जर आपण सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर सुशिक्षित बेरोजगारांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे. बेरोजगारांच्या प्रमाणात नोकऱ्यांची उपलब्धता खूप कमी आहे. बरेच जण नोकरीच्या मागे न लागता काहीतरी व्यवसाय करण्याच्या तयारीत असतात. अशा व्यक्तींसाठी खूप महत्त्वाचा ठरेल अशा व्यवसायाची माहिती आपण या लेखात घेऊ.
लोणचे बनवण्याचा व्यवसाय
लोणचे म्हटले म्हणजे स्वयंपाक घरात असणारे व जेवणासोबत सगळेजण मोठ्या प्रमाणात खाल्ला जाणारा पदार्थ आहे हे आपल्याला माहिती आहे.
लोणचे हे बाराही महिने बाजारपेठेत चांगल्या पद्धतीने विकले जाते. त्यामुळे बाराही महिने चांगली मागणी असणारा हा व्यवसाय असून लोणचे तयार करून विकणे या माध्यमातून महिन्याला पंचवीस हजार पर्यंत कमी करता येणे शक्य आहे.
गुंतवणूक करून तुम्ही या व्यवसायाला सुरुवात करू शकतात. अगदी पहिल्याच महिन्यात चांगली विक्रीचा जम बसला तर तुमचे दहा हजार रुपये खर्च वजा जाता पंधरा हजार रुपये सहज नफा मिळवता येऊ शकतो.
नक्की वाचा:Processing Unit: गोड ज्वारीपासून तयार करा 'हा' पदार्थ,व्हाल उद्योजक आणि कमवाल बक्कळ नफा
करा दहा हजाराची गुंतवणूक, सुरु करा व्यवसाय
हा व्यवसाय तुम्ही अगदी घरगुती स्तरावर सुरू करू शकता. त्यासाठी तुमची दहा हजार रुपये गुंतवण्याची तयारी आहे तर या व्यवसायातून तुम्ही 25 ते 30 हजार रुपयांपर्यंत नफा महिन्याकाठी कमवू शकता.
या व्यवसाय मध्ये तुम्ही बाजारात असलेली नेमकी लोणच्याची मागणी, तुम्ही तयार केलेल्या लोणच्याची आकर्षक पॅकिंग आणि बाजारपेठेतील खप या गोष्टीवर बारकाईने लक्ष दिले तर तुमच्या नफ्याचे गणित हे कायम बदलत राहाते.
तुम्ही सोशल मीडिया किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करून देखील तुमचे लोणचे अगदी आरामात विकू शकतात. बाजारपेठेत लोणच्याचे बऱ्याच प्रकारचे ब्रँड आहेत.
त्या उपलब्ध ब्रँड ची पॅकिंग कोणत्या पद्धतीचे आहे? संबंधित ब्रँडची मार्केटिंग ते कसे करतात? व त्यांच्या उत्पादनापेक्षा तुमचे उत्पादन किती दर्जेदार परिणाम कारक आहे या विषयीचा अभ्यास करणे खूप महत्त्वाचे आहे.
नक्की वाचा:Agri Bussiness Tips: युवकांनो! शेतीआधारित करा 'हे' उद्योग,मिळेल नफा अन होईल आर्थिक प्रगती
यासाठी तुम्ही तयार केलेल्या लोणच्याची कॉलिटी, त्याची पॅकिंग आणि शक्य असेल तर त्यामध्ये विविधता ठेवणे फार आवश्यक आहे.
तुम्हाला जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही तो अगदी छोट्या प्रमाणात सुरू करावा व बाजारपेठेतील फीडबॅक बघून त्यामध्ये आवश्यक तो बदल केल्याने व्यवसायात फार मोठा फायदा होतो व व्यवसाय लवकर पिक पकडतो.
लोणचे तयार केल्यानंतर ते व्यवस्थित प्रकारे स्टोरेज केले तर जास्त काळ टिकते. कारण लोणचे हे थेट खाण्याशी संबंधीत असल्यामुळे त्यामध्ये खूप जबाबदारीने काम करणे गरजेचे असते.
टॅलेंट मार्केटिंग आणि व्यवसायाचे मॅनेजमेंट जर कौशल्यपूर्ण रीतीने केले तर महिन्याला तीस ते चाळीस हजार रुपयांचा नफा कमवणे अवघड नाही. त्यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या उत्पादन निर्मिती मध्ये सातत्य व उत्पादनाचा दर्जा आणि त्याची पॅकिंग चांगली असणे आवश्यक आहे.
Published on: 30 July 2022, 02:56 IST