चिंच उत्पादनात भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. भारतातील विस्तृत प्रदेशात चिंच वृक्ष आढळतात कृष्णा आणि समशीतोष्ण मैदानी अशा दोन्ही प्रदेशात चिंचेची झाडे दिसतात. दक्षिण भारतात खेडोपाड्यात ही झाडे विपुल प्रमाणात असतात. चिंच सामान्य शेतकऱ्यांचा मोठा आधार आहे. तो बहुपयोगी व मूल्यवानवृक्ष आहे.त्याच्या प्रत्येक भागाचा उपयोग होतो. मुख्यतः त्याच्यापासून चांगले उत्पन्न मिळते.
चिंचेचे मूल्यवर्धन
चिंचेचा 55 टक्के भाग गराने व्यापलेला असतो. त्यातील 14 टक्के भाग चिंचोके असतात, 11 टक्के कवच व रेषा असतात. चिंचेत आंबट-गोड रसायन असते.. चिंचेची उत्तम चटणी बनवतात तसेच सॉस आणि सरबत देखील बनवतात. युरोप, अमेरिकेत चिंचेतील तिल आंबट रसायने वापरून उत्तम आरोग्यदायी पेय बनवतात. चटकदार भेळ, पाणीपुरी यासाठी चिंचेचे पाणी वापरतात. याशिवाय अनेक खाद्यपदार्थात चिंचेचा वापर करण्यात येतो. तांब्या-पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी देखील चिंता वापरतात. चिंचे मधील ऍसिडमुळे भांडी लखनौ स्वच्छ दिसतात. अनेक औषधात चिंचचा वापर करतात. चिंचेची पावडर बनवतात. तिचा उपयोग गोळ्या, बिस्किटे व चॉकलेट मध्ये करतात. भारतात रोजच्या आहारात चिंचेचा वापर केला जातो. अशी ही चिंच बहुउपयोगी आहे.
चिंचेचे वाण
योगेश्वरी, अजंठा, थायलंड व महाराष्ट्रात मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि प्रतिष्ठान नावाची चिंचेची जात निवड पद्धतीने शोधून काढले आहे.
फळांची साठवण आणि पिकवण्याच्या पद्धती
चिंचेच्या फळांची काढणी चिंचेची फळे झाडावर पक्का झाल्यावर केली जाते. त्यामुळे फळे पिकविण्याच्या स्वतंत्र पद्धतीने नाहीत. चिंचेच्या फळांची काढणी केल्यानंतर टरफले, चिंचोके आणि शिरा काढून उरलेला गर वाळवितात. काही वेळा टरफला सचिन चव्हाण आत सात ते आठ दिवस वाढवितात आणि नंतर गर वेगळा करतात. असा वाढविलेला चिंचेचा गर कोणतीही प्रक्रिया न करता तसाच साठवला जातो.
प्रक्रिया पदार्थ
सर्वसाधारणपणे चिंच फळात गर तीस टक्के, 40 टक्के कवच किंवा टरफल 30 टक्के असतात.
चिंच प्रक्रिया
चिंचा पूर्ण पिकल्यावर त्या झाडावरून काढून गोळा करून पोत्यात भरतात नंतर त्याचे वरील टरफल काढून गरातील चिंचोके काढून टाकतात. या चिंच ग रात मीठ मिसळून त्याचे लहान लहान गोळे करून त्यापासून सिरफ, रसाचा अर्क, रस व थंड पेय इत्यादी ही प्रक्रिया पासून पदार्थ तयार करता येतात. चिंचेच्या गरापासून चिंच पावडर तयार करण्याची पद्धत सी एफ टी आर आय या मैसूर स्थित संस्थेने विकसित केलेली आहे.
