Agriculture Processing

चिप्स आपल्याला सगळ्यांनाच आवडतात. अगदी लहान असो वा मोठे चिप्स सगळ्यांच्या आवडता पदार्थ आहे. शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत प्रत्येक ठिकाणी वेफर्स ला बाजारपेठ उपलब्ध आहे. म्हणून गेल्या काही वर्षांपासून वेफर्स च्या बाजारपेठेत प्रचंड वाढ झाली आहे.

Updated on 20 December, 2021 9:31 PM IST

चिप्स  आपल्याला सगळ्यांनाच आवडतात. अगदी लहान  असो वा मोठे चिप्स  सगळ्यांच्या आवडता पदार्थ आहे. शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत प्रत्येक ठिकाणी वेफर्स  ला बाजारपेठ उपलब्ध आहे. म्हणून गेल्या काही वर्षांपासून वेफर्स च्या बाजारपेठेत प्रचंड वाढ झाली आहे.

चांगल्या वेफर्स ची निर्मिती करून तुम्ही चांगला व्यवसाय स्थापन करू शकतात. जर तुम्हाला एखादा व्यवसाय स्थापन करायचा असेल तर तुम्ही चिप्स मेकींग मध्ये बराच नफा कमाऊ शकता.

 चिप्स उद्योगा विषयी माहिती

1- बटाटा वेफर्स बनवण्यासाठी ऑटोमॅटिक किंवा मॅन्युअल अशा दोन्ही प्रकारच्या उपकरणाचा वापर करतात. ऑटोमॅटिक मशीन द्वारे व्यापार बनवायचे असेल तर जवळपास एक ते दीड कोटी रुपये भांडवलअसायला हवे. मॅन्युअल मशीनच्या वापरासाठी वीस ते तीस लाख रुपये भांडवल पुरेसे आहे.

 मॅन्युअल मशीन चा वापर करायचा असेल तर अधिक मनुष्यबळ लागते. ऑटोमॅटिक मशीन चालवायचे असेल तर त्यासाठी तीन ते चारव्यक्तींची आवश्यकता असते. त्यामध्ये एका इंजिनियरला देखील समावेश असतो. ऑटोमॅटिक मशीन द्वारे दररोज जवळपास 500 किलो वेफर्स ची निर्मिती होऊ शकते. ऑटोमॅटिक मशीन साठी मोठी जागा लागते.

3-वेफर्स बनवण्याचा उद्योग करायचा असेल तर या क्षेत्राचे प्राथमिक माहिती घ्यायला हवी.फूड टेक्नॉलॉजी चा अभ्यासक्रम पूर्ण करून या क्षेत्रात पुढे जाता येईल. सध्यातरी चिप्स मेकिंग चा कोणताही अभ्यासक्रम उपलब्ध नाही.

4- तयार माळ विकण्यासाठी घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांची निवड करावी लागेल. मार्केटिंगचे तंत्र जाणून घ्यावी लागेल.

 धंद्याची स्ट्रॅटेजी( गुंतवणूकदारांना मदत)

1- उत्पादनाच्या ओनलीने फ्री करत असाल तर ई कॉमर्स व्यवसाय सुरू करण्याचे माध्यम बनवा. स्वतःची वेबसाईट तयार करा. ती आकर्षक असले पाहिजे. वेबसाईटवर सोप्या शब्दात उत्पादनाची माहिती द्या. तुमच्या व्यवसायाची माहिती लिहा.

2- विक्री करत असलेल्या वस्तूंचा दर्जा तुम्हाला माहीत असायलाहवा.उत्पादनाच्या दर्जाबाबत तुम्ही समाधानी असायला हवे. उत्पादनाच्या दर्जाबाबत समाधानी असाल तरच तुम्ही तुमचे उत्पादन विकू शकाल. उत्पादनाची योग्य मार्केटिंग करता आले पाहिजे. तुमचे उत्पादन अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायला हवे.

तुमच्या आर्थिक व्यवहारांकडे लक्ष ठेवण्यासाठी अकाऊंटची नेमणूक करा पण आर्थिक व्यवहार तुम्हालाच बघायचे असतील तर करासंबंधी ची सगळी माहिती गोळा करा. व्यवसाय संबंधी च्या छोट्या छोट्या गोष्टींची माहिती करून घ्या. फेसबूक,  गुगल आणि व्हाट्सअप च्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यापार वाढवू शकता.

4- तुम्ही एकट्याने हा व्यवसाय होऊ शकता का किंवा तुम्हाला सहायकाची गरज आहे का या बाबींचा विचार करा.

5- वेबसाईट तयार करताना व्यावसायिकांची मदत घ्या. तुमची वेबसाईट व्यावसायिक पद्धतीने तयार करा. या वेबसाईटवर ग्राहकांना हवी ती माहिती मिळायला हवे. त्यांना फार शोधाशोध करावी लागू नये.

English Summary: Potato chips making bussiness is most profitable in low investment
Published on: 20 December 2021, 09:31 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)