Agriculture Processing

बटाटा प्रक्रिया उद्योग शेतकरी किंवा शेतकरी गट सहजपणे सुरू करू शकतात असा व्यवसाय आहे. आपल्याला माहित आहेच कि बटाट्यापासून चिप्स, वेफर्स बनवून त्यांच्या विक्रीच्या माध्यमातून शेतकरी नफा कमवू शकतात. या उद्योगासाठी काही यंत्राची आवश्यकता असते. याबद्दलची तपशीलवार माहिती या लेखात आपण घेऊ.

Updated on 06 December, 2021 5:14 PM IST

बटाटा प्रक्रिया उद्योग शेतकरी किंवा शेतकरी गट सहजपणे सुरू करू शकतात असा व्यवसाय आहे. आपल्याला माहित आहेच कि बटाट्यापासून चिप्स, वेफर्स बनवून त्यांच्या विक्रीच्या माध्यमातून शेतकरी नफा कमवू शकतात. या उद्योगासाठी काही यंत्राची आवश्यकता असते. याबद्दलची तपशीलवार माहिती या लेखात आपण घेऊ.

 जर बाजाराचा विचार केला तर चिप्स आणि वेफर्स बनवणारे अनेक कंपन्या बाजारात आहेत. परंतु शेतकऱ्यांनी स्वादिष्ट वेफर्स चिप्स बनवले तर स्थानिक बाजारपेठेत चांगला अभ्यास करून विक्री शक्य आहे. त्यासाठी आपल्याला स्थानिक पातळीवर बटाटा उत्पादन आणि त्यावर प्रक्रिया उद्योगाची उभारणी करणे आवश्यक आहे. या उद्योगासाठी भांडवलाचा विचार केला तर अगदी छोट्या प्रमाणात हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कमीत कमी एक ते दीड लाख रुपयांपर्यंतचा खर्च लागतो. आपल्या उद्योगातून तयार केलेल्या चिप्स हे स्थानिक बाजारात,किरकोळ विक्रेते, मॉल किंवा ऑनलाइन रिटेल स्टोर मार्फत तयार केलेली चिप्स आपण विकू शकतो. या उद्योगामध्ये जर व्यवस्थित नियोजन केले तर बटाट्याच्या माध्यमातून लाखोंची कमाई करता येऊ शकते.

 बटाटा प्रक्रिया उद्योगासाठी लागणारी यंत्रे

  • साल काढण्याचे यंत्र- चिप्स तयार करण्यासाठी अगोदर बटाटे स्वच्छ धुवून त्याची साल काढावी लागते. हे साल काढण्यासाठी बाजारात विविध यंत्र उपलब्ध आहेत. या यंत्राच्या तळाशी गोलाकार शक्ती असते.हिचकती बटाटा वरून फिरून साल निघून वेगळी करते. या चकतीचा व्यास 14 इंच,जाडी 0.5इंच असते. साल काढलेले बटाटे आपोआप पुढे सरकवले जातात. या यंत्रात सिंगल फेज वर चालणारी 1 एचपी क्षमतेची मोटर असते. यंत्राचे वजन साधारणतः 55 किलो आहे. या यंत्राद्वारे एका वेळेस दहा किलो बटाट्याचे साल काढली जाते. या यंत्राची किंमत सोळा हजार रुपयांपासून पुढे आहे.
  • बटाटा कापण्याचे यंत्र- साल काढलेले बटाट्यापासून छोटे छोटे गोलाकार काप काढण्यासाठी यंत्र उपयुक्त आहे. या यंत्रात सिंगल फेज मोटर वापरलेली असते. एका तासाला साधारण दोनशे किलो बटाट्याचे काप केले जातात. याची किंमत वीस हजाराच्या पुढे आहे.
  • ड्रायर- बटाट्याचे चिप्स दीर्घकाळ टिकण्यासाठी त्यातील पाणी काढणे आवश्यक असते. म्हणजे ते वाळवणे गरजेचे आहे. त्यासाठी ड्रायरचा उपयोग केला जातो. यंत्र बटाट्याच्या काप मधील पाणी शोषून घेते. ये शोषलेले पाणी आतील गोलाकार भांड्यात साठवले जाते. दर काही टप्प्यानंतर हे भांडे काढून त्यातील पाणी काढून टाकावे. एका वेळेला दहा किलोच्या कापचे पाणी काढता येते. या यंत्रामध्ये दोन एचपी सिंगल फेज मोटर चा वापर केलेला असतो. सुमारे 26 हजार पासून पुढे यंत्राची किंमत असते.
  • तळण यंत्र- वाळवलेले चिप्स या यंत्राद्वारे तळले  जातात. तेल गरम करण्यासोबतच हे तेल सातत्याने फिरते  ठेवली जाते. त्यामुळे तेल खराब होत नाही. त्याचप्रमाणे तळाशी जमा होणाऱ्या चिप्सचा मलदा काढून टाकला जातो. यंत्र पूर्णपणे ऑटोमॅटिक सिस्टीम वर चालते. एका तासाला सुमारे 20 ते 25 किलो स्ट्रिप्स तोडले जातात. याची किंमत जवळपास पन्नास हजारांच्या पुढे आहे.
English Summary: potato processing bussiness is golden oppurtunity for farmer
Published on: 06 December 2021, 05:14 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)