फणसातील गरे तसेच बिया खाण्यायोग्य असून गरापासून जॅम, जेली, फणसपोळी, स्क्वॅश, आणि पल्प बनविण्याच्या प्रकिया उद्योगास संधी आहे. फणसाच्या ७५ % पक्व गरापासून वेफर्स तसेच लोणचे, असे टिकावू पदार्थ बनविता येतात.आज आपण या लेखातून अशाच अनेक पदार्थाविषयी माहिती घेणार आहोत..
कच्च्या फळाची चविष्ट भाजी बनविली जाते. फणसाच्या गरापासून वाईन सुद्धा बनविली जाते.फणसाच्या गरापेक्षा बीमध्ये अधिक प्रमाणात पोषकतत्वे असतात. फणसाचे बी उकडून किंवा भाजून खातात. बिया वाळवून पीठ तयार करून विविध पदार्थात वापरतात. यापासून उपवासाची शेव,चकली, कटलेट, थालीतीठ, रोजच्या आहारातील पोळ्या असे अनेक मूल्यवर्धित पदार्थ बनवता येतात.फणसाच्या फळाच्या सालीपासून पेक्टिन वेगळे करता येऊ शकते, या पेक्टिन द्रावणाचा उपयोग जेली तयार करण्यासाठी किंवा पेक्टिन पावडर तयार करण्यासाठी होतो.पेक्टिन हे जॅम, जेली, मार्मालेड या पदार्थाचा पोत टिकवण्यासाठी वापरला जातो.
फणसाचा जॅम
साहित्य-१ किलो फणसाचे गरे, १ ते सव्वा किलो साखर, १० ते १२ ग्रम सायट्रिक एसिड, खाण्याचा पिवळा रंग आवश्यक असल्यास. प्रथम पिकलेल्या फणसाचे गरे घेऊन त्यात थोडे पाणी घालून मऊ होऊपर्यंत शिजवून घ्यावेत.
-
गरे मऊ असल्यास शिजविण्याची गरज नाही.नंतर हा पल्प एका बारीक गाळणीतून गाळून घ्यावा.
-
एका स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात तो पल्प शिजण्यास ठेवावा. त्यात हळूहळू वरीलप्रमाणे साखर व सायट्रिक एसिड मिसळून सारखे ढवळत राहावे.
-
पल्प घट्ट होऊन त्याचे तापमान १०५ अंश सेल्सिअस व विद्राव्य घटकाचे प्रमाण ६८ टक्के झाल्यावर, तसेच तयार जॅम थंड झाल्यावर चमच्यात घेऊन खाली पाडावा. तो एकसारखा पडल्यास, जॅम तयार झाला असे समजावे.
-
नंतर उकळण्याची क्रिया बंद करून साधारण ८० टे ८५ अंश सेल्सिअस पर्यंत थंड करून काचेच्या बरणीत भरून सीलबंद करावा.
स्क्वॅश
साहित्य- १ किलो फणसाचा पल्प, २.२०० किलो साखर, १.५०० लिटर पाणी, ०.०६ ग्रम सायट्रिक आम्ल, १ ते २ ड्रोप फ्लेवर्स, खाण्याचा पिवळा रंग आवश्यक असल्यास.
-
बरका फणसाच्या पिकलेल्या गरापासून पल्प तयार करून बारीक चाळणीने गाळून घ्यावा. वरीलप्रमाणे पाणी व साखर एकत्र करून पाक तयार करावा.
-
तो मलमलच्या कापडातून गाळून त्यात सायट्रिक आम्ल टाकून चांगला एकजीव करून घ्यावा.
-
टिकून राहण्यासाठी १ किलो रसासाठी ६०० मिली ग्राम पोट्यांशीयम मेटाबायसल्फाईट सोडा पाकात विरघळून नंतर संपूर्ण पाकन ओतून पल्प व पाक चांगला ढवळून घ्यावा.
