शेतमाल प्रक्रिया उद्योगात देखील खूप संधी आहेत. समजा तुम्हाला शेतमाल प्रक्रिया उद्योग करायचा असेल तर शेती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी शेतमालावर प्राथमिक प्रक्रिया केली तरी उत्पादनात 10 ते 20 टक्के वाढ होते.
ग्रामीण भागामध्ये प्रक्रिया उद्योगासाठी खूप वाव आहे. परंतु प्रक्रिया उद्योगांसाठी लागणारे पॅकेजिंग आणि मालाच्या ब्रँडिंगच्या अनुषंगाने काम करण्याची खूप गरज आहे.
4- कृषी क्षेत्राशी संबंधित सल्ला सेवा- यामध्ये शेती व शेती संलग्न व्यवसायातील नवीन लोकांना व्यावसायिक तत्वावर सल्ला, सेवा आणि आवश्यक मार्गदर्शन देण्याच्या विविध संधी आहे. बऱ्याच भांडवलदार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचे व्यवस्थापन करण्यासाठी चांगल्या व्यवस्थापकांचे देखील गरज भासते.
त्यांना उत्पादनापासून तर त्यांच्या शेतात घेतलेल्या मालाची विक्री पर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर यश मिळवून देणाऱ्या व्यक्तीची गरज त्यांना असते. त्यासाठी ते चांगली किंमत देखील मोजायला तयार असतात. त्यामुळे आपण अनेक प्रकारच्या सल्ला सेवा यांच्यामार्फत देखील चांगला नफा मिळवू शकतो.
Published on: 28 August 2022, 03:54 IST