Agriculture Processing

अनेक शेतकरी औषधी वनस्पतीची लागवड करून लाखों रुपये कमवत आहेत. अशा अनेक वनस्पती आहेत ज्यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळू शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका औषधी वनस्पतीविषयी माहिती सांगणार आहे, ज्याची लागवड तुम्ही सहज करू शकता.

Updated on 22 September, 2022 5:56 PM IST

अनेक शेतकरी औषधी वनस्पतीची लागवड (Cultivation of medicinal plants) करून लाखों रुपये कमवत आहेत. अशा अनेक वनस्पती आहेत ज्यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळू शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका औषधी वनस्पतीविषयी माहिती सांगणार आहे, ज्याची लागवड तुम्ही सहज करू शकता.

आपण पाहिले तर बरेच शेतकरी पारंपरिक शेतीला प्राधान्य देतात. त्यामुळे शेतकरी औषधी वनस्पतींची लागवड करून मोठ्या प्रमाणात नफा कमवत आहे. ब्राम्ही (Brahmi) या वनस्पतीची एकदाच लागवड केल्यानंतर वर्षातून तीनदा कापणी करत यातून शेतकरी लाखों रुपयांचे कमाई करता येते.

शेतकऱ्यांनो पुढचे 2 दिवस पावसाचा जोर कायम; कापूस, तूर, भुईमूग पिकांची अशी घ्या काळजी

ब्राम्हीची लागवड खूप फायदेशीर आहे. त्याच्या औषधी गुणधर्मामुळे प्राणी ते खात नाहीत. दुसरीकडे एका एकरासाठी केवळ २० ते २५ हजार रुपये खर्च येतो. या पिकाची एकदा लागवड केल्यानंतर वर्षातून तीनदा काढणी करता येते.

यामध्ये मका, तूर ही सहपीक म्हणून पेरता येते. एक एकर जमिनीवर ब्राम्हीची लागवड (Cultivation of Brahmi) केल्यानंतर एका एकरातून वर्षाला २ ते ३ लाख रुपये सहज कमावत येतात. रासायनिक शेतीमुळे जमीन नापीक होत आहे.

दिवसेंदिवस उत्पादन कमी होऊन खर्च वाढत आहे. वाढता खर्च कमी करण्यासाठी आणि जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी शेण व गोमूत्रापासून जीवामृत, घंजीवामृत आणि आजूबाजूच्या वनस्पतींपासून कीटकनाशक औषधे (Pesticides) तयार करुन त्याचा शेतीत वापर केल्यास शेतकऱ्यांचा खर्च कमी होवू शकतो.

आनंदाची बातमी; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात ४८ लाख ४९ हजार रुपयांचा निधी वाटप

केसांसाठी अत्यंत उपयुक्त

1) कोंड्या पासून मुक्ती

ब्राह्मीचा वापर टाळूसाठी खूप फायदेशीर आहे. हे टाळूचे पोषण करते आणि ते निरोगी बनवते. हे टाळूला आवश्यक आर्द्रता देखील देते, ज्यामुळे कोंड्याची समस्या बर्‍याच प्रमाणात दूर होते.

2) केस गळणे कमी होते

ब्राह्मी तेल कोरड्या स्कॅल्पची दुरुस्ती करते आणि केस गळणे थांबवते. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म (Anti-oxidant Properties) केवळ टाळू तरूणठेवत नाहीत तर केसांना निरोगी ठेवतात.

3) टाळू साफ करते

टाळूच्या स्वच्छतेसोबतच ब्राह्मीच्या वापरणाने आपल्याला, टाळूशी संबंधित कोणत्याही समस्यांपासून मुक्ती मिळवते.

4) टक्कल पडण्यापासून बचाव करते

हे औषध केसांचे पोषण करते, त्यांना मजबूत बनवते. त्याचप्रमाणे याच्या रोजच्या वापराने केसांच्या मुळांना पूर्ण पोषण मिळते. बायोकेमिकल कंपाऊंडमुळे टक्कलही दूर होते.

5) तणाव देखील दूर करू शकतो

ब्राह्मी तेलाने डोक्याला मसाज केल्याने खूप आराम मिळतो. तसेच केसांना पोषणही मिळते. त्यामुळे शेतकरी किंवा व्यवसायीकदार घरबसल्या याचा व्यवसाय करू शकता. फक्त यासाठी तुम्हाला लोकांपर्यंत याचे फायदे पोहचवावे लागतील. 

महत्वाच्या बातम्या 
शेत जमीन खरेदी-विक्रीमध्ये केला मोठा बदल; सरकारच्या निर्णयाने शेतकरी चिंतामुक्त
पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग योजनेला केंद्र सरकारकडून 10 लाख रुपयांचे अनुदान जाहीर
भारतातील 5 टॉप देशी गायींचे करा पालन; एका गाईचे पालन केले तरी होईल भरपूर कमाई

English Summary: Plant weed once harvest three times earn lakhs rupees
Published on: 22 September 2022, 05:10 IST