जर तुमच्या मनात कृषी क्षेत्रात व्यवसाय सुरू करण्याचा आणि त्यात फायदेशीर कृषी व्यवसायाच्या कल्पनांचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्या साठी फायदेशीर आहे. चला तर मग पाहू कोणते आहेत ते व्यवसाय.
- कृषी फार्म:
जर तुमच्याकडेशेतीसाठी योग्य रिकामी जागा असेल तर कृषी शेती सुरू करणे फायदेशीर व्यवसाय असू शकतो. यामध्ये तुम्ही स्थानिक वस्तू उत्पादित करून त्या स्थानिक बाजारपेठेत विकू शकतात. तसेच दुर्गम भागात वितरणसकाळी द्वारे देखील उत्पादनांचे पूर्तता करता येऊ शकते.
- गांडूळ खते व सेंद्रिय खत उत्पादन:
गांडूळ खत सेंद्रिय खताचे उत्पादन आजकाल घरगुती व्यवसाय बनले आहेत. यासाठी खूप नाममात्र गुंतवणूक आणि खूप कमी जमीन आवश्यक असते. जर या व्यवसाय विषयी आणि त्याच्या उत्पादन प्रक्रियेची सफल माहिती घेतली तर हा व्यवसाय कोणीही सुरू करू शकतो.
- सेंद्रिय फार्म ग्रींन हाऊस:
सध्या सेंद्रिय शेतीकडे कल वाढत चालला असून त्यासाठी ग्रींहाऊस व्यवसायाची वाढ आणि तो यशस्वी होण्याचीशक्यता जास्त आहे.अलीकडच्या सेंद्रिय पद्धतीने उत्पादितशेती उत्पादनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सेंद्रिय शेतीचा ग्रीन हाऊस व्यवसाय सामान्यतः लहान, कुटुंब स्तरावर चालवलेल्या शेतात केला जातो. परंतु आत्ता सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या खाद्यपदार्थांची मागणी वाढत असल्याने लोक सेंद्रिय शेती साठी जमिनीमध्ये गुंतवणूक करीत आहेत.
- पोल्ट्री फार्मिंग:
सध्या मार्केटमध्ये चिकन ची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. जगभरात कोंबडीपालन तीन दशकांपासून परसातील शेतीच्या स्थितीपासून तंत्र व्यवसाय उद्योगात रूपांतरित झाले आहे. कुक्कुटपालन ही शेती व शेती व्यवसायातील वेगाने विकसित होणारे क्षेत्र आहे.
- मशरूम शेती:
मशरूम शेती अलीकडे फार वेगाने प्रगती करीत आहे.कमी भांडवल गुंतवून मशरूम शेती आपल्याला कमी वेळात मोठा नफा मिळवून देऊ शकते. तसेच यासाठी फार कमी जागेची आवश्यकता असते.
- मासे पालन:
मासे पालन हा व्यवसाय वर्षाच्या कोणत्याही हंगामात आणि कोणत्याही वेळेत चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे. यामध्ये जर आधुनिक तंत्राचा वापर केला आणि मध्यम भांडवलाचा उपयोग करून या व्यवसायात चांगला जम बसवता येईल
- सूक्ष्म पोषक उत्पादन:
फॉलियर आणि माती याच्या सूक्ष्म पोषक घटकांना कृषी व्यवसायात मोठा वाव आहे. मजबूत वितरण धोरण आणि व्यवस्थित भांडवल गुंतवणूक करून हा उत्पादन व्यवसायसुरु करुन चांगला नफा मिळवता येऊ शकतो.
- फ्रोजन चिकन उत्पादन:
फ्रोजन चिकन हे आता एक चांगले उत्पादन आहे. याची मागणी ही जागतिक स्तरावर असून मेट्रो किंवा उपनगरीय शहरात राहणारा एखादा उद्योजक योग्य नियोजन आणि बाजारपेठेचा अभ्यास करून हा व्यवसाय सुरू करून चांगला नफा मिळवून जम बसू शकतात.
Published on: 08 July 2021, 09:08 IST