व्यवसाय हे अगदी छोट्या मोठ्या प्रकारातील असतात. व्यवसायामध्ये लागणाऱ्या गुंतवणुकीच्या स्वरूपावर त्या व्यवसायाचा आवाका बऱ्याचदा ठरत असतो. संबंधित व्यवसायाच्या बाबतीत बाजारपेठेत असलेली मागणी यावर खरे यश अवलंबून असते.परंतु अगदी छोट्या गुंतवणुकीतून सुरू केलेले छोटेसे व्यवसाय देखील व असे व्यवसाय सुरू करताना त्यांची बाजारपेठेत असलेली मागणी आणि सध्या या व्यवसायाच्या क्षेत्रात असलेल्या स्पर्धक यांचा विचार करूनच व्यवसायाची निवड केली तर नक्कीच व्यवसायामध्ये यश येऊ शकते.
आता आपल्याला माहित आहेच कि जर आपण खाद्यपदार्थ उत्पादनाचा विचार केला तर खाद्य पदार्थांना मागणी ही कायम असते व अशी कुठलाही हंगामाची त्याला मर्यादा येत नाही.
अशा व्यवसायांमध्ये बऱ्याचदा यश गाठायला जास्त वेळ लागत नाही. या लेखात आपण अशाच एका महत्त्वपूर्ण व्यवसायाविषयी माहिती घेणार आहोत.
'पौष्टिक पीठ' निर्मितीचा व्यवसाय
आता आपल्याला प्रश्न पडला असेल तर पीठ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. प्रामुख्याने ज्वारी चे, गव्हाचे आणि बाजरीचे पीठ जास्त करून आपल्याकडे वापरले जाते. परंतु हे पौष्टिक पीठ म्हणजे नेमके काय हा प्रश्न नक्कीच मनात येऊ शकतो.
परंतु हे पीठ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत तर करतेच परंतु शरीराला आलेला लठ्ठपणा आणि वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करण्याचे देखील महत्त्वपूर्ण कार्य या पिठामुळे होते. तसेच शुगर आणि ब्लड प्रेशरचा रुग्णांसाठी हे पौष्टिक पीठ खूप महत्त्वपूर्ण आहे.
अशा पद्धतीने तयार करतात हे पौष्टिक पीठ
यासाठी जे काही आपले सामान्य पीठ असते यामध्ये काही गोष्टी मिक्स करून हे पीठ बनवले जाते. यासाठी अगोदर गहू बारा तास पाण्यात ठेवल्यानंतर तो बाहेर काढावा व बारा तास सावलीत ठेवावा.
त्यानंतर त्याला वाळवून बारीक करावे लागते. नंतर यामध्ये 700 ग्रॅम मैद्यामध्ये, 50 ग्रॅम ड्रमस्टिकच्या पानाची पावडर म्हणजे शेवग्याच्या पानांची पावडर, 100 ग्रॅम ओटचे पीठ, 50 ग्रॅम मेथीची पाने किंवा मेथी पावडर व 25 ग्रॅम अश्वगंधा इत्यादी घालावे. अशा पद्धतीने या सगळ्या मिश्रणातून हे पौष्टिक पीठ तयार केले जाते.
याच्या मधील एकंदरीत कमाईचे स्वरूप
या पिठाच्या बाजाराचा विचार केला तर पन्नास रुपये आणि किरकोळ बाजारात साठ रुपये दराने विकले जाईल. त्याची एकंदरीत तयार करण्याची किंमत 30 ते 35 रुपये प्रतिकिलो येऊ शकते व मार्केटींगसाठी पाच रुपये खर्च पकडला तरी किलोमागे दहा रुपये वाचणार आहेत.
जर विक्री व्यवस्था मजबूत राहिली व मागणीच्या मानाने तुमचा पुरवठा व्यवस्थित राहिला तर एक लाखाच्या गुंतवणुकीतून तुम्ही तीस ते चाळीस हजार रुपये कमाई करू शकतात.
Published on: 29 August 2022, 10:57 IST