ग्रामीण भागात राहून तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करून चांगली कमाई करू शकता. त्यामध्ये तेंदूपत्ता लागवड खूप महत्वाचे ठरेल. छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यातील आदिवासी लोक त्यांच्या दैनंदिन कामांसाठी तेंदुपत्ता ची लागवड करतात.
या राज्यांमध्ये याला हिरवे सोने असे म्हटले जाते. या दोनही राज्यातील सरकार तेंदूपत्ता लागवडीला प्रोत्साहन देत आहेत. या लेखामध्ये आपण तेंदूपत्ता लागवडीतून नफा कसा मिळवता येतो, याबद्दल माहिती पाहू.
तेंदूच्या पानांचा उपयोग
तेंदूपत्ता हे एक पानासारखे असून, या पानाच्या सहज गुंडाळण्याच्या गुणधर्मामुळे ते विडी बनवण्यासाठी सर्वात जास्त वापरले जाते.
नक्की वाचा:प्रचंड मागणी असलेल्या 'हा' व्यवसाय देईल महिन्याला लाखो रुपये, जाणून घ्या सविस्तर माहिती
देशाच्या इतर अनेक भागांमध्ये पळसाच्या पानांचा वापर विडीच्या उत्पादनासाठी केला जातो. परंतु तेंदूच्या पानाचा अतुलनीय आकार, पानांची जाडी, चव आणि विस्तव पेटवण्याची क्षमता यामुळे याचा सर्वाधिक वापर विडी बनवण्यासाठी केला जातो.
विडी बनवणे हे अगदी सोपे प्राथमिक काम आहे आणि ते कुठेही कधीही करता येते. लाखो गावकऱ्यांसाठी असेल तर उत्पन्नाचा हा प्रमुख स्त्रोत आहे.
विडी उद्योगामुळे गावकऱ्यांना फावल्या वेळात तेंदूपत्ता गोळा करण्याच्या कामातून रोजगार देखील मिळतो.
नक्की वाचा:अशी करा वाटाणा लागवड आणि कमवा बक्कळ पैसा
तेंदूपत्ताची साठवण
झाडांपासून तेंदूपत्ता गोळा केल्यानंतर, तुम्हाला ते वाळवावे लागतात.
त्यासाठी तुम्ही मोठ्यामोकळ्या जागेत ते वाळवू शकतात. त्यानंतर तुम्ही पानांचा एक बंडल ठेवू शकता. याचा एका पिशवीमध्ये एक हजार कोरडा पानांचा एक बंडल असतो आणि प्रत्येक बंडल मध्ये 50 पाने असतात.तेंदू पानांच्या एका पिशवी ची किंमत चार हजार रुपये आहे.
नक्की वाचा:आंतर पिके - आंतरपीक पद्धतीतून शाश्वत आर्थिक नफा वाढून,पिक नुकसानीची जोखीम कमी होती.
Published on: 26 June 2022, 09:00 IST