Agriculture Processing

शेवगा हे पीक कोरडवाहू शेतकर्यांेसाठी वरदान ठरते. शेवग्याचे झाड अतिशय लवकर वाढते. भारतामध्ये बहुतेक सर्व उष्ण, आद्र हवामान असलेल्या ठिकाणी शेवग्याचे उत्पादन घेतले जाते. शेवग्याच्या शेंगा वर्षभर बाजारामध्ये उपलब्ध असतात. शेवगा मध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व आहेत. शेवग्याच्या पाने, शेंगा, कोवळ्या फांद्या आणि बियांमध्ये पोषक घटक असतात. जीवनसत्व अ, ब आणि क, खनिजे, लोह आणि सल्फर, सिस्ट्ये नाईन अमिनो आम्ले असतात. त्यात भरपूर पोषक घटक आणि रोगप्रतिकारक घटक असतात. त्यामुळे शेवग्याच्या विविध भागांचा वापर 300 पेक्षा अधिक आजारांच्या उपचारामध्ये केला जातो. शेवग्याच्या शेंगा, पाने, बियांपासून विविध मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात. शेवग्याची पाने- शेवग्याच्या पानांचा समावेश पोषक किंवा पूरक आहारामध्ये केला जातो. हे पाने भाजी स्वरूपातील खाण्यासाठी उपयोग होतो. त्यानंतर पाणी वाळवून त्याची भुकटी बनवून त्याचा वापर भाज्या, ब्रेड, पास्ता या खाद्य पदार्थांमध्ये केला जातो. शेवग्याच्या पानांची भुकटी सुरुवातीला पाने झाडावरून काढून स्वच्छ धुऊन घ्यावी. त्यानंतर पाने सावलीत दोन-तीन दिवस वाळवावीत. वाळवलेल्या पानाची मिक्सर किंवा पल्वलायझर मध्ये बारीक करून भुकटी तयार करून घ्यावी. साधारणतः 50 किलो शेवग्याच्या पानापासून 12 ते 15 किलो पावडर मिळते. तयार केलेली शेवग्याची पानांची पावडर निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटलीमध्ये तू व पाऊचमध्ये कोरड्या ठिकाणी साठवणूक केल्यास सहा महिन्यांपर्यंत टिकते. तयार झालेल्या पावडरीचा उपयोग देती उत्पादनात केला जातो.

Updated on 15 June, 2021 5:37 PM IST

  शेवगा हे पीक कोरडवाहू शेतकर्‍यांसाठी वरदान ठरते. शेवग्याचे झाड अतिशय लवकर वाढते. भारतामध्ये बहुतेक सर्व उष्ण, आद्र हवामान असलेल्या ठिकाणी शेवग्याचे उत्पादन घेतले जाते. शेवग्याच्या शेंगा वर्षभर बाजारामध्ये उपलब्ध असतात. शेवगा मध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व आहेत. शेवग्याच्या पाने, शेंगा, कोवळ्या फांद्या आणि बियांमध्ये पोषक घटक असतात.

 जीवनसत्व अ, ब आणि क, खनिजे, लोह आणि सल्फर, सिस्ट्ये नाईन अमिनो आम्ले असतात. त्यात भरपूर पोषक घटक आणि रोगप्रतिकारक घटक असतात. त्यामुळे शेवग्याच्या विविध भागांचा वापर 300 पेक्षा अधिक आजारांच्या उपचारामध्ये केला जातो. शेवग्याच्या शेंगा, पाने, बियांपासून विविध मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात.

 शेवग्याची पाने- शेवग्याच्या पानांचा समावेश पोषक किंवा पूरक आहारामध्ये केला जातो. हे पाने  भाजी स्वरूपातील खाण्यासाठी उपयोग होतो. त्यानंतर पाणी वाळवून त्याची भुकटी बनवून त्याचा वापर भाज्या, ब्रेड, पास्ता या खाद्य पदार्थांमध्ये केला जातो.

      शेवग्याच्या पानांची भुकटी

 सुरुवातीला पाने झाडावरून काढून स्वच्छ धुऊन घ्यावी. त्यानंतर पाने सावलीत दोन-तीन दिवस वाळवावीत. वाळवलेल्या पानाची मिक्सर किंवा पल्वलायझर मध्ये बारीक करून भुकटी  तयार करून घ्यावी. साधारणतः 50 किलो शेवग्याच्या पानापासून 12 ते 15 किलो पावडर मिळते. तयार केलेली शेवग्याची पानांची पावडर निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटलीमध्ये तू व पाऊचमध्ये कोरड्या ठिकाणी साठवणूक केल्यास सहा महिन्यांपर्यंत टिकते. तयार झालेल्या पावडरीचा उपयोग देती उत्पादनात केला जातो.

