भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारताची अर्थव्यवस्था आणि बहुसंख्य लोकसंख्या ही शेती क्षेत्रावर आधारित आहे. जर आपण शेतीक्षेत्राचा विचार केला तर शेतीत पिकणाऱ्या बऱ्याच मालावर प्रक्रिया करून बाजारपेठेत योग्य नियोजन करून विकला तर एक चांगला यशस्वी उद्योग उभा राहू शकतो.
आता आपल्याला माहित आहेच की, शेतीमाल प्रक्रिया उद्योगांमध्ये टोमॅटोवर प्रक्रिया करणारे उद्योग, बटाटा प्रक्रिया उद्योग असे बरेचसे उद्योग सांगता येतील. अशा बऱ्याच शेतमाल प्रक्रिया उद्योग मध्ये तरुण उद्योजक पुढे आले असून त्यांनी हे उद्योग यशस्वी देखील केले आहेत. अशाच प्रक्रिया उद्योगांमध्ये लाकडी घाण्यावरील तेल निर्मिती करण्याचा उद्योग हा एक सोनेरी संधी सारखा उद्योग आहे. पुरेशी माहिती आणि योग्य नियोजन आणि जर हा उद्योग सुरू केला तर एक यशस्वी उद्योगाची मुहूर्तमेढ रोवण्यात कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आता आपल्याला तेल हे दररोज दैनंदिन लागणारी वस्तू आहे. आपण ज्या तेलाचा वापर करतो ते एक तर रिफाइंड किंवा प्युरीफाईड असते. परंतु जुन्या काळात लोक घाण्यावरचा तेलाचा वापर करायची. परंतु आता सध्या परिस्थितीमध्ये इतर तेलापेक्षा घाण्यावर चे तेलाचा आहारामध्ये वापरणे खूप गरजेचे आहे. कारण आता लोक आरोग्याबद्दल खूप जागरूक आणि सजग झाले असून आरोग्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची तडजोड लोक करायला तयार नाहीत. त्यामुळे या परिस्थितीत लाकडी घाण्यावरच्या तेल निर्मितीचा उद्योग फार पटकन विकसित होऊ शकतो यात शंकाच नाही.
हा उद्योग का करावा?
लाकडी घाण्यावरील तेल निर्मिती उद्योगासाठी लागणारी गुंतवणूक ही फार कमी आहे. जर आपण याचा व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार केला तर गुंतवणूक कमी आहे व अगदी आपण शेतकरी बांधव देखील करू शकतो. एखादी महिलेला जर उद्योजक म्हणून पुढे यायचा असेल तर अशा महिला सुद्धा हा उद्योग करु शकतात.
तसेच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही नोकरीला आहात किंवा तुमचा एखादा दुसरा व्यवसाय आहे. तरीसुद्धा तुम्ही हा साइड बिझनेस म्हणून हा उद्योग उभारू शकतात कारण हा एक हेल्थ ओरिएंटेड व्यवसाय आहे. कारण रोजच्या आहाराशी निगडित असलेला हा व्यवसाय असून दैनंदिन गरजेची वस्तू असल्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचा अडथळा व्यावसायिक दृष्टिकोनातून येऊ शकत नाही. तसेच आरोग्याशी निगडित असल्यामुळे मार्केटमध्ये प्रचंड डिमांड याला आहे. या माध्यमातून तेलाचे उत्पादन करणे तुलनेने सोपे आहे परंतु मार्केट कॅप्चरिंग साठी थोडेसे कौशल्य असणे फार गरजेचे आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला मार्केट जास्त लांब शोधायची गरज नाही. कारण तुम्ही जिथे उत्पादन कराल तिथे तुम्ही विक्री करू शकतात त्यामुळे काउंटर सेल डेफिनेशन येथे कामात येते.
स्मॉल स्केलवर हा बिझनेस उभा करण्यासाठी….
