Agriculture Processing

आपल्याला माहित आहेच कि, शेतीशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय शेतकरी बंधूंना करता येतात. कृषी क्षेत्र हे खूप व्यापक असून यामध्ये खूप मोठ्या व्यावसायिक संधी दडलेल्या आहेत. आपल्याला माहित आहेच कि शेती करत असताना बरेच शेतकरी पशूपालन,कुकुट पालन आणि शेळीपालन यासारखे व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करतात. शेतीसोबतच या व्यवसायांशी संबंधितदेखील अनेक प्रकारचे व्यवसाय शेतकरी बंधू उभारू शकतात.

Updated on 17 September, 2022 11:38 AM IST

आपल्याला माहित आहेच कि, शेतीशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय शेतकरी बंधूंना करता येतात. कृषी क्षेत्र हे खूप व्यापक असून यामध्ये खूप मोठ्या व्यावसायिक संधी दडलेल्या आहेत. आपल्याला माहित आहेच कि शेती करत असताना बरेच शेतकरी पशूपालन,कुकुट पालन आणि शेळीपालन यासारखे व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करतात. शेतीसोबतच या व्यवसायांशी संबंधितदेखील अनेक प्रकारचे व्यवसाय शेतकरी बंधू उभारू शकतात.

जर आपण या मधील कुक्कुटपालन याचा विचार केला तर या व्यवसायात कोंबड्यान सारखी मोठ्या प्रमाणावर खाद्याची आवश्‍यकता भासते. त्यामुळे कोंबडी खाद्य बनवण्याचा व्यवसाय उभारला तर नक्कीच शेतकरी बंधूंना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. या लेखात आपण या व्यवसाय विषयी माहिती घेऊ.

नक्की वाचा:Honey Farming: सामान्य मधमाशीपेक्षा पट अधिक मध देते ही मधमाशी; सरकारही देतंय 85 टक्के अनुदान

 सगळ्यात महत्वाचे आहे कोंबडी खाद्यामधील आवश्यक घटकांचा विचार

 समजा तुम्हाला जर कोंबडी खाद्य बनवण्याचा व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी अगोदर तुम्हाला कुठल्या प्रकारचे खाद्य तयार करायचे आहे हे निश्चित करावे लागेल.

कारण कोंबडी खाद्यामध्ये चिक, बॉयलर आणि लेयर अशा तीन प्रकारच्या कोंबड्यांचा यामध्ये समावेश होतो.यासाठी तुम्हाला कच्चामाल म्हणून तांदूळ, मका, सोयाबीन, गहू,मीठ,फिश मील इत्यादी गोष्टींचा समावेश असतो.

 कशा प्रकारे बनवतात पोल्ट्री फीड?

 जर आपण विचार केला तर यामध्ये अनेक पद्धती आहेत परंतु हिट अँड ट्रायल खाद्य पद्धती खूप सोपे आहे. यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला जे काही खाद्य तयार करायचे आहे त्यामध्ये तुम्हाला कोणते धान्य वापरून ते तयार करायचे आहे हे निश्चित करणे गरजेचे आहे

व त्यानंतर खाद्यामध्ये आवश्‍यक असणारे  जीवनसत्व,कॅल्शियम,फॉस्फरस तसेच सूक्ष्म खनिज व औषधांचे मिश्रण हे प्रती 100 किलो किंवा 1000 किलोच्या संकेत निश्चित करावे लागते. हे तुमचे सगळे गोष्टी निश्चित झाल्यानंतर तुम्हाला ते ग्राइंडर मध्ये दळावे लागते व त्यानंतर आपल्या गरजेनुसारते जाड किंवा बारीक ते ठरवावे लागते.

यामध्ये जर तुम्ही लहान पिलांचा विचार केला तर त्यांच्यासाठी चिक स्टार्टर तयार करावे लागते म्हणजेच बारीक प्रकारचे खाद्य लागते व मोठ्या कोंबड्यांना थोडे जाडेभरडे खाद्याची आवश्‍यकता असते. त्याला आपण फिनिशर असे देखील म्हणतो. तुम्ही निश्चित केलेल्या खाद्य सूत्रानुसार वजन केलेले सर्व साहित्य सुमारे सहा मिनिटे ते दहा मिनिटे मिक्सर द्वारे मिक्स करून घ्यावे.

त्यानंतर तुम्हाला खाद्याची कॅटेगरी कोणते आहे त्यानुसारच बॅग पॅक कराव्या लागतात. यामध्ये तुम्ही 25 किलो तसेच 50 किलो व दहा किलो प्रमाणात बॅग भरू शकतात.

नक्की वाचा:Agri Bussiness:स्वतःचा 'डाळ मिल उद्योग' उभारा आणि मिळवा आर्थिक समृद्धी,वाचा माहिती

 लागणारे एकूण भांडवली

 पोल्ट्री खाद्य व्यवसायांसाठी तुम्हाला पाच ते दहा लाख रुपये भांडवल लागते.

 कच्चामाल

 पोल्ट्री खाद्य बनवण्यासाठी तुम्हाला मका, सोयाबीन, गहू, ज्वारी, तांदूळ,मीठ,  शिंपला फूड, फिश मील इत्यादी प्रकारचा कच्चामाल लागतो.

लागणारी यंत्रसामुग्री

 यासाठी ग्राइंडर व मिक्सर या दोन यंत्रसामुग्रीची आवश्यकता लागते. यामध्ये ग्राइंडर साठी तुम्हाला दोन लाख रुपये तसेच मिक्सरसाठी साडेतीन लाख रुपये पर्यंत आवश्यकता भासते. तसेच तुमच्याकडे दोन किंवा तीन मोठे यंत्र असतील तर तुम्हाला लागणारे मनुष्यबळ आहे पाच ते दहा इतके लागते.

 तुमचा माल कुठे विकाल?

 तुमचे तयार पोल्ट्री खाद्य तुम्ही परिसरातील किंवा इतर ठिकाणच्या पोल्ट्री फार्म मालकांना य भेटून त्यांच्या ऑर्डर घेऊ शकतात किंवा पोल्ट्री खाद्य विक्री करणाऱ्या दुकानाची संपर्क साधून तुमचे तयार पोल्ट्री खाद्य अशा दुकानांना विकू शकतात.

नक्की वाचा:Agri Releted Bussiness: 3 लाख रुपये गुंतवून सुरु करा 'कांदा गोणी' बनवण्याचा व्यवसाय, मिळेल चांगला नफा

English Summary: making poultry feed bussiness is so profitable for farmer and give more income
Published on: 17 September 2022, 11:38 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)