शेतीमाल प्रक्रिया उद्योगामध्ये एक वेगळा उद्योग म्हणजे लाकडी घाण्यावरील तेल निर्मिती करण्याचा उद्योग होय. हा उद्योग शेतकरी बांधवासाठी खूप फायद्याचा व सोनेरी संधी असणारा उद्योग ठरू शकतो. हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला याची पुरेशी माहिती व योग्य व्यवस्थापन केले तर कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही.
हा उद्योग उभारण्यासाठी तुम्हाला खूप काही गुंतवणूक करण्याची गरज नाही. म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोनातून किंवा याच्या एकंदरीत बाजारपेठेचा विचार केला तर गुंतवणूक कमी व नफ्याचे प्रमाण जास्त अशा प्रकारचा उद्योग आहे.
शेतकरी बांधव खूप चांगल्या पद्धतीने हा उद्योग करू शकतात व महिलावर्ग देखील या उद्योगाच्या माध्यमातून पुढे येऊ शकतात. विशेष म्हणजे तुम्ही तुमची नोकरी किंवा एखादा दुसरा व्यवसाय असेल करतो सांभाळून देखील एक साइड बिझनेस म्हणून हा उद्योग चांगल्या पद्धतीने करू शकतात.
देशात साखरेचं उत्पादनात घटलं, दर वाढण्याची शक्यता..
हा व्यवसाय अगदी छोटासा गाळा घेऊन देखील स्मॉल स्केलवर म्हणजे छोट्या पद्धतीने सुरू करू शकता. यामध्ये तुम्ही गाळ्याच्या मागच्या भागात एक प्रोडक्शन युनिट आणि समोर तुमचं विक्री युनिट अर्थात सेलिंग युनिट उभारू शकतात.
फक्त या उद्योगाचे प्रमोशन आणि मार्केटिंग तुम्हाला खूप जबरदस्त पद्धतीने करावी लागेल. या उद्योगाचे एक मार्केटींग तुम्ही वरकाऊट केली तर तुमचा एक बेसिक फार्मूला तयार होतो तुम्हाला नक्की कसे पुढे जायचे आहे हे डेफिनेटली कळते. तुमचे उत्पादन प्रत्येक घरात पोहोचले पाहिजे
या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्ही एखाद्या छोटेखानी कार्यक्रम ठेवून लोकांना बोलावून तुम्ही तुमच्या उद्योगाचे मार्केटिंग चांगल्या पद्धतीने करू शकतात. आता 13 किलो चा घाणा असतो यासाठी एक तास वेळ लागतो.
शेतकऱ्यांनो तुमचे महत्त्वाचे हक्क तुम्हाला माहीत आहेत का? जाणून घ्या होईल फायदा
13 किलो शेंगदाण्याच्या घाण्यापासून सुमारे पाच ते साडेपाच किलो तेल मिळते. तसेच खोबऱ्याचा घाना 22 किलोचा असतो व त्यातून जवळपास 50 टक्के तेल निघते. यामधून तयार झालेले तेल मोठ्या टाक्यांमध्ये साठवले जाते व यात तेलामधील असणारे कण खाली स्थिर होतात व चांगले असणारे तेल आपल्याला वरील बाजूला मिळते.
मालक वाचला पण बैल जोडीने साथ सोडली, मालक ढसाढसा रडला...
एक हात मदतीचा! शेतकऱ्यांना राजपत्रित अधिकारी एक दिवसाचे वेतन देणार...
दिवसा वीज देण्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
Published on: 21 April 2023, 09:38 IST