वेगवेगळे व्यवसाय त्यांच्या मागणीप्रमाणे चालत असतात. व्यवसायाच्या माध्यमातून तयार उत्पादने या समाजातील विशिष्ट गोष्टींसाठी उपयोगी ठरतात व त्याप्रमाणेच अशा उत्पादित वस्तूंना एक बाजारपेठ निर्माण होत असते. आता व्यवसायांमध्ये बरेचसे व्यवसाय हे शेतीशी निगडित असतात व शेतीशी निगडित व्यवसाय ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांसाठी वरदान ठरतात.
कारण शेतीशी निगडित असणाऱ्या व्यवसायांमध्ये जो काही कच्चामाल लागतो तो स्थानिक शेतकऱ्यांकडून बऱ्यापैकी उपलब्ध होतो अशा मालावर प्रक्रिया करून तो बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना विकून खूप चांगला नफा मिळवता येतो.
नक्की वाचा:आयुष्यात पसरेल पैशाचा सुगंध! ही शेती करणार शेतकऱ्यांना श्रीमंत; करा खास पद्धतीचा अवलंब...
आपल्याला माहित आहेच कि खाण्याशी संबंधीत असलेले कुठलेही व्यवसाय भारतामध्ये चांगल्या प्रमाणात चालतात कारण भारताची लोकसंख्या ही सदैव वाढती असल्याने अशा व्यवसायांना चांगली संधी आहे.
याच पार्श्वभूमीवर जर आपण शेतात उत्पादित झालेला तांदळाच्या टरफले काढून म्हणजेच तांदळावर प्रक्रिया करून त्याची बाजारपेठेत विक्री केली तर निश्चितच या माध्यमातून एक चांगला व्यवसाय स्थापन होऊ शकतो. यालाच आपण 'राईस मिल' असे म्हणतो. या लेखात आपण या व्यवसाय विषयी थोडक्यात माहिती घेऊ.
नक्की वाचा:शेणापासून बनवलेल्या भारतीय राख्यांना जगभरात मागणी! अमेरिकेतूनही आली ऑर्डर..
राईस मिलचा व्यवसाय कसा सुरु करावा?
राईस मिल मध्ये दररोज हजारो टन धान्याचे कांडप, त्यावर प्रक्रिया करून व ते धान्य त्याच्या प्रतवारी प्रमाणे वेगळे करून व स्वच्छ करून ग्राहकांच्या मागणीप्रमाणे पाच किलोची बॅग पासून ते 50 किलो पर्यंतच्या पॅकिंग मध्ये ते बाजारात विकता येते.
जर आपण यामध्ये तांदळाचा विचार केला तर बासमती, इंद्रायणी, आंबेमोहर व कोलम अशा तांदळाच्या प्रमुख व मुख्य बाजारपेठेत मागणी असलेल्या जाती असून बाजार भावाप्रमाणे शेतकऱ्यांकडून जर भात खरेदी केली व स्थापन केलेल्या राईस मिलमध्ये प्रक्रिया करून तो बाजारात विकला तर आपला एक स्वतःचा ब्रँड तयार करता येतो.
बरेचशे राईस मिल व्यावसायिक याच पद्धतीने हा व्यवसाय करतात. जर भांडवलाची क्षमता असेल तर अशा नवीन उद्योजकांनी या व्यवसायात येण्यास काहीच हरकत नसून ग्रामीण व शहरी भागातील सर्वच किराणामाल दुकानांमध्ये त्यासोबतच सुपर मार्केट, मॉल्स इत्यादी ठिकाणी मागणीप्रमाणे पुरवठा करून पैसा कमावता येऊ शकतो.
नक्की वाचा:नका घेऊ टेंशन!कांद्यावर 'ही' प्रक्रिया केली ना तर कमवाल बक्कळ नफा,वाचा सविस्तर माहिती
Published on: 07 August 2022, 01:54 IST