शेतकरी वर्ग शेतीबरोबर शेळीपालन तसेच पशुपालन हे संलग्न व्यवसाय करून आपली उपजीविका करत असतात. तसेच याच्या माध्यमातून नवीन उत्पन्न मिळवत आहेत. जोडव्यवसाय करून शेतकरी दूध विकून सुद्धा हजारो रुपये कमवत आहे.
शेणापासून वेगवेगळ्या वस्तू बनवून विक्री केली जाते तसेच बाजारात या वस्तुंना मोठया प्रमाणात मागणी आहे. तसेच या वस्तू इको फ्रेंडली असल्यामुळे बाजारात या वस्तूंची मागणी वाढत चालली आहे आणि व्यवसायाच्या नवनवीन संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत.
शेणाचा उपयोग:-
शेतीमध्ये चांगले पीक आणायचे असेल तर शेतीला खताची आवश्यकता मोठ्या प्रमाणात असते. शेण खतामुळे शेतातील पीक जोमदार येते तसेच बाजारात रासायनिक खतांपेक्षा शेणखताला प्रचंड मागणी आहे. म्हणजेच शेणामधून सुद्धा शेतकरी चांगल्या प्रकारे कमाई करू शकतो.
शेणापासून लाकडाची निर्मिती:-
जनावरांच्या शेणापासून लाकूड बनवणे तसेच झाडांच्या कुंड्या आणि शेणाचे दिवे याना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तसेच दैनंदिन जीवनात या वस्तुंना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या प्रक्रियेत शेणावर प्रक्रिया करून या वस्तू बनवल्या जातात. या क्रियेत ओल्या शेणाचे रूपांतर हे कोरड्या शेणात करावे लागते.
शेण सुकवण्याची पद्धत:-
बऱ्याच लोकांना एक प्रश्न पडला असेल की शेणापासून लाकूड कसे बनवायचे तसेच ओले शेण कोरडे कसे करायचे हे प्रश्न नक्कीच पडले असतील. या सर्व प्रक्रियेत सर्वात महत्वाचे हे यांत्रिकारण आहे. यंत्राचा आणि वेगवेगळ्या मशीन चा उपयोग करून ओल्या शेणाला कोरड्या शेणामध्ये रूपांतर केले जाते. तसेच शेणापासून लाकूड बनवण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या आधुनिक यंत्राचा वापर केला जातो.
पंजाब राज्यातील पटियाला मधील एका सनी नावाच्या युवकाने शेणापासून लाकूड बनवण्याचे यंत्र तयार केले होते. तसेच या यंत्राला बाजारात मोठी मागणी निर्माण झाली होती. या तरुणाने बनवलेले यंत्र एक तासात एक टन ओल्या शेणाचे रूपांतर सुक्या शेणात करते. तसेच या भागातील बऱ्याच लोकांनी या यंत्राची खरेदी सुद्धा केली आहे.
शेणातून मिळणारे उत्पन्नाचे मार्ग:-
शेणापासून लाकूड निर्मिती करताना त्यातून निघणारे पाणी याची सुद्धा खत म्हणून विक्री करू शकतो. तसेच शेणापासून निर्माण होणाऱ्या वस्तुंना बाजारात मोठी मागणी आहे यातून हजारो लाखो रुपये कमावले जातात.
Published on: 18 December 2021, 04:37 IST