Agriculture Processing

सीताफळ हे आपल्या सगळ्यांना माहिती असणारे फळ आहे. सीताफळ हे कोरडवाहू फळ पिकातील महत्वाचे फळ असूनत्याचा उत्पादनाचा हंगाम हा सप्टेंबर ते नोव्हेंबर पर्यंत असतो.हे फळ एक नाशवंत फळ असून ते जास्त दिवस पिकत नाही किंवा साठवता येत नाही

Updated on 18 December, 2021 6:14 PM IST

सीताफळ हे आपल्या सगळ्यांना माहिती असणारे फळ आहे. सीताफळ हे कोरडवाहू फळ पिकातील महत्वाचे फळ असूनत्याचा उत्पादनाचा हंगाम हा सप्टेंबर ते नोव्हेंबर पर्यंत असतो.हे फळ एक नाशवंत फळ असून ते जास्त दिवस पिकत  नाही किंवा साठवता येत नाही

त्यामुळे ते पक्व झाल्यानंतर त्यावरप्रक्रिया करून त्यातील गर वेगळा करूनत्याची साठवणूक केल्यासत्याच्या पासून वेगवेगळ्या प्रकारचे प्रक्रियायुक्त पदार्थ बनवता येतात.त्यामुळे वर्षभर सीताफळाचा आस्वाद आपल्याला घेता येऊ शकतो.या प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून सिताफळा पासून सिताफळाचे गराची पावडर,मिल्क शेक,श्रीखंड,सीताफळ आईस्क्रीम,टॉफी, जॅमसरबत इत्यादी पदार्थ तयार करता येतात.या लेखात आपण सीता फळावर प्रक्रिया करून मिल्क शेक आणि श्रीखंड कसे बनवतात याबद्दल माहिती घेऊ.

 सिताफळा पासून बनवता येथे श्रीखंड आणि मिल्क शेक

मिल्कशेक बनवण्याची पद्धत

1-यासाठी सर्वप्रथम गाईचे किंवा म्हशीचे दूध स्वच्छ गाळून घ्यावे.

2- त्यानंतर त्या दुधास सातशे सेंटीग्रेड तापमानास 15 मिनिटे गरम करावे.

- त्यामध्ये 0.40 हक्के सोडियम एलजीनेट मिसळून त्यात दहा टक्के साखर आणि 10% गर किंवा पावडर मिसळून हे मिश्रण चांगले गाळून घ्यावे.

4-त्यानंतर सातशे सेल्सिअस तापमानास तीस मिनिटे गरम करावे.

5- परत ते दोनशे अंश सेल्सिअस ते 400 अंश सेल्सिअस तापमानाला सात मिनिटेथंड करून मिक्सरमध्ये घुसळून घ्यावे.

सिताफळ श्रीखंड

1-यासाठी प्रथम पिकलेली निरोगी सिताफळ स्वच्छ धुऊन घ्यावेत व त्यांचा गर काढावा.

2- त्यानंतर त्यात 100 ग्रॅम गर, 500 ग्राम साखर व 400 ग्राम चक्का मिसळून मिश्रण चांगले एकजीव करुन घ्यावे.

3-नंतर त्यामध्ये काजू,बदाम,पिस्तायांचे बारीक तुकडे करून टाकावेत व ते मिश्रण फ्रीजमध्ये ठेवून थंड होण्यासाठी ठेवावे.

English Summary: making process of milkshake and shrikhnd from custerd apple processing
Published on: 18 December 2021, 06:14 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)