Agriculture Processing

दूध हा पदार्थ नाशवंत आहे हे आपल्याला माहिती आहे.परंतु अशा दुधावर प्रक्रिया करून जरदुग्धजन्य पदार्थांची निर्मिती केली आणि साठवणूक करण्याची व्यवस्था जर तंत्रज्ञान शुद्ध राहिली तर असे तयार पदार्थ खूप दिवस टिकतात. व बाजारपेठेतील मागणीचा कल ओळखून आपल्याला ते विकता येतात. दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादन करण्याचा विचार केला तर अतिशय माफक असून कमी किमतीत चांगला नफा देणारा हा व्यवसाय आहे

Updated on 07 August, 2022 4:04 PM IST

दूध हा पदार्थ नाशवंत आहे हे आपल्याला माहिती आहे.परंतु अशा दुधावर प्रक्रिया करून जरदुग्धजन्य पदार्थांची निर्मिती केली आणि साठवणूक करण्याची व्यवस्था जर तंत्रज्ञान शुद्ध राहिली तर असे तयार पदार्थ खूप दिवस टिकतात. व बाजारपेठेतील मागणीचा कल ओळखून आपल्याला ते विकता येतात. दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादन करण्याचा विचार केला तर अतिशय माफक असून कमी किमतीत चांगला नफा देणारा हा व्यवसाय आहे

किंवा आपण तयार केलेला माल ग्राहकांना सहजरीत्या मिळवण्यासाठी एखादी योग्य ठिकाणी जागा जर आपण उपलब्ध करून दिली तर नक्कीच ग्राहक मोठ्या प्रमाणात येतात व आपली विक्री वाढते. या लेखात आपण नेमक्या दुधापासून कोणते पदार्थ आहेत की त्यांना बाजारपेठेत खूप मागणी आहे, या पदार्थांची माहिती घेऊ.

नक्की वाचा:Bussiness Idea: शेतीवर आधारित 'हा' उद्योग उभारा आणि कमवा प्रचंड नफा,व्हा उद्योजक..!

 बाजारात प्रचंड मागणी असलेले दुग्धजन्य पदार्थ

1- तूप- अतिशय साधे व सोपे मशीन व उपकरणांच्या साहाय्याने दुधापासून तूप बनवता येते. तुम्ही तुमच्या घरात देखील तूप बनवण्याचा युनिट उभारू शकतात. यासाठी जास्त जागा लागते असं काही नाही.  तुम्ही अगदी घरातून दूध उत्पादन व्यवसाय सुरू करू शकतात.

2- दुधापासून आईस्क्रीम- दुधापासून बनवलेले आईस्क्रीम सर्वाधिक जास्त प्रमाणात विकली जाते. आईस्क्रीम उत्पादन देखील तुम्ही अगदी छोट्या स्वरूपात सुरू करून उत्पादन करू शकतात. आईस्क्रीम निर्मितीची प्रक्रिया देखील अत्यंत सहज व सुलभ असून आपली गुंतवणूक क्षमता पाहूनच विविध आईस्क्रीम पूरक उत्पादने बनवता येऊ शकतात.

नक्की वाचा:नका घेऊ टेंशन!कांद्यावर 'ही' प्रक्रिया केली ना तर कमवाल बक्कळ नफा,वाचा सविस्तर माहिती

3- दुधापासून लस्सी- भारतामध्ये पॅकेज लस्सी मोठ्या प्रमाणात विकली जाते.  यामध्ये अमूल या कंपनीचे नाव अग्रस्थानी आहे. यामध्ये हर्बल लस्सी हा एक ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले उत्पादन असून तुम्ही आवश्यक प्रशिक्षण घेऊन अगदी अल्पशा गुंतवणुकीतून लस्सी उत्पादन सुरू करू शकतात.

4- चीज केकची निर्मिती- मऊ व ताजा चीज,अंडी आणि साखर यांनी बनवलेला चीज केकला अत्यंत मागणी असून याला बनवण्यासाठी एक स्वतंत्र जागा आणि काही छोट्या मशिनरीच्या आवश्यकता असते.

5- बाटलीबंद दूध- आताच्या काळात नागरिक आरोग्याच्या बाबतीत फारच जागरूक असून प्रत्येक ठिकाणी स्वच्छतेला खूप महत्व देत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रवासादरम्यान असो की मोठ्या शहरांमध्ये बाटलीबंद दुधाला प्रचंड मागणी आहे. बाटलीबंद दूध निर्मितीमध्ये बाटलीत दूध भरण्यासाठी 'वोल्युमॅट्रिक फिलिंग मशीनची' आवश्यकता असते.

नक्की वाचा:Bussiness Idea! दुधापासून बनवा 'हा' पदार्थ, मिळवा घसघशीत नफा करा आर्थिक प्रगती

English Summary: milk processing bussiness is so profitble and give more income to farmer
Published on: 07 August 2022, 04:04 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)