तुमचे उत्पादन एका ठिकाणी असेल आणि भरपूर युनिट असतील. स्मॉल स्केलवर सुरू करायचा असेल तर तो छोटासा गाळा घेऊन सुरू करू शकता
त्यामध्ये मागच्या भागात एक प्रोडक्शन युनिट असेल आणि समोरचा तुमचं सेलिंग युनिट असेल. परंतु या उद्योगाचा प्रमोशन आणि पब्लिशींग खूप प्रमाणात करावा लागेल. लाकडी घाण्यावरील तेल उद्योगाचे मार्केटिंग स्केल जर एकदा वरकाऊट झाले किंवा तुमचा एक बेसिक फार्मूला तयार झाला ती तुम्हाला नक्की कसं पुढे जायचं आहे? तर डेफिनेटली याला उद्योग म्हणून बघता येईल. मध्ये तुमचं उत्पादन प्रत्येक घराघरात पोहोचला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचे स्किल लक्षात ठेवणे गरजेचे आहे. यामध्ये तुम्ही जेव्हा लाकडी घाण्याचे तेल निर्मिती उद्योग सुरू करतात तेव्हा तुमचा युनीट सुरू करायच्या वेळेस तुमच्या घरात एखादा कार्यक्रमाला जेवढी गर्दी तुम्ही बोलतात ते एवढ्या लोकांना बोलावलं ना तर तुमच्या ऑटोमॅटिक मार्केटिंग होते. कारण तेल हे प्रत्येकाला लागणारी नित्याची वस्तू आहे.
या उद्योगात तेल प्रक्रिया कशी होते?
आपण जुन्या काळाचा विचार केला तर एक पायलीचा घाना असायचा म्हणजे त्यामध्ये चार किलो धान्य असते. त्यातून तेल काढण्यासाठी साधारण चार तास लागायचे. तेच आता साधारण तेरा किलोचा घाना असतो त्यासाठी एक तास वेळ लागतो. 13 किलो शेंगदाण्याच्या घाण्यापासून सुमारे पाच ते साडेपाच किलो तेल मिळते. तेच खोबरे चा घाना असतो तो 22 किलोचा असतो. त्यातून जवळपास पन्नास टक्के तेल निघते म्हणजे दहा ते अकरा किलो तेल यातून तयार होते. जेव्हा तेल यामधून तयार होते तेव्हा ते मोठ्या टाक्यांमध्ये स्टोअर करतात. यामध्ये तेलात असणारे कण खाली स्थिर होतात ज्याद्वारे चांगले असणारे तेल आपल्यातला वरील बाजूला मिळते.
या उद्योगा विषयी थोडक्यात माहिती
1- लागणारे भांडवल-कमीत कमी दोन लाख रुपये भांडवल ची आवश्यकता यासाठी असते.
2- लागणारा कच्चामाल( इतर गोष्टी )- सूर्यफूल, शेंगदाणा तसेच तेल साठवायला टाक्या आणि पॅकिंग साठी बॉटल्स आवश्यक असतात.
3- लागणारी यंत्रसामग्री- 3 एचपी चा मोटार घाना
4- यंत्रसामग्रीची किंमत- एक लाख 37 हजार रुपयाचे घाना
5- लागणारे मनुष्यबळ- साधारण दोन ते तीन व्यक्तींची आवश्यकता असते.
6- विक्री - तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या किराणा दुकानांमध्ये हे प्रॉडक्ट विकू शकता तसेच वेगवेगळे मॉल्स ला सुद्धा देऊन तुम्ही तुमचे प्रोडक्ट विकू शकतात.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:असनी चक्रीवादळामुळे येत्या ४८ तासांत या राज्यांना अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा इशारा
नक्की वाचा:आनंदाची बातमी : 'बायकोला मिळणार महिन्याला 10 हजार रुपये'; जाणून घ्या या योजनेबद्दल
Published on: 10 May 2022, 01:37 IST