Agriculture Processing

आपल्याला माहित आहेच की संपत घरांमध्ये कुठलीही जरी भाजी करायची राहिली तर त्यामध्ये हळदीचा हा वापर केला जातो. हळद औषधी गुणधर्मांणेपरिपूर्ण आहे.

Updated on 10 December, 2021 10:28 PM IST

 आपल्याला माहित आहेच की संपत घरांमध्ये कुठलीही जरी भाजी करायची राहिली तर त्यामध्ये हळदीचा हा वापर केला जातो. हळद औषधी गुणधर्मांणेपरिपूर्ण आहे.

 आपला भारत हा हळद पीक होणारा देशांपैकी प्रमुख देश असून मसाला पिकांच्या उत्पादनात हळद हे भारतातील प्रमुख नगदी पीक आहे. जगातील एकूण हळद उत्पादनापैकी 76 टक्के हळद उत्पादन भारतात होते. मसाल्याचे पदार्थ मध्ये एक आवश्यक पदार्थ म्हणून हाळदीला जगभरात मागणी असते. या लेखात आपण हळदीपासून बनविता येणारे काही मूल्यवर्धित पदार्थांची माहिती घेऊ.

 हळदी पासून बनवण्यात येणारे मूल्यवर्धित पदार्थ

  • कुरकुमीन- हळद वाळवून या वाळलेल्या हळद पावडर पासून इथाईल अल्कोहोल हे द्रावण वापरून कुरकुमीन नावाचा घटक हळदीपासून वेगळा काढता येतो. आदी मधील कुरकुमीन या घटकाचा विचार केला तर ते जातीपरत्वे वेगळे असते. कुरकुमिंचा वापर हा आयुर्वेदिक औषधे व सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो. हळद आपल्याला पिवळी दिसते तिचा पिवळट पणा हा कुरकुमीन मुळे असतो. हळदीमध्ये जितकं कुरकुमीन चे प्रमाण जास्त तेवढा बाजारभाव चांगला मिळतो.
  • रंगनिर्मिती-रेशमी, सुती  आणि लोकरी कपड्यांना रंग देण्यासाठी हळदीचा उपयोग करतात. सुती कापड यांना देखील काही प्रमाणात हळदीचा रंग देतात. कन्फेशनरी आणि औषध उद्योगांमध्ये हळदीचा रंगासाठी उपयोग होतो. तसेच वार्निश उद्योगात देखील हळदीचा उपयोग केला जातो
  • सुगंधी तेल- हळदीचे तेल हे नारंगी रंगाचे असते तसेच त्याला हळदी सारखा वास असतो. हळदीच्या  ताज्या गड्ड्यांपासून पाच ते सहा टक्के तेल मिळते.
  • कुंकू- हळदीच्या गड्यांचा  उपयोग कुंकू तयार करण्यासाठी केला जातो. हळदीच्या  कुंकू मध्ये टॅपिओका किंवा पांढऱ्या चिकन मातीचे खडे मिसळतात आणि त्यावर सल्फ्युरिक ऍसिड व बोरिक ऍसिड ची प्रक्रिया करतात. हे मिश्रण वाळवले जाते नंतर दळून काढले जाते. अशाप्रकारे हळदीपासून कुंकू तयार करता येतो.

( संदर्भ- ॲग्रोवन )

English Summary: making substence from turmeric processing like as powder ,curcumie
Published on: 10 December 2021, 10:28 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)