Agriculture Processing

आपल्याला माहित आहे की,अनेक छोटे-मोठे व्यवसाय कमीत कमी भांडवलात सुरू करता येतात व उत्तम मार्केटिंग आणि दर्जेदार उत्पादनाच्या जीवावर अल्पावधीतच चांगले यश देखील प्राप्त करता येते. आपल्याला माहित आहेच कि गृह उद्योग ही संकल्पना खूप महत्वपूर्ण असून महिला वर्गासाठी खास या संकल्पनेच्या माध्यमातून अनेक उद्योगांची यादी आपल्याला सांगता येईल. त्यामुळे या लेखामध्ये आपण अशा एका ग्रह उद्योगाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत,जो घरी सुरू करता येऊ शकतो आणि चांगला नफा देऊ शकतो.

Updated on 09 September, 2022 3:46 PM IST

आपल्याला  माहित आहे की,अनेक छोटे-मोठे व्यवसाय कमीत कमी भांडवलात सुरू करता येतात व उत्तम मार्केटिंग आणि दर्जेदार उत्पादनाच्या जीवावर अल्पावधीतच चांगले यश देखील प्राप्त करता येते. आपल्याला माहित आहेच कि गृह उद्योग ही संकल्पना खूप महत्वपूर्ण असून महिला वर्गासाठी खास या संकल्पनेच्या माध्यमातून अनेक उद्योगांची यादी आपल्याला सांगता येईल.  त्यामुळे या लेखामध्ये आपण अशा एका ग्रह उद्योगाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत,जो घरी सुरू करता येऊ शकतो आणि चांगला नफा देऊ शकतो.

नक्की वाचा:Profitable Bussiness: व्यवस्थित नियोजनाने 'हा'बिझनेस केला तर कमी कष्टात लाखो रुपये कमावण्याची देतो संधी

 पापड बनवण्याचा व्यवसाय

 पापड बनवण्याचा व्यवसाय हा बाजारपेठेत कायम वर्षभर मागणी असणारा व्यवसाय असून त्यामध्ये खूप चांगला नफा मिळवून देण्याची ताकद आहे. या व्यवसायामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला तुमच्या तयार पापडाची चव आणि इतर कंपन्यांच्या पापड पेक्षा थोडेसे वेगळेपण जर असेल तर बाजारपेठेमध्ये निश्चितच चांगले नाव मिळवता येऊ शकते.

जर आपण एकंदरीत पापड उद्योगाचा विचार केला तर या उद्योगाच्या संबंधित राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळाने एक प्रकल्प अहवाल तयार केला असून त्यानुसार विचार केला तर यामध्ये मुद्रा योजनेचा आधार घेऊन चार लाख रुपयांचे कर्ज स्वस्त दरात उपलब्ध होते.

जर तुमची एकूण सहा लाख रुपयांची गुंतवणूक करण्याची क्षमता असेल तर तुम्ही तीस हजार किलो उत्पादन क्षमता निर्माण करू शकतात. या सगळ्या प्रकल्पासाठी तुम्हाला 250 चौरस मीटर इतकी जागा लागणार आहे. विशेष म्हणजे या सहा लाखामध्ये तुमचे वर्किंग कॅपिटल आणि लागणारा सर्व खर्च समाविष्ट केलेला आहे.

नक्की वाचा:Business Tips: प्रत्येक घरात मागणी असणारा 'हा'व्यवसाय योग्य मार्केटिंगने देईल भरपूर नफा,वाचा सविस्तर

प्रोजेक्ट रिपोर्टनुसार लागणाऱ्या गोष्टी

या प्रोजेक्ट रिपोर्टनुसार विचार केला तर तुमच्या स्थिर भांडवलामध्ये दोन मशीन,पापड पॅकिंग मशीन आणि खेळत्या भांडवलासाठी तीन महिन्यांचा  कर्मचाऱ्यांचा पगार, लागणारा कच्चामाल आणि तीन महिन्यासाठी लागणारा उत्पादन खर्च यामध्ये समाविष्ट होतो. शिवाय तुमची जागा जर भाड्याने घेतली असेल तर जागा भाडे, वापर केलेला विजेचा खर्च, पाणी तसेच टेलिफोन बिल इत्यादी खर्चाचा देखील यामध्ये समावेश आहे.

 लागणाऱ्या आवश्यक गोष्टी

हा व्यवसाय उभारण्यासाठी तुम्हाला 200 ते 250 चौरस फूट जागा लागेल आणि तीन अकुशल आणि दोन कुशल कामगारांची तुम्हाला गरज भासेल. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला एकूण चार लाख रुपयांचे कर्ज मिळेल

आणि तुम्ही तुमची स्वतःची गुंतवणूक  दोन लाख रुपये टाकून असे एकूण सहा लाख रुपयात व्यवसाय चांगल्या पद्धतीने सुरू करू शकता. या व्यवसायासाठी तुम्ही आर्थिक मदतीसाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत कोणत्याही बँकेत कर्जासाठी अर्ज दाखल करू शकतात.

नक्की वाचा:Agri Related Business: कृषी संबंधित 'हा' व्यवसाय देईल प्रचंड नफा,थोडीशी प्लानिंग येईल कामाला

English Summary: papad making bussiness so profitable in less investment and benificial for women
Published on: 09 September 2022, 03:46 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)