-
उकळून निर्जंतुक केलेल्या बातलीत हा तयार स्क्वॅश भरून सीलबंद करावे. वापरासाठी घेताना १:२ या प्रमाणात पाणी मिसळून घ्यावे.
फणसाचे चीप्स
साहित्य- २५० ग्राम कच्चा फणस, १/२ वाटी कच्च्या कैरी पासून काढलेला रस, हळद, मीठ, तळ्ण्य़ासाठी तेल.
-
हाताला तेल लावून फणसाचे लांब लांब पातळ काप करून घ्यावेत.
-
कच्च्या कैरीचा रस काढून घेवुन तो रस हळद मिक्स करून चिरलेल्या कापांना चोळून १० मिनट बाजूला ठेवावे.
-
एका वाटित थोड पाणी घेउन त्यात २-३ चमचे मीठ घालून वीरघळून घ्यावे.
-
गॅस वर कढईत तेल गरम करून, तेलात फणसाचे काप सोडावे, मधून मधून मिठाचे पाणी शिंपडावे आणि मंद आचेवर कुरकुरीत होई पर्यंत तळून घ्यावीत,
-
थंड झाल्यावर हवाबंद पिशवी किंवा डब्यामध्ये भरून ठेवावेत.
फणसाचे मफीन्स
साहित्य- फणसाचा पल्प: 200 ग्रॅम, मैदा: 250 ग्रॅम, मिल्क पावडर: 100 ग्रॅम, बेकिंग पावडर: 3.75 ग्रॅम, बेकिंग सोडा: 3.75 ग्रॅम, बटर: 50 ग्रॅम, फणस इसेन्स: 3 ड्रॉप्स.
-
मैदा चाळणीने चाळून घ्यावा, नंतर त्यात बेकिंग पावडर आणि सोडा टाकून पुन्हा चाळून घ्यावे.
-
दुसऱ्या पात्रात बटर, फणसाचा पल्प, मिल्क पावडर, फणसचा इसेन्स एकत्र करून ब्लेंडरने ब्लेंड करून घ्यावे.
-
या ब्लेंड केलेल्या मिश्रणात मैदा टाकून पुन्हा ब्लेंडरने एकत्रित करावे.
-
मफीन्स पात्रांना बटर आणि मैदाने ग्रीसिंग करावे.
-
ग्रीस केलेल्या मफिन पात्रांमध्ये तीन चतुर्थांश भाग हे मिश्रण भरावे. हे बेकिंग ओव्हन मध्ये 180 अंश सेल्सिअस तापमानाला ठेवून 20 मिनिटासाठी बेक करावे. बेक केलेले मफीन्स 20-25 मिनिटासाठी गार करावे आणि खाण्यासाठी फणस मफिन्स तयार होतात.
कच्च्या फणसाचा खाकरा
साहित्य- कच्च्या फणसाच्या गराचा पल्प: 100 ग्रॅम, मैदा: 75 ग्रॅम, गव्हाचे पीठ: 75 ग्रॅम, तीळ: 1.5 ग्रॅम, धने पावडर: 3.75 ग्रॅम, आमचूर पावडर: 3.75 ग्रॅम, लाल मिरची पावडर: 2.25 ग्रॅम, मीठ: 3 ग्रॅम, तेल: 7.5 ग्रॅम
100 ग्रॅम कच्च्या फणसाच्या पल्प मध्ये मैदा, गव्हाचे पीठ, तेल, मीठ, तीळ, धने पावडर, आमचूर पावडर, लाल मिरची पावडर एकत्र करून कणिक मळून घ्यावी.
-
या मळलेल्या कणकेच्या गोळ्यावर ओला सुती कापड ठेवून 15-20 मिनिटासाठी तसेच ठेवावे.
-
या कणिकेच्या गोळ्याचे 40-45 ग्रॅमच्या वजनाचे छोटे गोळे करावेत.
