Agriculture Processing

मुंबई- दूग्धजन्य पदार्थाच्या निर्मितीतून उत्पादकाला अधिक नफा प्राप्त होतो. साठवणूक क्षमता असल्यास कच्च्या दूधापेक्षा या पदार्थांची टिकाऊ धरण्याची क्षमता अधिक असते. बाजारपेठेत या पदार्थांना सर्वाधिक मागणी असते. कमी उत्त्पादन खर्चामुळे माफक किंमतीत ग्राहकांना उपलब्ध होऊ शकतात. खरेदीसाठी ग्राहकांना सुयोग्य जागा उपलब्ध करून दिल्यास त्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होऊ शकते.

Updated on 22 September, 2021 9:53 PM IST

मुंबई- दूग्धजन्य पदार्थाच्या निर्मितीतून उत्पादकाला अधिक नफा प्राप्त होतो.  साठवणूक क्षमता असल्यास कच्च्या दूधापेक्षा या पदार्थांची टिकाऊ धरण्याची क्षमता अधिक असते. बाजारपेठेत या पदार्थांना सर्वाधिक मागणी असते. कमी उत्त्पादन खर्चामुळे माफक किंमतीत ग्राहकांना उपलब्ध होऊ शकतात. खरेदीसाठी ग्राहकांना सुयोग्य जागा उपलब्ध करून दिल्यास त्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होऊ शकते.

दुधापासून बनविलेल्या नेमक्या कोणत्या पदार्थांना सकस मागणी आहे. जाणून घ्या-

लोणी (Butter)

दुध व्यवसायातील सर्वात परिचित पदार्थ म्हणजे लोणी. कमी कोलेस्ट्रॉल सहित विविध प्रकाराच्या लोणीच्या व्हरायटी बाजारात उपलब्ध आहेत.  ग्राहकांमध्ये लोकप्रिय असून त्याला सर्वाधिक मागणी दिसून येते. तुम्ही छोट्या स्वरुपात आणि कमी गुंतवणूकीवर लोणी उत्पादनास सुरुवात करू शकतात.

पनीर (Paneer)

भारतीय मार्केटमध्ये पनीरला सर्वाधिक मागणी आहे. केवळ घरगुती नव्हे तर हॉटेल-रेस्टॉरंट व्यवसायातही पनीरपासून बनविलेल्या पदार्थांना अधिक पसंती दिली जाते.

 

तूप (Ghee)

सोपे मशीन व उपकरणांसह तूपाचे उत्पादन घेतले जाते. अगदी घरी देखील तूप बनविण्याचा सेट-अप उभा केला जाऊ शकतो. त्यामुळे यासाठी मोठ्या जागेची आवश्यकता नसते. तुम्ही तुमच्या घरापासून छोट्या स्तरावर तूप उत्पादन युनिटला सुरुवात करू शकतात.

आईस्क्रीम (Ice-Cream)  

दुधापासून बनविलेला जगातील सर्वाधिक पसंतीचा पदार्थ म्हणजे आईस्क्रीम. तुम्ही अगदी छोट्या स्वरुपात आईस्क्रीमच्या उत्पादनाला सुरुवात करू शकतात. आईस्क्रीम निर्मितीची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. आर्थिक स्थितीनुसार गुंतवणुकीची तयारी असल्यास विविध आईस्क्रीम पूरक उत्पादने बनविले जाऊ शकतात.

लस्सी (Lassi)

भारतात पॅकेज्ड लस्सीच्या उत्पादनास अमूलने सुरुवात केली. बाटली तसेच टेट्रा पॅक मध्ये वितरणास सुरुवात केली. हर्बल लस्सी हा पसंतीस उतरलेले दुसरे उत्पादन आहे. तुम्ही योग्य प्रशिक्षणासह छोट्या गुंतवणुकीच्या सहाय्याने लस्सी उत्पादनास सुरुवात करू शकतात.

चीज केक (Cheese Cake)

मऊ व फ्रेश चीज, अंडी आणि साखर यांनी बनलेला चीज केक अत्यंत मागणी असलेला पदार्थ आहे. चीज केक बनविण्यासाठी स्वतंत्र जागा आणि छोट्या उपकरणांची आवश्यकता असते.

 बाटलीबंद दूध (Bottled Milk) 

अलीकडच्या काळात निर्भेळ व शुद्ध दुधाची मागणी अधिक दिसून येते. मोठ्या शहरात किंवा प्रवासादरम्यान बाळगण्यासाठी बाटलीबंद दूधाला पसंती दिसून येत आहे. बाटलीमध्ये दूध भरण्यासाठी व्हॉल्युमेट्रिक फिलिंग मशीनची आवश्यकता भासेल. 

English Summary: mlik processing substance made in home
Published on: 22 September 2021, 09:53 IST