गुलाब फुल शेती फायद्याची शेती आहे. आपल्याकडे लग्न कार्यात आणि इतर अनेक छोट्या मोठ्या समारंभात सुगंधी द्रव्यांचा, पत्रांचा व गुलाब पाण्याचा वापर करतात. वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी फुलातील सुगंधी द्रव्यांचा उपयोग होतो.तसेच गुलाब फुलापासून तयार केलेले सुगंधी द्रव्यांचा वापर स्नो,सुगंधी तेले, साबण व औषधे यांच्या निर्मिती मध्ये करतात.
प्रत्येक फुलझाडांच्या काही भागांमध्ये उपलब्ध असणाऱ्या विशिष्ट रासायनिक द्रव्यांमुळे फुलझाडांना सुगंध प्राप्त होतो. गुलाब फुल शेती एक शेतकऱ्यांना चांगला आर्थिक पर्याय म्हणून नावारूपास येत आहे.या लेखात आपण गुलाब फुला पासून गुलाबाचा गुलकंद आणि अत्तर कसे तयार करतात याबद्दल माहिती घेऊ.
गुलाबापासून गुलकंद तयार करणे
गुलाबाच्या फुलांपासून आपल्याला खाद्य-पेय तयार करता येतात. वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्यांचा भुगा दुधाच्या मिठाई वर,गुलकंद आत,सरबतामध्ये आणि इतर प्रकारे खाण्यासाठीव पिण्यासाठी वापरतात. गुलाबा पासून तयार केलेला गुलकंद हा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा हा गुलकंद अतिशय सोप्या पद्धतीने तयार करतात.गुलकंदला आपल्या आहारात फार महत्त्व आहे. गुलकंद याचा उपयोग औषधी गुणधर्मासाठी आणि एक पौष्टिक तसेच पाचक पदार्थ म्हणून केला जातो.
गुलकंद तयार करण्याची पद्धत
- स्वच्छ धुतलेले फडके भिजवून व पिळून घ्या व गुलाबाच्या फुलांची प्रत्येक पाकळी वेगळी करा.
- प्रत्येक पाकळी दोन्ही बाजूंनी ओलसर फडक्यावर पुसून स्वच्छ करा.
- अखंड पाकळ्यांचा गुलकंद तयार करतात किंवा पाकळ्या बारीक चिरून घेतले तरी चालतात. ज्यामध्ये गुलकंद तयार करून पाठवायचा आहे अशी भांडी आणि बाटल्या गरम पाण्याच्या सहाय्याने स्वच्छ धुऊन घ्यावेत.
- गुलकंद तयार करताना स्वच्छता फार महत्त्वाचे असते. गुलाब पाकळ्यांचा वजनाचे व साखरेचे प्रमाण 1:2 ह्या प्रमाणात ठेवावे.
- थोड्या प्रमाणात साखर व पाकळ्या यांचे मिश्रण कुटून घ्यावे किंवा साखर आणि पाकळ्यांचे एकमेकांवर थर देऊन पूर्ण बाटली भरावी
- नंतर हे मिश्रण हवेशीर ठिकाणी थोडा वेळ उन्हात ठेवावे. दर दोन आठवड्यांनी हे मिश्रण ढवळावे.दीड ते दोन महिन्यात योग्य गुणवत्तेचा गुलकंद तयार होतो.
- काही ठिकाणी पाकळ्या व साखर यांचे मिश्रण समप्रमाणात ठेवतात.पाकळ्या आणि साखरेचे प्रमाण 1:2 ठेवल्यास गुलकंद गोड होऊन मिश्रण एकजीव होते.
- गुलकंद आला बदामी किंवा तपकिरी रंग येतो. गुलाबाच्या फुलाच्या रंगानुसार गुलकंदला रंग येतो.
गुलाबा पासून अत्तर तयार करणे
- गुलाबा पासून अत्तर तयार करण्यासाठी मातीच्या मडक्यात पाणी व फुले भरतात. त्याखाली मडक्याला जाळ किंवा उष्णता देतात.त्यामुळे पाण्याची वाफ होते.ही वाफ चंदनाच्या तेलात शोषली जाते. 250 ते 300 किलो फुलांपासून अत्तर काढण्यासाठी पाच किलो चंदन तेल लागते. वाफ चंदनाच्या तेलात मिसळल्यानंतर ते मिश्रण तीन ते चार वर्षे साठवून ठेवतात. दरवर्षी यामध्ये ताज्या फुलांचा अर्क मिसळतात.
- गुलाबाच्या काही ठराविक जातींचा उपयोग अत्तर तयार करण्यासाठी करतात. दमास्कस गुलाब, सेंटी फोलिया गुलाब आणि अल्बा गुलाब त्यांचा उपयोग अत्तर तयार करण्यासाठी करतात.
- गुलाबाच्या फुलांपासून अत्तर तयार करण्यासाठी प्रथम ऊर्ध्वपातन यंत्राचा वापर करून गुलाब पाणी मिळवितातआणि त्यापासून गुलाब तेलाची निर्मिती करतात.
- त्यासाठी प्रथम गुलाब पाणी मातीच्या अथवा धातूच्या पसरट भांड्यात घेऊन रात्रीच्या थंड हवेत झाकून ठेवतात.
- सकाळी गुलाब पाण्याच्या पृष्ठभागावर तुपा सारखा पदार्थ तरंगताना दिसतो. हा पदार्थ शिंपल्याच्या साह्याने अथवा पिसांच्या सहाय्याने हळुवारपणे गोळा केला जातो आणि काचेच्या बाटलीत साठवून ठेवण्यात येतो.
- तापमान जसजसे वाढत जाते तसतसे बाटलीतील तुपा सारखा पदार्थ वितळून त्याचे द्रवात रूपांतर होते. या रंगहीन सुवासिक द्रवलाच गुलाब तेल अथवा अत्तर असे म्हणतात.
- हा द्रव्य काही काळानंतर मातकट तांबूस रंगाचा होतो. चारशे ते साडेचारशे गुलाब पाकळ्या पासून एक किलो गुलाब तेल अथवा अत्तर मिळते. चांगल्या प्रतीच्या गुलाबाच्या अत्तराच्या निर्मिती साठी गुलाब फुलांचे काढणे सूर्योदयापूर्वी करावी.
Published on: 02 November 2021, 12:32 IST