उन्हाळी हंगामात अनेक जण घरी बसून व्यवसाय सुरू करून चांगला नफा कमावतात. जर तुम्हालाही हंगामानुसार तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असेल, तर तुम्ही तुमच्या घराच्या स्वयंपाक घराशी संबंधित हा उत्तम व्यवसाय सुरु करून नफा कमवू शकता.
कांदा ही प्रत्येक घरात वापरली जाणारी भाजी आहे हे तुम्हाला माहित आहेच.जेव्हा बाजारात कांद्याचे भाव वाढतात. त्यामुळे ते स्वयंपाक घरातून गायब होते.
बाजारातही कांद्याची संबंधित सर्व उत्पादनांच्या किमती झपाट्याने वाढतात. भारतीय बाजारपेठेत कांद्याच्या पेस्टला सर्वाधिक मागणी आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही कांदा पेस्टचा व्यवसाय सुरू केला तर तो तुमच्यासाठी फायदेशीर व्यवसाय ठरेल.
नक्की वाचा:Business Idea: टाकाऊ फुलांचा करा असाही वापर, कमवाल भरपूर नफा
कांद्याच्या पेस्टची किंमत
तुमच्या बजेटनुसार तुम्ही कांदा पेस्ट चा व्यवसाय छोट्या प्रमाणावर सुरू करू शकता. पाहिले तर, खादी ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) सहजपणे तयार केलेल्या कांद्याच्या पेस्टचा प्रकल्प अहवाल तयार केला आहे.
या रिपोर्टनुसार तुम्ही 4.19 लाख रुपयांमध्ये हा व्यवसाय सहज सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला सरकारच्या मुद्रा योजनेतून. कर्जाची सुविधाही दिली जाते.
जेणेकरून तुम्हाला कांदा व्यवसायात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.या व्यवसायात तळण्याचे पॅन ऑटोक्लेव्ह स्टीम कुकर, डिझेल भट्टी, निर्जंतुकीकरण टाकी, छोटी भांडी, मग, कप इत्यादींची किंमत 1 लाख ते 1.75 लाख रुपयापर्यंत आहे.
नक्की वाचा:शेतकऱ्यांनो भातशेतीत सोडा मासे, आधुनिक तंत्रामुळे शेतकरी कमवत आहेत लाखो रुपये..
KVIC च्या पद्धतीचा अवलंब करून आपण एका वर्षात सुमारे 193 क्विंटल कांद्याच्या पेस्टचे उत्पादन मिळू शकता आणि पेस्टचा प्रतिक्विंटल 3 हजार रुपये मोजला तर बाजारात 5.79 लाखापर्यंत पेस्टची किंमत असेल.
2) कांद्याच्या पेस्टपासून फायदा:-
कांदा पेस्ट मार्केटिंगपासून ते मार्केटमध्ये विकण्यापर्यंत तुम्ही कठोर परिश्रम केल्यास, तुम्ही एका वर्षात 7.50 लाख रुपया पर्यंत पेस्ट विकू शकता. तुमचा एकूण खर्च 1.75 लाख रुपयांपर्यंत असेल तर वार्षिक नफा 1.48 लाख रुपयांपर्यंत असेल.
Published on: 13 July 2022, 02:40 IST