जगभर फुलांचे हजारो प्रकार आहेत, पण गुलाबाचे फूल काही वेगळेच आहे. त्याला फुलांचा राजा म्हटले जात जाते. गुलाब हे जगातील सर्वात सुंदर आणि सुवासिक फूल मानले जाते. विविध रंगांतील गुलाब अतिशय आकर्षक दिसतात. गुलाब हे प्रेमाचे प्रतिक मानले जाते. स्त्रियांना तर या फुलाची विशेष आवड आहे त्या हे फुल आपल्या केसामध्ये लावतात. लग्नसमारंभ किंवा इतर कार्यक्रमात मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी आपण नेहमी गुलाब वापरतो.
गुलाब शेतीला व्यावसायिक पिकांचे फूल म्हणून ओळखले जाते. गुलाबाच्या लागवडीपासून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. पण त्यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे. सर्व व्यावसायिक फुलांच्या पिकांमध्ये गुलाब हे महत्त्वाचे पीक आहे. गुलाबाच्या वाढीच्या पद्धतीनुसार हायब्रीड टी,फलोरिबंडा,मिनीएचर,वेली या गुलाबाच्या जाती आहेत. यापैकी हायब्रीड टी शेतकरी व्यावसायिक उत्पादनासाठी घेतात. फ्लोरिबुंडा, मिनिएचर आणि वेली सारखी गुलाब बागेत तसेच कुंडीत उगवली जातात.
गुलाबाची झाडे सावलीत नीट वाढत नाहीत आणि फुलत नाहीत. त्यामुळे गुलाबाच्या चांगल्या वाढीसाठी किमान ६ तास प्रखर सूर्यप्रकाश आवश्यक असतो. चांगला निचरा होणारी मध्यम काळी, लाल, हलकी जमीन गुलाब पिकासाठी चांगली मानली जाते. जेव्हा पाण्याचा निचरा होत नाही तेव्हा जमिनीत मूळ कुजते आणि झाड मरते. गुलाबाची अभिवृद्धी डोळे भरून केली जाते. रोझा इंडिका अथवा रोझा मल्टिफ्लोरा या जातींच्या खुंटावर डोळे भरले जातात.
जून आणि ऑक्टोबरमध्ये गुलाबांची छाटणी केली जाते. छाटणी करताना धारदार चाकू आणि कात्री वापरा आणि छाटणीनंतर बुरशीनाशकाची फवारणी करा. गुलाबाच्या योग्य वाढीसाठी आणि उच्च उत्पादनासाठी जमीन नेहमी चांगल्या स्थितीत ठेवा. गुलाबाचे सरासरी उत्पादन प्रति हेक्टर २.५ ते ३ लाख फुलांचे असू शकते. ग्लॅडिएटर, सुपरस्टार, मोटेझुमा, पीस हॅपीनेस, आयफेल टॉवर, लाडोरा, क्वीन एलिझाबेथ, कन्व्हर्जन्स, एडवर्ड इत्यादी गुलाबांच्या प्रमुख जाती आहेत.
भारतातील फुलांसाठी सर्वोत्तम बाजारपेठ पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, दिल्ली, जयपूर, कोटा, चेन्नई, अहमदाबाद येथे आहे. आपल्या देशात फुलांच्या हजारो प्रजाती आहेत परंतु गुलाब सर्वात लोकप्रिय आहेत. म्हणूनच त्याला फुलांचा राजा म्हटले जाते. बाजारात गुलाबाला मोठी मागणी आहे.
महत्वाच्या बातम्या
धक्कादायक : कृषी विभागाचा फक्त 40 टक्केच निधी खर्च, शेतकरी योजनांपासून वंचित; आयुक्तांनी घेतली गंभीर दखल
Published on: 14 May 2022, 12:37 IST