भारतात पपई लागवड उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत ते पूर्वेपासून पश्चिमपर्यंत सर्वत्र थोड्या मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. पपई उत्पादक शेतकरी पपई लागवड करून चांगली मोठी कमाई देखील करतात. पण अनेकदा पपईला चांगला बाजारभाव मिळत नाही, त्यामुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांना हवा तेवढा मोबदला मिळत नाही, म्हणुन जर छोटे शेतकरी पपईचे बायप्रॉडक्ट बनवून विक्री करतील तर त्यांचे उत्पन्न नक्कीच दुप्पट होऊ शकते
आज आपण पपईपासून कँडी आणि टुटी फ्रुटी बनवुन पपई उत्पादक शेतकरी कसे आपले उत्पन्न वाढवू शकतात याविषयी जाणुन घेणार आहोत.
कशी बनवली जाते टूटी फ्रुटी
अलीकडे पपई पासून अनेक बायप्रॉडक्ट बनवले जात आहेत, आणि या बायप्रॉडक्टची मागणी देखील खुप लक्षनीय आहे. पपई पासून बनवल्या जाणाऱ्या बायप्रॉडक्ट मध्ये टूटी फ्रुटी एक प्रमुख प्रॉडक्ट आहे. टूटी फ्रुटी हि कच्ची पपईपासून बनवली जाते. यासाठी चांगल्या क्वालिटीची कच्ची पपई ग्रेडिंग करून वेगवेगळी केली जाते. कच्ची पपई चाकूने थोडीशी कापली जाते आणि पपईच्या पृष्ठभागावरून पांढरा पदार्थ (पपेन) पूर्णपणे काढले जाते. त्यानंतर पपई स्वच्छ धुतली जाते. त्यानंतर पपईची साल सोलून बिया काढून स्लायसरच्या साहाय्याने त्याचे छोटे तुकडे केले जातात.
पपईचे तुकडे अर्धा तास 2% ब्राइन (मिठाच्या पाण्यात) बुडवून ठेवल्यानंतर परत धुतले जातात. यानंतर सर्वात महत्वाचा पार्ट येतो तो म्हणजे कलरिंगचा यासाठी कँडी फूड कलरिंगमध्ये बुडविले जाते आणि नंतर टूटी फ्रुटी वाळवली जाते. मग वाळवलेले टूटी फ्रुटी पॅक केले जाते. कँडी चांगल्या स्टोरेज स्थितीत 6 महिन्यांपर्यंत साठवता येते.
पपई उत्पादक शेतकरी FPO मानकांचे पालन करून आणि FSSAI परवाना घेऊन पपईच्या ह्या बायप्रॉडक्टचे व्यावसायिक उत्पादन घेऊन एक चांगला व्यवसाय सुरु करू शकतात. यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो आणि त्यांचे उत्पन्न हे दुप्पटीने वाढू शकते.
Published on: 12 December 2021, 10:31 IST