Agriculture Processing

सोया दुधालाच सोयामिल्क म्हणून देखील ओळखले जाते. हे एक वनस्पती आधारित पेय असून जे सोयाबीन भिजवून आणि बारीक करून तसेच त्याचे मिश्रण उकळून आणि त्यामध्ये उरलेले कण हे फिल्टर केले जातात व हे सोया दूध किंवा सोया मिल्क तयार केले जाते. या लेखामध्ये आपण सोया मिल्कचे आर्थिक महत्व आणि त्याची बनवण्याची पद्धत जाणून घेऊ.

Updated on 31 July, 2022 4:22 PM IST

सोया दुधालाच सोयामिल्क म्हणून देखील ओळखले जाते. हे एक वनस्पती आधारित पेय असून जे सोयाबीन भिजवून आणि बारीक करून तसेच त्याचे मिश्रण उकळून  आणि त्यामध्ये उरलेले कण हे फिल्टर केले जातात व हे सोया दूध किंवा सोया मिल्क तयार केले जाते. या लेखामध्ये आपण सोया मिल्कचे आर्थिक महत्व आणि त्याची बनवण्याची पद्धत जाणून घेऊ.

सोया मिल्क म्हणजे नेमके काय?

 जर आपण एका संशोधनाचा विचार केला तर एक किलो सोयाबीन पासून सुमारे साडेसात लिटर सोयाबीन दूध तयार करता येते. त्याच वेळी एक लिटर सोयाबीन दुधापासून दोन लिटर फ्लेवर्ड दूध आणि एक किलो सोया दही तयार करता येते.

जर आपण सोयाबीनचा बाजार भाव सरासरी 45 रुपये किलो पकडल्यास साठ रुपये किमतीच्या सोयाबीन पासून सुमारे दहा लिटर दूध तयार करता येऊ शकते. सोया मिल्क वाळलेले सोयाबीन भिजवून बारीक करून बनवले जाते. या सोया दुधाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे गाईच्या दुधामध्ये जेवढे प्रथिने असतात तेवढेच प्रथिने सोया दुधात असतात.

स्वयंपाक घरामधील पारंपारिक उपकरणे किंवा सोया मिल्क मशिनच्या साह्याने सोया दूध घरच्या घरी बनवता येते.दुग्ध शाळेमध्ये जसे दुधापासून चीज बनवतात त्या प्रमाणेच यापासून टोफू सोया दुधाच्या गोठलेल्या प्रथिनांपासून बनवता येते.

नक्की वाचा:भारीच की! मोहरीचे तेल वाढवणार दुधाचे उत्पादन, मिळणार हे अतुलनीय फायदे; जाणून घ्या...

सोया दूध तयार करण्याची पद्धत

 यासाठी सर्वप्रथम कोरडे सोयाबीन रात्रभर पाण्यात किंवा पाण्याचा तापमानानुसार किमान तीन तास किंवा त्याहून अधिक काळ पाण्यात भिजत ठेवावे. हे पूर्णपणे भिजवण्यासाठी आठ तास पुरेसे आहेत.

त्यानंतर ते पाण्याने ओले पिसले जाते. सोयाबीनचे पाण्याचे प्रमाण वजनाच्या आधारावर 10:1 इतके असावे. यापासून मिळणारे स्लरी किंवा प्युरी पोषण मूल्य वाढविण्यासाठी,चव सुधारण्यासाठी आणि निर्जंतुकीकरण करण्यासाठी उष्णता निष्क्रिय सोया ट्रिपसीन इनहीबिटरसह उकळली जाते.

गरम करण्याची ही प्रक्रिया 15 ते 20 मिनिटे चालते त्यानंतर गाळण्याची प्रक्रिया करून त्यामधील जो विरघळणार नाही असा सोयाबीनचा गाळ असतो तो काढून टाकला जातो. अशाप्रकारे सोया दूध तयार केले जाते व ते पॅक करून बाजारात विकता येते.

नक्की वाचा:Crop Planning: विविध पिके त्यामधील आंतरपिके देतील शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी,नक्की वाचा माहिती

 सोया दुधाची मागणी आणि आर्थिक उत्पन्न

सोया दुधाचे फायदे लक्षात घेतले तर याला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. शहरांमध्ये जे लोक आपल्या आरोग्याबाबत अधिक जागरूक असतात आणि फिटनेसच्या बाबतीत तरुण मंडळी सोया दुधाचा जास्तीत जास्त वापर करतात. 

बाजारपेठेमध्ये अनेक मोठमोठ्या कंपन्या हे दूध पॅकिंग करून विकत असून बाजारात एक लिटर सोया दुधाची किंमत 40 रुपये आहे. तर या पासून तयार होणाऱ्या टोफू150 ते 200 रुपये किलो दराने विकली जात आहे. या व्यवसायातून दरवर्षी सहा लाख रुपयांपेक्षा अधिक पैसे कमवू शकतात.

नक्की वाचा:Animal Related: पशुपालकांनो! दुधाची फॅट कमी लागते का? ही असतात त्यामागील कारणे

English Summary: making process of milk from soyabioen and earn more profit
Published on: 31 July 2022, 04:22 IST