शेतकरी बंधुंनी शेतमाल प्रक्रिया उद्योग स्थापन करणे गरजेचे आहे. परंतु शेतीला लागणाऱ्या छोट्या-मोठ्या गोष्टींची निर्मिती करण्यावर देखील भर द्यायला हवा. कारण आपल्याला माहित आहेस की शेती करताना बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टींची आवश्यकता असते. अशा गोष्टींचे उत्पादन करून शेतकरी बंधूंना चांगला नफा मिळवता येणे शक्य आहे.
आपल्याला माहित आहेच कि शेतमाल उत्पादित झाल्यानंतर तो भरण्यासाठी पोते किंवा बारदान लागते तसेच बऱ्याच प्रकारचा भाजीपाला बाजारपेठेपर्यंत देण्यासाठी देखील विशिष्ट प्रकारच्या बॅग किंवा बारदानाची आवश्यकता भासते.
नक्की वाचा:Bussiness Tips: 'बटाटा वेफर्स'उद्योग देईल आर्थिक समृद्धी, वाचा सविस्तर माहिती
जर शेतकरी बंधुंनी तागापासून बनवलेले पोते किंवा बारदाना बनवण्याचा व्यवसाय सुरू केला तर खूप चांगला नफा या माध्यमातून शेतकरी बंधूंना मिळू शकतो. आपल्याला माहित आहेच कि शेतीसाठी पोते किंवा बारदाना हे लागतेच लागते.
तसेच कांदा भरण्यासाठी देखील आता मोठ्या प्रमाणात बारदानाचा वापर होऊ लागला आहे. एवढेच नाही तर सरकारने प्लास्टिक बंदी केल्यानंतर ताग उत्पादनाला मागणी वाढत असूनबाहेर देशातून देखील मोठी मागणी आहे.आपल्याला माहित आहेच कि शेतीमाल बाजारपेठेत पाठवण्यासाठी अशा पोत्यांचा किंवा बारदानाचा वापर आपल्याला करावा लागतो.
त्यामुळे हा उद्योग स्थापन करणे खूप महत्त्वाचे ठरू शकतो. यामध्ये कांदा साठी गोणी निर्मिती करायची असेल तर पातळ कापड वापरले जाते आणि साखर किंवा इतर धान्य साठवण्यासाठी जाड कापड वापरण्यात येते. हा कापड तुम्हाला बाजारात किलो किंवा मीटर या प्रमाणात मिळतो व तुम्हाला मशीनने शिवून पोते तयार करता येते.
व्यवसायासाठी लागणारे भांडवल
कांदा गोणी किंवा बारदान तयार करण्याचा व्यवसाय तुम्हाला स्थापन करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तीन ते पाच लाख रुपयांपर्यंत भांडवलाची आवश्यकता भासते. तसेच तुम्हाला यासाठी कच्चामाल देखील लागतो परंतु तुम्हाला नेमकी पोती किंवा गोण्या कोणत्या पद्धतीच्या म्हणजे जाड किंवा पातळ त्या पद्धतीचा कापड लागतो व सुतळी सारखा छोट्या-मोठ्या कच्च्या मालाच्या आवश्यकता भासते.
नक्की वाचा:शेतकऱ्यांना करोडपती बनवणार काळ्या पेरूची शेती; जाणून घ्या सविस्तर
कच्चामाल मिळण्याचे प्रमुख ठिकाण
प्रामुख्याने हा कच्चामाल तुम्हाला किनाऱ्यालगतच्या राज्यांमध्ये मिळतो जसे की तामिळनाडू,पश्चिम बंगाल व मुंबई इत्यादी ठिकाणाहून असा कच्चामाल उपलब्ध होतो.यासाठी तुम्ही इंडियामार्ट सारख्या संकेतस्थळांचा देखील उपयोग करून घेऊ शकता.
व्यवसायासाठी लागणारी यंत्रसामग्री आणि किंमत
पोते किंवा गोणी तयार करण्यासाठी जो काही कापड असतो तो कापण्यासाठी तुम्हाला कटिंग मशीनची आवश्यकता भासते व हा कट केलेला कापड शिवण्यासाठी तुम्हाला शिलाई मशीन लागते. यामध्ये आपण कांदा गोणी हाताने देखील शिवू शकतो. या यंत्रांचा विचार केला तरीही वेगळ्या क्षमतेनुसार उपलब्ध आहेत. या पद्धतीने त्यांची किंमत देखील ठरते.
लागणारे मनुष्यबळ
यासाठी तुम्हाला दहा ते वीस मनुष्यबळाची आवश्यकता भासते परंतु जर तुम्ही यंत्राने बारदान किंवा पोते शिवण्याचे काम करत असाल तर यासाठी तुम्हाला मनुष्यबळ कमी लागते.
विक्री कुणाला कराल
तुम्ही तयार केलेला गोण्या किंवा पोते किंवा बारदान नेमके कोणत्या ठिकाणी विकावे हे शेतकरी बंधूंना चांगल्या प्रकारे माहिती आहे तरीसुद्धा बाजार समितीतील व्यापाऱ्यांना तसेच शेतकरी, कारखानदार तसेच अशी पोती किंवा बारदान विक्री करणाऱ्या रिटेल दुकानदारांना तुम्ही आपला माल पोच करून त्या माध्यमातून विक्री करू शकता तो चांगला नफा मिळवू शकता.
नक्की वाचा:शेतकरी लाल भेंडीची लागवड करून चांगला नफा मिळवू शकतात; दर मिळतोय 500 रुपये किलो रुपये
Published on: 14 September 2022, 03:25 IST