भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत मुंबई येथे केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था कार्यरत आहेत. गेल्या नऊ दशकांत पासून कपाशी पिकाच्या वेचणी पश्चात कामे उदा. स्वच्छ कापूस वेचणी जिनिंग, कापूस तंतू किंवा धाग्याची जागतिक गुणवत्ता परिक्षण सेवा व अन्य जैविक घटकांच्या मूल्यवर्धन यासाठी प्रयत्नशील आहे
या प्रक्रियेमध्ये शिल्लक राहणाऱ्या सरकी व पराठ्यांचे मूल्यवर्धन करून विविध उत्पादने विकसित केली आहेत. कपाशीचे टाकाऊ घटकांचे मूल्यवर्धन करताना कपाशी उत्पादक आणि पूरक उद्योग क्षेत्रांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न संस्था करत आहे. या माध्यमातून अक्षय ऊर्जा, मृदा आरोग्य आणि ग्रामीण उद्योजकता निर्मिती या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्राधान्याने लक्ष दिले जाते. यातून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते.
कपाशी हे देशातील महत्त्वपूर्ण नगदी पीक असून त्यातून उपलब्ध कपाशीचा प्रामुख्याने कापडनिर्मिती उद्योगात केला जातो. वेचणी व प्रक्रिया पश्चात शिल्लक राहणारी सरकी आणि पराठ्या हे अवशेष टाकाऊ असल्याचा समज आहे. उपलब्ध आकडेवारीनुसारदेशभरात दरवर्षी सुमारे 30 दशलक्ष कापूसपराठ्यामिळतात.त्याचा वापर प्रामुख्याने घरातील इंधनासाठी होतो. या व्यतिरिक्त अतिरिक्त पराठ्या पुढील पिकासाठी शेत तयार करण्यापूर्वी शेतात जाळल्या जातात. यातून वायू प्रदूषणाचा धोका वाढतो. हे टाळण्यासाठी संस्थेच्या शास्त्रज्ञांनी मराठ्यांच्या मूल्यवर्धन यावर संशोधन करून व्यावसायिकदृष्ट्या पर्यावरण पूरक उत्पादने बनवले आहेत.
- उत्पादने
- विटा ब्रिकेट्स आणि कांडी पॅलेट्स : आज वर टाकाऊ म्हणून जाळणाऱ्या जाणाऱ्या पराठ्यांपासून विटा (ब्रिकेट्स) आणि कांडी( त्या (पॅलेट्स)बनविण्यात आल्या या पॅलेट्स एलपीजी गॅसला पर्यायी इंधन म्हणून वापरण्यास शक्य होते. या विटांचा वापर साखर, कागद, रबर रासायनिक आणि अन्नप्रक्रिया उद्योग यामधील बॉयलर मध्ये केला जातो.ढाबे रेस्टॉरंटमधील भट्ट्या आणि सगळ्यांमध्ये इंधनासाठी कांडयांचा वापर होतो. साध्या पराठ्या जाळण्याच्या तुलनेमध्ये ब्रिकेट्स किंवा पॅलेट्स यांची ज्वलन कार्यक्षमता अधिक आहे. परिणामी एलपीजी गॅस च्या तुलनेत कांडी च्या वापरामुळे इंधन खर्चात 50 टक्के बचत होत असल्याचे निरीक्षण आहे. याशिवाय संस्थेने पर्यावरण पूरक हरित शेव दहिनी विकसित केली असून त्यात मृतदेह जाण्यासाठी ब्रिकेटचा वापर केला जातो. परिणामी शवदहनाच्या खर्चात सुमारे 55 टक्के बचत होते.
- कंपोस्ट खत :-पराठ्यांवर जैविक खते आणि एनपीके ची मात्रा देत कुजवण्याची सुधारित व जलद प्रक्रिया विकसित केली आहे. पराठ्या नुसत्याच कंपोस्ट होण्यासाठी पारंपरिक पद्धतीमध्ये पाच ते सहा महिन्याचा कालावधी लागतो. या प्रक्रियेमुळे कंपोस्टिंग तीन महिन्यात शक्य होत असल्यामुळे दोन महिन्याची बचत होते पराठ्यांच्या टाकाऊ अवशेषांपासून बनवलेले हे कंपोस्ट खत एक सेंद्रिय खताचा उत्तम पर्याय ठरतो.
- पार्टिकल बोर्ड:- कपाशीपराठ्यांपासूनपार्टिकल बोर्ड आणि ऍक्टिव्हेटड कार्बन तयार केली जाते. गृह अंतर्गत सजावट, भिंतीचे पॅनेलिंग, फॉल्स सीलिंग, टेबल टॉप अशा फर्निचर साठी पार्टिकल बोर्डाचा वापर करता येतो. ऍक्टिव्हेटड कार्बनचा वापर हवा आणि पाण्याच्या शुद्धीकरणासाठी आणि विविध वैद्यकीय कारणांसाठी होतो.
- धिंगरी आळंबी साठी तणस :- कपाशी पराठ्यांसाठी बारीक भुस्साहा धिंगरी आळंबी उत्पादनासाठी वापरला जातो. एका एकरातून उपलब्ध होणाऱ्या पराठ्यांवर आळंबीची लागवड केल्यास शेतकऱ्यांना प्रति एकर सहा हजार रुपयांचे उत्पन्न येऊ शकते.
- कुकुट खाद्य :-कापूस पिंजून वेगळा केल्यानंतर शिल्लक राहणारी सारखी ही प्रथिनांचा स्रोत आहे. याच्या पेंडी पासुन पशुखाद्याची निर्मिती शक्य आहे.
- सरकी पेंड रवंथ करणाऱ्या गुरांसाठी उपयुक्त असून दुभत्या जनावरांसाठी वापरल्यास दुधाचे प्रमाण वाढते. त्याचा वापर शेतकरी काही प्रमाणात करतात. मात्र सरकी पेंड मध्ये असलेल्या गॉसिपोल या विषारी द्रव्य हे रवंथ न करणाऱ्या पशुपक्ष्यांसाठी घातक ठरू शकते. सरकी पेंड येतील गोसे फो सरकी पेंडीतील गॉसिपोल काढून टाकण्यासाठी संस्थेने डीगॉसिपोलइजेशन तंत्र विकसित केले आहे.अशा डीगॉसिपोलाइज्डसरकीच्या पेंडीचा वापर कुकुट पालन व मत्स्य पालनात पौष्टिक खाद्य करता येते. संस्थेच्या कौशल्य विकास आणि इनक्यूबेशन कार्यक्रमाच्या माध्यमातून नव उद्योजकांनीकुक्कुट खाद्य निर्मितीचे लघुउद्योग सुरू केले. त्यातून चांगले उत्पन्नही मिळवत आहेत.
Published on: 28 February 2022, 01:06 IST