ड्रॅगन फ्रुट या फळाचे उत्पादन हे प्रामुख्याने मलेशिया,श्रीलंकाव व्हिएतनाम या देशांमध्ये व्यावसायिक स्वरूपात घेतले जाते.परंतुआता अलीकडील काही वर्षांपासून भारतामध्ये सुद्धा या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. हे पीक प्रामुख्याने निवडुंग वर्गातील असून वरून गुलाबी रंग व आतील गर पांढरा, वरून पिवळा व आतील गर पांढरा वरून गुलाबी व आतून गुलाबीअशा तीन प्रकारात हे फळ येत.
एक वेलवर्गीय पिक असून वेलाचे आयुष्य 17 ते 20 वर्षे एवढे आहे.विशेष म्हणजे हे पीक कोणत्याही जमिनीत घेता येते. या पिकाच्या वाढीसाठीव वेलींना आधार मिळावा यासाठी पोल व गोल कड्यांचा वापर होतो. या लेखात आपण या ड्रॅगन फ्रुट पासून प्रक्रिया करून कोणकोणते पदार्थ तयार करता येतात हे पाहू.
ड्रॅगन फ्रुट पासून बनवता येणारे प्रक्रियायुक्त पदार्थ
अ-ड्रॅगन फ्रुट गर:
- सगळ्यात आगोदर पिकलेले ड्रॅगन फ्रूट स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत.फळांवरील साल काढून आतील गर वेगळा करावा.
- गरामधील बिया वेगळ्या करून घ्याव्यात.यंत्रांच्या सहाय्याने गर व्यवस्थित मिसळून घ्यावा. तयार झालेला 10 मिली गरा मध्ये 100 मिली दूध व दहा ग्रॅम साखर मिसळून त्याचा रस बनवू शकतो. ड्रॅगन फ्रुट चा रस मायनस 18 अंश सेल्सिअस ला गोठवून ठेवल्यास सात ते आठ महिन्यांपर्यंत वापरता येतो.
- ड्रॅगन फ्रुट ची टॉफी-
- टॉफी तयार करण्यासाठी ड्रॅगन फ्रुट चा गर एक किलो, द्रवरूप ग्लुकोज 70 ग्रॅम, सायट्रिक आम्ल दोन ते तीन ग्रॅम, दूध पावडर 70 ते 80 ग्रॅम, वनस्पती तूप 100 ते 120 ग्रॅम इत्यादी साहित्य आवश्यक आहे.
- ड्रॅगन फ्रुट चा गर कढईत टाकून त्यात वीतळलेले वनस्पती तूप टाकून मिसळून घ्यावे व चांगले शिजवून घ्यावे.
- हे मिश्रण मंद आचेवर शिजवत असताना त्यात दूध पावडर, साखर व सायट्रिक आम्ल टाकून मिश्रण एकजीव करून घ्यावे.
- तयार मिश्रण एका तूप लावलेल्या थाळी मध्ये पसरून ठेवावे.मिश्रण थंड झाल्यावर त्याचे 0.5 ते एक सेंटिमीटर जाडीचे काप करून घ्यावेत. तयार झालेली टॉफीबटर पेपर किंवा रॅपर मध्ये पॅक करावे.
- ड्रॅगन फ्रुट च्या बियांची पावडर:
- ड्रॅगनफ्रुटचागर काढतेवेळी त्याच्या बिया वेगळ्या करून घ्याव्यात.त्या बियास्वच्छ पाण्याने धुऊन घ्याव्यात.
- बिया उन्हामध्ये 50 ते 60 अंश सेल्सिअस तापमानास 15 ते 20 तास वाळवावेत
- वाळलेल्या बिया पेल्वरायझर मध्ये दळून त्याची पावडर तयार करावी.
- ही पावडर विविध बेकरी उत्पादनांमध्ये, चॉकलेट व आईस्क्रीम मध्ये मूल्य वर्धना साठी वापरू शकतो. यातील औषधी गुणधर्मामुळे विविध औषधांमध्ये वापर केला जातो
ई- ड्रॅगन फ्रूट जेली:
- जेली बनवण्यासाठी ड्रॅगन फ्रुट गराच्या वजनाएवढे साखर मिसळून त्यात प्रति किलो पाच ग्रॅम सायट्रिक ऍसिड मिसळावे.
- या मिश्रणाला मंद आचेवर तापवावे.तापवत असताना त्यात चार ग्रॅम पेक्टीन टाकावे.पॅक्टीन हे जेलीला घट्टपणा येण्यासाठी वापरली जाते. त्या मिश्रणाला उष्णता देणे सुरू ठेवावे.
- मिश्रण तापवत असताना त्यामध्ये दोन ग्रॅम के एम एस मिसळावे. ब्रिक्स तपासून पहावा.67.5 ब्रिक्स चे प्रमाण झाल्यावर जेली तयार झाल्याचे समजून उष्णता देणे बंद करावे.
- तयार झालेली जेली निर्जंतुक बाटल्यांत भरून त्याला झाकण लावून हवा बंद करावे.या बाटल्या थंड व कोरड्या ठिकाणी साठवाव्यात. व्यवस्थित साठवणुकीत मध्ये जेली दोन ते तीन महिने टिकते.
ब- खाण्यास तयार मिश्रण:
1- साधारण 100 ग्रॅम वजनाचे साखर 750 मिली पाण्यामध्ये विरघळून त्यात चार ग्रॅम सायट्रिक ऍसिड मिसळावे. या मिश्रणामध्ये 100 मिली ड्रायगन फळाचा गर मिसळून घ्यावा.दहा अंश ब्रिक्स येईपर्यंत मिश्रण ढवळत मंद आचेवर उष्णता द्यावी त्यानंतर तयार झालेले मिश्रण गरम असतानाच निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटल्यांमध्ये भरावे व नंतर थंड करावे.
Published on: 23 September 2021, 04:46 IST