- सिरप – पूर्ण पिकलेल्या चिंचा यांचे हाताने टरफल काढणे त्यानंतर बी सह गर रात्रभर गरम पाण्यात ठेवणे. तसेच त्यामुळे बी पासून गर वेगळा होण्यास मदत होते. लायनर फिल्टर मधून गाळून घेणे नंतर त्याला गरम पाण्याने धुवावे. गर् व पाणी 1:2 या प्रमाणात मिसळावे. पातळ मिश्रण सेंट्रीफ्यूज करावे. तयार झालेल्या गरापासून नेहमीच्या पद्धतीप्रमाणे सिरप तयार करता येते. तयार झालेल्या सीरप मध्ये खालील प्रमाणे घटक पदार्थ असावेत. गर 20 ते 24 टक्के, साखर 56.5 टक्के, एकूण विद्राव्य घटक 56.30 टक्के, रेड्युसिंग शुगर 43.80 टक्के आम्लता 1.11 टक्के. चिंच गराचा उपयोग जॅम जेली आइस्क्रीम व थंडपेय इत्यादी पदार्थ मध्ये करतात.
- रस – गरामध्ये निर्लोपीन 12 ते 15 टक्के मिसळावे. हे द्रावण 60 ते 100 सेंटीग्रेड तापमानाला दहा ते पंधरा दिवस ठेवण. तळाशी साचलेला शाखा ढवळनार नाही अशा बेताने वरील द्रावण एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात ओतावे. एसबेसटॉस चा उपयोग करून निर्वातमधून गाळून घेणे.या द्रावणाची आम्लता 75 ते 80 व ब्रिक्स 18% स्थिर करणे, 80 ते 75 डी सेंटीग्रेड तापमान आला पाच मिनिटे निर्जंतुकीकरण करणे व त्यानंतर आपणास मिळतो तो चिंचेचा रस. रसापासून चांगल्या पद्धतीचे अर्क सुद्धा करता येते. त्याकरिता रस निर्वात बास्पी पत्राच्या सहाय्याने टी एस एस 65 ते 68 डी ब्रिक्स येईपर्यंत आठवून करावा अशा तीव्र रसास अर्क संबोधले जाते. या तयार झालेल्या अर्कास चिंचेचा सुगंध व वास येईल याची काळजी घ्यावी. हा तयार अर्क सरबत, सिरप तयार करण्यासाठी सुद्धा वापरता येत.
- शीतपेय तयार करणे –
साहित्य( एक लिटर साठी)- चिंचेचा अर्क 100 मिली, साखर 131 ग्रॅम, सायट्रिक आम्ल 0.8ग्रॅम, पाणी 782.2मिली, सोडियम बेंजोएट 0.15 ग्राम इत्यादी
कृती - शीतपेय तयार करणे करीता चींचगर नऊ ते 12 टक्के घेऊन त्याचा ब्रिक्स 21.5डी. स्थिर करावा. नंतर तयार झालेले मिश्रण 85 टक्के सेंटीग्रेड तापमानला 20 ते 25 मिनिटे पर्यंत निर्जंतुक करून अगोदर निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटल्यात किंवा कॅन मध्ये भरून ते 29.4डी.सेंटीग्रेड तापमानाला साठवावे. अशा प्रकारे तयार केलेले पेय एक वर्षापर्यंत चांगल्या स्थितीत राहते. अशा प्रकारे दुर्लक्षित परंतु उपयुक्त अशा चिंच फळा पासून आणि प्रकारचे चवदार मधुर पदार्थ तयार करता येतात.
औषधी गुणधर्म
- चिंच भूक वाढवण्यासाठी मदत करते.
- चिंच श्रम, भ्रम व ग्लानी दूर करते.
- चिंचेची कोवळी पाने तसेच खाण्यासाठी किंवा भाजी तयार करण्यासाठी वापरतात. त्यामध्ये लोह, तांबे, क्लोरीन, फास्फोरस व गंधक ही खनिजे असतात.
- चिंच पाने सूज दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.
- वात व पित्त नाशक आहे.
- उष्माघातात चिंच सरबत किंवा पन्हे हितकारक आहे
Published on: 14 June 2021, 01:07 IST