Agriculture Processing

पारंपारिक गुऱ्हाळासाठी कमीत कमी एक एकर जमीन लागते. तसेच 15 ते 20 मजूर सुद्धा लागतात. पण या मठाने आधुनिक गुऱ्हाळ उभारण्यासाठी वेगवेगळे यंत्राचे जुगाड करून फक्त 4ते 5 गुंठ्यात उभारलेआहे. आणि गुळाची निर्मिती करण्यासाठी फक्त सहा मजूर लागतात.

Updated on 02 March, 2022 8:06 PM IST

पारंपारिक गुऱ्हाळासाठी कमीत कमी एक एकर जमीन लागते. तसेच 15 ते 20 मजूर सुद्धा लागतात. पण या मठाने आधुनिक गुऱ्हाळ उभारण्यासाठी वेगवेगळे यंत्राचे जुगाड करून फक्त 4ते 5 गुंठ्यात उभारलेआहे. आणि गुळाची निर्मिती करण्यासाठी फक्त सहा मजूर लागतात.

  • प्रक्रिया निर्मिती :-

 पारंपारिक गुऱ्हाळमध्ये चिपाड वाळवण्यासाठी खूप वेळ लागत होता. पण या आधुनिक गुऱ्हाळामध्ये चिपाड वाळवण्यासाठी त्यांनी 40 फूट लांबीचा लोखंडी टायर बसवलेला आहे तो लोखंडी टायरचुलवनातील उष्णता खेचून घेतो आणि कमीत कमी वीस ते तीस मिनिटांमध्ये ते चिपाड वाळविते.क्रशर ते ड्रायर च्या दरम्यान सेटअप बसवलाआहे.जेव्हा घाण्यात चिपाड टाकले की त्याचा रस आणि चिपाड वेगळे होतात आणि जो तयार झालेला रस आहे तो मोटर च्या साह्याने पहिल्या कढाई मध्ये टाकला जातो. तर चिपाड सुद्धा ड्रायर कडे नेले जाते. पहिल्या काहिली मध्ये 15 तर दुसऱ्या काहिली मध्ये 30 टक्के रसता पवला जातो.

  • आधुनिक गुऱ्हाळाचे फायदे:-
  • आधुनिक गुऱ्हाळमध्ये फक्त 6 मजूर लागतात पण जुन्या गुऱ्हाळमध्ये 15 मजूर लागत आहेत. तसेच आधुनिक गुऱ्हाळामध्ये सर्व प्रक्रिया अगदी जलद होते पण जुन्या गुऱ्हाळामध्ये ऊस गाळला  कि पडलेल्या चिपाड गोळा करणेते चिपाड लांब नेऊन वाळवणे. ते वाळलेले चिपाड परत गोळा करून आणणे आणि चुली मध्ये टाकणे. पण आधुनिकगुऱ्हाळमध्ये कमी वेळेत सर्व होत आहे.
  • जुन्या गुऱ्हाळमध्ये एक आधन येण्यासाठी 3 तास लागतात. पण आधुनिकगुऱ्हाळमध्ये 3 काहिली चा वापर केला की वेळेची बचत होते तसेच 125 ते 150 किलो गूळ तयार होतो.
  • जुन्या गुऱ्हाळला एक एकर पर्यंत जागा लागते. पण आधुनिक गुऱ्हाळळाला सर्व यंत्रासाठी चार ते पाच गुंठे जागा लागते.
  • जुन्या पद्धतीमध्ये चिमणी मधून ज्याला वाया जात होते पण आधुनिक पद्धतीमध्ये ज्वाला ड्रायर साठी वापरतात. जुन्या पद्धती मध्ये एकदा वापरलेले चिपाड पूर्ण वाळविल्याशिवाय

पुन्हा वापरता येत नाही तर आधुनिक पद्धतीमध्ये ड्रायर च्या सहाय्याने चिपाड वाळवून वापरता येते.

  • आधुनिक गुऱ्हाळासाठी गुंतवणूक :-

 आधुनि गुऱ्हाळ उभारायचे असेल तर त्यासाठी सुमारे 35 लाख रुपये खर्च येतो. 35 लाख मधील 18 लाख रुपये त्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्री साठी लागतात. तसेच उर्वरित बांधकाम तसेच खाजगी यंत्रणासाठी बाकीचा खर्च लागतो.

English Summary: making organic jaggrey by use of modern technology of jaggrey making house
Published on: 02 March 2022, 08:06 IST