-
एकेक गोळ्याला पातळ लाटून घेऊन, गरम तव्यावर दोन्ही बाजूने खरपूस शेकून घ्यावे.
-
गार करून हे तयार खाकरा हवा बंद पाकिटात सील करावेत.
कच्च्या फणसाचे लोणचे
साहित्य: कच्या फणसाच्या गराच्या फोडी- 250 ग्रॅम, तेल: 115 ग्रॅम, बडीशेप: 6.25 ग्रॅम, मेथी बी: 3.75 ग्रॅम, काश्मिरी मिरची पावडर: 6.25 ग्रॅम, बेडगी मिरची पावडर: 2.5 ग्रॅम, हिंग: 2.5 ग्रॅम, मोहरीडाळ: 12.5 ग्रॅम, लवंग: 1.25 ग्रॅम, मसाला वेलची (मोठी, काळी वेलदोडा): 1.25 ग्रॅम, काळीमिरी: 1.25 ग्रॅम, मीठ: 30 ग्रॅम
-
मोहरीडाळ कढईत भाजून घेऊन गार करून मिक्सरच्या साहाय्याने जाडसर भरड करावी.
-
लवंग, मोठी वेलची, बडीशेप, मेथी बी वेग वेगळे भाजून घेऊन गार करावे.
-
या भाजलेल्या मसाल्यांची जाड भरड करावी.
-
एका खोल भांड्यात कच्च्या फणसाच्या गराच्या फोडी घ्याव्यात, त्यात मीठ, आणि भाजलेल्या मोहरी डाळीची भरड, काश्मिरी मिरची पावडर, बेडगी मिरची पावडर आणि मसाल्यांची भरड एकत्रित करावी.
-
या मिश्रणात तापवून कोमट केलेले तेल मिश्रित करावे.
-
या सर्व मिश्रणाला बऱ्याच वेळा ढवळून काचेच्या बरणीत भरावे.
फणसाची खीर
साहित्य- बिया काढलेले फणसाचे गरे २५० ग्राम, गूळ १/२ कप, नारळाचे घट्ट दूध ३/४ कप, तूप १ १/२ चमचा खोबरे काप १ चमचा, काजू तुकडा २ चमचा, मनुका २ चमचा, वेलची पूड १/८ चमचा
-
फणसाचे गरे मिक्सर मध्ये घालून त्याची पेस्ट कसरून घ्यावी.
-
गुळामध्ये बुडेल एवढेच पाणी घालून त्याचे पाणी करून व गाळून घ्यावे.
-
पॅनमध्ये १ चमचा तूप गरम करून त्यात खोबरे काप, काजू आणि मनुका फ्राय करून काढून घ्या.
-
त्याच पॅनमध्ये गुळाचे पाणी, तूप आणि फणसाची पेस्ट घालून पाणी आटून कडा सुटे पर्यंत फ्राय करा.
-
शेवटी फ्राय केलेले काजू, मनुका, खोबरे काप व -वेलचीपूद घालावे.
-
टीप: फणसाचे गरे जास्त पिकलेले असेल तर डायरेक्ट त्याचा गर करता येतो. जर पिकलेले नसेल तर पॅनमध्ये १ चमचा तूप व पाणी घालून फ्राय करा. वेळ वाचवण्यासाठी कुकर मध्ये १ शिटी काढून घेता येते.
-
नारळाचे दूध घातल्यावर जास्त वेळ गॅस वर ठेऊ नये, नाहीतर दूध फाटते. फक्त साधे दूध घालणार असाल तर ते थोडे गाढ करून घालावे छान घट्टसर खीर होते.
फणस आइसक्रीम
साहित्य- फणस पल्प किंवा लगदा - १ वाटी, साखर - १ चमचा, कंडेन्सड मिल्क - १ १/४ कप, फूल फॅट क्रीम – २००-२५० ग्राम्स (अमूल किंवा कोणताही फुल फॅट क्रीमचा वापर केला चारी चालेल), वॅनिला इससेन्स - १ चमचा, चोकोलेट सिरप - सजावटीसाठी - 2 चमचा
- बरके गरे बिया काडून वेगळे करावेत.