   शेवग्याच्या पानांचा रस

 सुरुवातीला शेवग्याची दहा किलो ताजी पाने स्वच्छ धुऊन घ्यावीत व तिला मंद आचेवर पाच मी. गरम करावेत. त्यानंतर थंड करून घ्यावी. शेवग्याच्या दहा किलो पानामध्ये एक लिटर पाणी टाकून हॅमर मिलच्या साह्याने बारीक करून घ्यावीत. तयार झालेल्या शेवग्याच्या शेंगांचा रस गाळून घ्यावा व त्यामध्ये 250 ग्रॅम साखर व वीस ग्रॅम जिरे पावडर टाकून मिसळून घ्यावी. तयार झालेल्या रसाला तीन ते चार अंश तापमानाला रेफ्रिजरेटर मध्ये ठेवावे.

      शेवगाच्या पानाचा डिकांशिन चहा

 सुरुवातीला शेवग्याची पाने स्वच्छ धुऊन घ्यावीत व सावलीमध्ये वाळवून घ्यावेत. वाढवलेली पाणी चहा पुढील प्रमाणे बारीक करुन घ्यावित. वाढवलेली पाने चहा पुढीप्रमाणे बारीक करून घ्यावी. एका पातेल्यात पाणी गरम करून त्यामध्ये शेवग्याच्या पानांची पावडर मिसळावी व साखर टाकून घुसळून घ्यावे. तयार झालेल्या शेवग्याचा पानाचा चहा काचेच्या ग्लासमध्ये ओतून त्यामध्ये चार ते पाच थेंब लिंबूरस मिसळून घ्यावे. तयार झालेल्या चहा अतिशय गुणकारी असून चवीला पण चांगला लागतो.

  

     शेवग्याच्या शेंगांचे लोणचे

 शेवग्याची कोवळी शेंग शिजून खाता येते किंवा कढी मध्ये वापर केला जातो. तसेच शेंगा पाण्यामध्ये उकळून त्याची डाळी सोबत आमटी केली जाते. तसेच कोवळ्या शेंगा चा वापर सॅलडमध्ये केला जातो, त्याच प्रमाणे दक्षिण भारतात शेंगदाणे पासून सांभर बनवली जातात. 1किलो शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुऊन घ्याव्यात. त्यानंतर शेंगांची वरचे साल काढून तीन सेंटीमीटर तुकडे करून घ्यावेत. पाच ते सात मिनिटे शेंगा 20 ते 30 अंश तापमान वाफवून घ्याव्यात. त्यानंतर मेथी  पन्नास ग्रॅम, मोहरी 40 ग्रॅम, मिरची पावडर 30 ग्रॅम, चिंचेची पेस्ट 30 ग्रॅम तयार करावी. कढईमध्ये तेल साडेतीनशे मिली टाकून त्यामध्ये लसुन दहा ग्रॅम, हिंग पाच ग्रॅम, मीठ 35 ग्रॅम, हळद 60 ग्रॅम, साखर 20 ग्रॅम वरील तयार केलेली पेस्ट टाकून मिश्रण चांगले एकजीव करुन घ्यावे.

मिश्रणाला पाच ते दहा मिनिट शिजवून घेतल्यानंतर  त्यामध्ये वापरलेल्या शेंगा घालून पुन्हा पाच ते सात मिनिटे मंद आचेवर शिजवावे. मिश्रणाला शिजवल्यानंतर त्याला थंड करून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये 10 मिली व्हिनेगार व 100 मिली तिळाचे तेल मिसळावे. तयार झालेले दोनचे निर्जंतुकीकरण केलेल्या काचेच्या बरणीत भरून घ्यावे.

     शेवग्याच्या बियांची पावडर

  • शेवग्याच्या बिया पाण्यामध्ये घेऊन दहा ते पंधरा मिनिटे उकळून घ्यावेत. त्यानंतर त्यावरील पारदर्शक भाग काढून घ्यावा. त्यानंतर बिया सूर्यप्रकाशात वाळवून घ्यावे.
  • बिया वाळल्यानंतर त्याला पल्वलायझर मध्ये बारीक करून घ्याव्यात. बियांची पावडर बनवून आपण त्याचा उपयोग स्वासेस, सीजनिंग मध्ये केला जातो.
English Summary: processing of drum stick
Published on: 15 June 2021, 05:37 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)