Agriculture Processing

शेती संबंधित अनेक प्रकारचे व्यवसाय आहेत. ज्या माध्यमातून शेतकरी खूप चांगला नफा मिळवू शकतात. जर आपण विचार केला तर सध्याच्या परिस्थितीत सेंद्रिय शेती हा विषय फार मोठ्या प्रमाणात जोर धरू लागला आहे. कारण विषमुक्त अन्न पदार्थाचे उत्पादन हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे झाले आहे.

Updated on 19 August, 2022 11:45 AM IST

शेती संबंधित अनेक प्रकारचे व्यवसाय आहेत. ज्या माध्यमातून शेतकरी खूप चांगला नफा मिळवू शकतात. जर आपण विचार केला तर सध्याच्या परिस्थितीत सेंद्रिय शेती हा विषय फार मोठ्या प्रमाणात जोर धरू लागला आहे. कारण विषमुक्त अन्न पदार्थाचे उत्पादन हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे झाले आहे.

आता आपल्याला माहित आहेच की, सेंद्रिय शेती म्हटले म्हणजे रासायनिक खताचा कुठल्याही प्रकारे वापर न करता केवळ सेंद्रिय खतांच्या माध्यमातून पिकांचे उत्पादन वाढ करण्याकडे महत्वाचे लक्ष केंद्रित करावे लागते. सेंद्रिय खतांमध्ये कंपोस्ट आणि शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणात शेतीत करणे गरजेचे आहे.

तसेच सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खताचा वापर हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणून शेतकरी बंधुंनी गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला तर येणारा भविष्यकाळ आर्थिक दृष्ट्या उज्वल ठरू शकतो. या लेखात आपण गांडूळ खत निर्मिती व्यवसायविषयी थोडीशी माहिती घेऊ.

नक्की वाचा:Agri Bussiness: 35 ते 40 हजार रुपयात कमवा लाखात नफा,शासनाची घ्या मदत आणि सुरू करा 'हा' व्यवसाय

 गांडूळ खत निर्मिती व्यवसाय म्हणजे दीर्घकालीन उत्पन्नाची हमी….

गांडूळ खत निर्मितीची पद्धत

1-  तुम्हाला ज्या ठिकाणी गांडुळांचे संगोपन करायचे आहे त्यासाठी जागेची निवड खूप महत्त्वाचे असते. यासाठी तुम्हाला ज्या ठिकाणी  अंधार असेल आणि तापमान हे किंचित उबदार असेल अशी जागा निवडणे गरजेचे आहे. जर आपण गांडुळांचा विचार केला तर जास्त तापमानात देखील तग धरतात त्यामुळे ते 40 ते 80 डिग्री सेल्सिअस तापमानाला देखील तोंड देऊ शकतात.

2- गांडूळांचे संगोपन करताना ते ओलसर आणि मऊ ठिकाणी राहतील अशी व्यवस्था करावी. गांडूळ संगोपनामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्या ठिकाणी गांडुळांचे संगोपन करत आहेत अशा ठिकाणी सूर्याची किरणे थेट पडणार नाहीत याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

नक्की वाचा:वाचा रासायनिक खते आणि जमीनीचा सेंद्रिय कार्बन

3- जास्त ओलसरपणा किंवा पाणी नसणे गरजेचे आहे. पाण्याचा निचरा नीट झाला नाही तर गांडूळ मरतात. त्यामुळे  डब्यात किंवा तयार करत असलेल्या कंटेनरमध्ये योग्य प्रकारे छिद्रे पाडावीत.

गांडूळ खत तयार झाल्यावर त्यांच्यासाठी बेडसारखी जागा आवश्यक असते यासाठी फाटलेली वर्तमानपत्रे,पुठ्ठा, पाने आणिइतर कचरा वस्तू चांगल्या आहेत. तसेच गांडुळांना अन्न प्रक्रिया करण्यासाठी काही टाकाऊ पदार्थांची आवश्यकता असते. असल्या प्रकारचा कचरा व्यवस्थित मातीत मिसळली गरजेचे आहे.

4- परंतु यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जो काही वेस्टेज कचरा वापरत आहात तो सेंद्रिय असणे गरजेचे आहे. तसेच गांडुळाच्या संगोपना सोबतच दुग्धजन्य कचरा,तेलकट पदार्थ,अंड्याची टरफले, फळे आणि भाजीपाल्यांच्या सालसारखे पदार्थ टाकाव्यात.

गांडूळ शेतीतून उत्पन्न

 हा एक चांगला फायदेशीर व्यवसाय असून जर तुम्ही चार हजार स्क्वेअर फूट क्षेत्रामध्ये गांडूळांचे संगोपन केले तर त्यामध्ये तुम्हाला पंधरा हजार गांडूळे वाढू शकतात. या माध्यमातून तुम्हाला दरमहा चार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. जर तुम्ही 300 गांडूळ घेतले त्यांची किंमत बाजारात साधारणतः 2278 रुपये आहे.

नक्की वाचा:शेतकरी बंधूंनो! संकरित कारल्याची लागवड करण्यामागील फायदे 'ही' पद्धत देईल भरघोस उत्पादन

English Summary: making vermi compost business give good profit to farmer
Published on: 19 August 2022, 11:45 IST