- एका पॅन किंवा टोपा मध्ये घालून त्यात साखर घालून मंद आचेवर ७-१० मिनिटे शिजवून घ्यावेत.
- शिजवून झाल्यावर थंड करून, मिक्सर ला लावून त्याची प्युरी किंवा लगदा करून घ्यावा.
- फुल फॅट क्रीम रात्रभर फ्रिझर मध्ये ठेवून सकाळी बाहेर काढावी.
- आईस बाथ किंवा एका मोठ्या भांड्यात बर्फ घेऊन त्यात दुसरे वाडगे ठेवावे.
- थंड क्रीम घेऊन ती फेटून घट्ट क्रीम येई पर्यंत फेटून घ्यावी. क्रीम फेटण्यासाटी इलेक्ट्रिक बीटर चा वापर करावा.
- एका दुसऱ्या मोठ्या वाडग्यात कंडेन्सड मिल्क आणि फणस लगदा घेऊन मिक्स करावे.
- वॅनिला इसेन्स टाकून मिक्स करावे. विप्प्ड क्रीम थोडी थोडी टाकून अलगद फोल्ड करून घ्यावी.
- मिश्रण चांगले एकत्रित करून घ्यावे.
- नंतर एका फ्रीझर सेफ काचेच्या वाडग्यात (ज्याला झाकण असेल असे) टाकावे.
- फ्रीझर मध्ये रात्रभर ठेवून सकाळी किंवा व्यवस्थित जमल्यावर चॉकोलेट सिरप टाकून सर्व्ह करा.
कोवळ्या फणसाची भाजी
साहित्य- कोवळा फणस, आलं लसूण क्रश, तेल, राई, जिरं, हिंग, हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, मीठ, कोथिंबीर.
-
कोवळ्या फणसाचे काटेरी भाग तासून त्याच्या फोडी करून घ्याव्यात व कुकरमध्ये या फोडी, मिठ व पाणी घालून ६ शिट्या कराव्या (तासताना हाताला व सूरी/ विळी ला तेल लावावे)
-
उकडल्या नंतर फोडी पाण्यातून काढून कुस्करावे
-
एका कढईत तेल (तेल जरा जास्तच वापरा) गरम करून त्यात मोहरी, जिरे, आलं लसुण क्रश, हिंग हळद लाल तिखट व कांदा लसूण मसाला घालून परतून घ्यावा.
-
तेल सुटल्यावर कुस्करले़ला फणस घालावे व चवीनुसार मीठ घालून व कोथिंबीर घालून चांगले परतून घ्यावे (उकडताना पण मिठ घातलेलं त्यानुसार मिठ घाला).
फणसाच्या पुऱ्या/घारगे/उंबर
साहित्य -10/ 15 बरके गरे, एक वाटी गूळ, मीठ, पाव चमचा हळद, दीड वाटी तांदूळ पिठी, एक वाटी कणिक, तेल
-
पिकलेल्या फणसातले गरे काढून घ्यावे, बिया काढून गरे मिक्सरला फिरवून घ्यावीत.
-
रस मोजा, एक वाटी रसाला एक वाटी गूळ, चवीपुरते मीठ, दोन चमचे तेल, हळद घालून गॅसवर ठेवा.
-
गूळ विरघळला की गॅसवरून उतरवा.
-
लगेच दोन्ही पिठं मिक्स करून घट्ट गोळा बनवा आणि छोट्या छोट्या गोळ्या करून घ्या.
-
प्लॅस्टिक कागद किंवा केळीच्या पानावर थापून किंवा लाटून पुऱ्या करा.
-
कढईत तेल तापवून पुऱ्या तळा.
Published on: 05 March 2021, 10:34 IST